सिल्वर ओकवरील शरद पवार, अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील यांची बैठक संपली आहे. दिलीप वळसे पाटील गृहमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला. जबाबदारी मोठी आहे. ही जबाबदारी आनंदाने पार पाडेन. शरद पवार यांचा आशीर्वाद घ्यायला आलो होतो असे पाटील यावेळी म्हणाले.
पवारांच्या भेटीनंतर दिलीप वळसे पाटील यांनी स्वीकारला पदभार - ncp
10:45 April 06
शरद पवार यांचा आशीर्वाद घ्यायला आलो होतो - वळसे पाटील
10:35 April 06
उदयनराजेही शरद पवार यांच्या भेटीला
खासदार उदयनराजे भोसलेही शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्वर ओकवर दाखल झाले आहेत. सिल्वर ओकवर आधीपासूनच अजित पवार आणि दिलीप वळसे पाटीलही उपस्थित आहेत. उदयनराजे हे शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यास आल्याची माहिती आहे.
10:07 April 06
पवारांच्या भेटीनंतर दिलीप वळसे पाटील यांनी स्वीकारला पदभार
मुंबई : अनिल देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्वर ओकवर गेले आहेत. येथे ते शरद पवार यांची भेट घेणार आहेत. दिलीप वळसे पाटील आज गृहमंत्री पदाचा पदभास स्वीकारणार आहेत. तत्पूर्वी शरद पवार यांची भेट घेण्यासाठी ते अजित पवारांसह सिल्वर ओकवर गेले आहेत. दरम्यान, अनिल देशमुख हे दिल्लीला गेले असून ते आज सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे वृत्त सूत्रांकडून समजते आहे.
दिलीप वळसे पाटील राज्याचे नवे गृहमंत्री
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शरद पवार यांचे विश्वासू व निष्ठावंत नेते दिलीप वळसे पाटील यांच्याकडे आता गृह खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. गृहमंत्री पदासाठी वळसे पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. ते आज पदभार स्वीकारणार आहेत. दरम्यान, दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सध्या असलेल्या कामगार विभागाचा अतिरिक्त कार्यभार हसन मुश्रीफ व राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अतिरिक्त कार्यभार उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यात आला आहे. याप्रकरणी संध्याकाळी पाच वाजेपर्यंतच्या घडामोडी...