मुंबई : मुंबईत 1993 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील (1993 mumbai blasts) दोषी याकूब मेमन ( Mumbai Blast Convict Yakub Memon ) ज्याला फाशी दिल्यानंतर मुंबईतील मरीन लाईन्स येथील बडा कब्रस्तान येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. याकूब मेमन च्या या कबरीला मार्बल आणि संगमवर दगडाने सजवण्यात आले असून त्याला एलईडी लाईटने विद्युत रोषणाई केली असल्याची माहिती समोर आली होती. ( Yakub Memon accused in Mumbai blasts )
1993 मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी आरोपी याकूब मेमन याला फासावर चढवल्यानंतर मुंबईतील मरीन लाईन्स येथे असलेल्या बडा कब्रस्तान येथे दफन करण्यात आले. त्यानंतर आता या खूप मेमनच्या कबरीला केलेल्या सुशोभीकरणावरून वादंग पेटला आहे. राजकीय आरोप प्रत्यारोप देखील मोठ्या प्रमाणावर सुरू झाले आहेत. त्यातच बडा कब्रस्तानमध्ये असलेल्या चाळीतील रहिवाशांनी बडा कब्रस्तांच्या ट्रस्टींवर खळबळ जनक आरोप केले आहेत. बडा कब्रस्तानमधील याकूब मेमनची कबर त्याच्या भावाला म्हणजेच रौफ मेमनला ट्रस्टी शोहेब खातीब यांनी विकली. तेथे विद्युत रोषणाई करण्यासाठी कमर्शियल मीटर दिल्याचा आरोप तेथील स्थानिकांनी श्रेष्टी विरोधात केला आहे.
बडा कब्रस्तानमधील चाळीतील रहिवासी असलेले शाहिद शेख यांनी माहिती दिली की, 1993 स्फोटातील आरोपी असलेल्या आणि फासावर लटकवलेल्या या याकूब मेमनची कबर बडा कब्रस्तानचे ट्रस्टी खातिब यांनी यकूबचा भाऊ रौफ मेमन याला विकली. तेथे एलईडी लाइट्स बसवण्यासाठी कमर्शियल मीटरदेखील खातीब यांनी दिला.
पोलिसांनी काढली रोषणाई सध्या मुंबईतील मुस्लीम दफनभूमीत कबर विकल्या जात आहेत. हयात असलेल्या अनेकांनी तेथे कबरीसाठी जमिनीचा तुकडाही बुक केला आहे. मुंबईत घडलेला 1993 बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमन याला फासावर चढवल्यानंतर 30 जुलै 2015 साली मुंबईतील मरीन लाइन्स येथील बडा कब्रस्तान येथे दफन करण्यात आले होते. मात्र, आता ही कबर संगमवर दगडाने आणि विद्युत रोषणाई करून सजवण्यात आली आहे. त्यामुळे एका बॉम्बस्फोटातील आरोपीची कबर सजवल्याने नकारात्मक चर्चा होताना दिसत आहे. ही बाब समोर आल्यानंतर मुंबई पोलिसांनी कारवाई करत याकूब मेमनच्या कबरीवरील विद्युत रोषणाई काढली आहे.
काय आहे वाद?1993 च्या बॉम्बस्फोटातील दोषी आरोपी याकुब मेमनला जिथे दफन करण्यात आले आहे. त्या कबरीची जमीन त्याच्या कुटुंबाने खरेदी केली आहे अशीची चर्चा आहे. मुस्लिम दफनभूमी ट्रस्टीने विकली आहे का असा सवालही उपस्थित होत आहे. कारण मेमन दफन झाल्यानंतर साधी असलेली कबर आता सजली आहे. ओट्याला संगमरवरी दगड बसवले आहेत. LED दिवे लावले आहेत. जे रात्रीच्यावेळी चालू असतात. मुख्यतः मेमनच्या कबरीवर त्यांचा फोकस असतो. स्मशानभूमी विश्वस्तांकडून कोपऱ्यात स्विच बोर्ड लावून वीजपुरवठा केला जातो. कबरीची जमीन विकली नाही तर फाशी झालेल्या दोषीच्या कबरीला इतकी व्हीआयपी वागणूक का? असा सवाल उपस्थित होत आहे.
सजावट केले नसल्याचा ट्र्स्टीचा दावा दुसरीकडे बडा कब्रस्तानचे ट्रस्टी शोएब खातीब यांनी सांगितले अशा प्रकारची काहीही सजावट केलेली नाही. यासंदर्भातील एक व्हिडिओ सध्या व्हायरल होताना दिसत आहे. तो व्हिडिओ किंवा फोटो बडी रातचा जुना असण्याची शक्यता आहे. तसेच कोर्टाने असा कुठलाही आदेश दिलेला नाही की कुठली कबर सजवू नका, असेही त्यांनी सांगितले. तसेच याकूब मेमनच्या कबरीस संगमवर लावण्यात आले आहे हे खरे आहे, असेही ते म्हणाले.