ETV Bharat / city

LIVE updates अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज सुरू - विरोधकांचा गोंधळ

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाज सुरू
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाज सुरू
author img

By

Published : Mar 5, 2021, 11:16 AM IST

Updated : Mar 5, 2021, 1:35 PM IST

13:29 March 05

राज्यातील भौगोलिक आणि आरोग्य विषयक परिस्थिती पाहून दहावी, बारावीची परीक्षा होणारच

यावर्षी दहावी, बारावीच्या परीक्षा होणारच असल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सभागृहात स्पष्ट केले. 

13:22 March 05

महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था राहिली नाही, पोलिसांवर राजकीय दबाब

मंत्र्यांना वाचवण्याच्या प्रकारामुळेच जनतेमध्ये देखील कायद्याचा धाक राहिला नाही, गुन्हेगार सुटून आल्यावर वाहनांच्या ताफ्यात मिरवणूक निघत आहे. महाराष्ट्र वाढदिवसाला तलवारी नाचवल्या जात आहेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गावठी पिस्तुल असल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रात महिला अत्याचार वाढ झाली आहे. गृहमंत्र्यांनी दबाब झुगारून कायदा व सुव्यस्थेकडे लक्ष द्यायला हवा., असे आवाहन विरोधकांनी केले.

12:49 March 05

निवडणूक पुढे ढकलण्यासाठी सरकारने आयोगाला पत्र दिले नाही - एकनाथ शिंदे

निवडणूक पुढे ढकलण्यासाठी सरकारने आयोगाला पत्र दिले नाही, तसेच निवडणूक आयोगाने एप्रिलच्या पंहिल्या पंधरवड्यात निवडणूक घेण्याचे नियोजित होते. मात्र, आयोगानेच प्रशासकांना मुदत वाढ देण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे हे विधेयक सभागृहापुढे मांडण्यात आले असल्याचे मंत्री शिंदे यांनी सांगितले.

निवडणूक आयोग निवडणूक घेण्याचा निर्णय़ घेतो. तसेच निवडणूक पुढे ढकलण्यामुळे कोणत्याही पक्षाला फायदा होत नाही. तसेच निवडणूक आयोगाने जेव्हा वाटेल त्यावेळी निवडणूक घ्याव्या, अशी माहिती नगरविकास मंत्री एकशान शिंदे यांनी सभागृहाला दिली.  

12:38 March 05

महापालिकेचा प्रशासक विहित कालावधीसाठी नियुक्त करण्याची मागणी

महानगर पालिका आणि नगरपरिषदामध्ये कोरोना काळात निवडणूक टाळून प्रशासक नेमण्यात आले आहेत.

नवी मुंबई, संभाजीनगर या ठिकाणची निवडणूक पुढे ढकलण्यासाठी सरकारने सर्व अधिकार हाती घेतले असल्याचा आरोप विरोधी पक्षाने केला. सोलापूरमध्ये स्थायीची बैठक ढकलणे म्हणजे सरकार बहुमताच्या जोरावर स्वैराचार करत असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.

देशभरात अनेक ठिकाणी निवडणुका होत आहेत., मग महानगर पालिका निवडणुकीच्या निवडणुकांनाच का कोरोनाचे कारण दिले जात आहे. हे चुकीचे आहे. त्यामुळे सरकारने महापालिकेवर प्रशासक कालावधीची तारीख निश्चित करावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली.

मुंबई औऱगांबाद या ठिकाणी महापालिकेत प्रशासक नेमणूक करून तुम्ही तुमच्या नगरसेवकांच्या मतदार संघात निधी दिला जात असल्याचा आरोप ही फडणवीस यांनी सभागृहात केला.

12:29 March 05

महाराष्ट्र राज्य कौशल विकास विद्यापीठ स्थापन करण्यासाठी प्रस्ताव सभागृहात मांडण्यात आला.

12:21 March 05

अर्णब आणि कंगना रणौत यांच्या विरोधातील हक्कभंग प्रकरणाचा अहवाल पुढील अधिवेशनात मांडला जाणार

प्रताप सरनाईक यांनी अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात दाखल केलेले हक्कभंग आणि अवमान प्रकरण, तसेच कंगना रणौत प्रकरणी हक्कभंग आणि अवमान प्रकरणाची विशेष अधिकार समितीचे अहवाल सादर करण्यासाठी पुढील अधिवेशनापर्यंत मुदत वाढ मागितली. सभागृहाने पुढील अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत मुदत वाढ करून देण्यात आली आहे.

12:11 March 05

महाराष्ट्र आर्थिक पाहणी प्रकाशन 2020 -21 सभागृहापुढे ठेवण्यात आले

12:07 March 05

सभागृहात शोकप्रस्ताव सुरू, खामगाव मतदारसंघाचे माजी आमदार माणिकराव गावंडे यांना आदरांजली

12:06 March 05

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सभागृहात उपस्थित

12:03 March 05

पीक विम्यासाठी लावण्यात आलेले निकष बाजूला ठेऊन शेतकऱ्यांना पीकविमा देण्याची विरोधकांची मागणी

फक्त विमा कंपनींना पत्र देऊन शेतकऱ्यांना विमा मिळणार नाही, या संदर्भात राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देणार का? विमा कंपन्यांना आपण नियम ठरवावे कारण सरकार स्वत: निम्मे पैस विमा कंपन्यांना भरते. मग आपण विमा कंपन्यांची मनमानी का सहन करायची असा सवाल विरोधकांनी केला. तसेच सरकारने स्वत:ची विमा कंपनी काढावी अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली. त्यावर केंद्राला विनंती केली असल्याची माहिती दादा भुसे यांनी दिली.

11:39 March 05

विमा कंपन्यांना ७२ तासानंतरचे नुकसानीचे अहवाल पात्र धरण्यास कृषी विभागाची सूचना - दादा भुसे

नुकसान झाल्यानंतर ७२ तासाच्या आत पीक विम्यासाठी कंपनीकडे माहिती देणे बंधनकारक आहे. मात्र शेतकऱ्यांच्या नुकसानीची सरकारने केलेल्या पाहणी अहवाल ग्राह्य धरून शेतकऱ्यांना पीक विम्यास पात्र ठरण्यास विमा कंपन्यांना कळवले असल्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी सभागृहात सांगितले.

विमा घेताना कंपनीचे कर्मचारी उपस्थित असतात, मात्र पिकाचे नुकासन होते , त्यावेळी विमा कंपनीचे कर्मचारी घटनास्थळावर उपस्थित नसतात. त्यामुळे ७२ तासांच्या नुकसानीची माहिती देण्याची अट शिथील करण्याची मागणी नाना पटोले यांनी केली. यावर ७२ तासानंतरही शेतकऱ्यांच्या नुकसानीची माहिती विमा कंपनीने ग्राह्य धरावे असे पत्र दिले असल्याची माहिती कृषीमंत्री भुसे यांनी दिली.

11:31 March 05

ड्रग्ज आणि अमली पदार्थ सेवन प्रकरणावर सभागृहात प्रश्नउत्तरे सुरू

नशेचे पदार्थ म्हणून काही वैद्यकीय औषधाचा वापर केला जातो.  

केमिकल ड्रग्ज अमली पदार्थ म्हणून वापरले म्हणून आरोपींना अटक केली.

मात्र, अमली पदार्थ म्हणून ड्रग्जची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना टाळे ठोकणार का असा सवाल आशिष शेलार यांनी केला आहे.

सिथेंटीक ड्रग्जचे कारखान्यावर निर्बंध आणण्यावर केंद्र आणि राज्य सरकार मिळून काही निमय करण्याबाबत सरकार प्रयत्न करणार असल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले.

10:56 March 05

विरोधकांनी सभागृहाच्या प्रवेशाद्वारवर केले आंदोलन

मुंबई - राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा पाचवा दिवस विरोधकांच्या विरोधामुळे गाजण्याची शक्यता आहे. आज सकाळीच विरोधकांनी विधानसभेच्या पायऱ्यांवरती मराठा आरक्षण आणि राज्यातील स्त्री अत्याचाराविरोधात सरकारला घेण्यासाठी आंदोलन केले. त्यामुळे आजचा दिवस हा वादळी होण्याची शक्यता आहे.  महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवशेनाचा आज पाचवा दिवस आहे. आज सभागृहात मराठा आणि ओबीसी आरक्षण प्रश्नी चर्चा करण्यात आली.  

राज्याचा अर्थसंकल्प अहवाल देखील मांडण्यात येणार आहे त्यामुळे आजचा दिवस चर्चेचा राहणार आहे.

Last Updated : Mar 5, 2021, 1:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.