ETV Bharat / city

LIVE दिलीप कुमारांना श्रद्धांजली : शरद पवारांनी घेतले अंत्यदर्शन - DilipKumar passes away

सुप्रसिद्ध अभिनेते दिलीपकुमार
सुप्रसिद्ध अभिनेते दिलीपकुमार
author img

By

Published : Jul 7, 2021, 9:10 AM IST

Updated : Jul 7, 2021, 5:37 PM IST

16:55 July 07

15:10 July 07

दिलीप कुमार यांच्यावर शासकीय इतमामात दफनविधी

दिलीप कुमार यांच्यावर शासकीय इतमामात दफनविधी पार पडत आहेत.

15:00 July 07

दिलीप कुमार हे भारतीय चित्रपट सृष्टीच्या इतिहासातील एक सोनेरी पान - छगन भुजबळ

ज्येष्ठ अभिनेता दिलीप कुमार यांच्या निधनाने चित्रपट सृष्टीची अपरिमित अशी हानी झाली असून एक कलागुण संपन्न अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. मी व माझे कुटुंबीय त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो अशी प्रार्थना करतो असे भुजबळ यांनी सांगितले.

13:26 July 07

किंग खान शाहरुखने दिलीप कुमारांच्या पार्थिवाचे घेतले अंत्यदर्शन

दिलीप कुमार यांचे निधन
शाहरुख खानने केले सांत्वन

दिलीप कुमार यांच्या निवासस्थानी जाऊन अभिनेता शाहरुख खान याने त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. यावेळी त्याने त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वनदेखील केले

13:25 July 07

अनिल कपुर दिलीप कुमाराच्या अंत्यदर्शनालाठी आले, वाहिली श्रद्धांजली

अनिल कपुर दिलीप कुमाराच्या अंत्यदर्शनालाठी आले

12:32 July 07

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार दिलीप कुमार यांच्या अंत्यदर्शनासाठी दाखल

12:31 July 07

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री आदित्य ठाकरे दिलीपकुमार यांच्या निवासस्थानी दाखल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  आणि मंत्री आदित्य ठाकरे दिलीपकुमार यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. दोघांनी दिलीप कुमार यांच्या पार्थिवाचे अत्यंदर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली.

12:31 July 07

सिने अभिनेते धर्मेंद्र दिलीपकुमार यांच्या निवास्थानी दाखल, अत्यंदर्शन घेत वाहिली श्रद्धांजली

सिने अभिनेते धर्मेंद्र दिलीपकुमार यांच्या निवास्थानी दाखल

11:36 July 07

दिलीप कुमार यांच्या निधनाबाबत डॉक्टर जलील पारकर यांची माहिती

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे आज निधन झाले. सकाळी ७.३० वाजता हिंदूजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ९८ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. प्रकृतीच्या कारणास्तव काही दिवसांपूर्वी त्यांना हिंदूजा रुग्णालयात ते उपचार घेत होते. याआधी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र बुधवारी त्यांचं निधन झाले, अशी माहिती दिलीपकुमार यांचे कौटुबिक डॉक्टर जलील पारकर यांनी दिली.
 
11:32 July 07

दिलीप कुमार यांचे अंत्यसंस्कार शासकीय इतमामात होतील

उद्धव ठाकरे यांनी घेतले अंत्यदर्शन
उद्धव ठाकरे यांनी घेतले अंत्यदर्शन

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे आज सकाळी निधन झाले. त्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिलीपकुमार यांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच दिलीप कुमार यांचे अंत्यसंस्कार शासकीय इतमामात होतील अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिल्या आहेत.

10:46 July 07

हिंदी सिनेसृष्टीतील एक युग संपलं - संजय राऊत

दिलीप कुमार बरेच दिवस आजारी होते. त्यांची प्रकृती बरी नव्हती. हिंदी सिनेसृष्टीतील एक युग संपलं आहे. हिंदी सिनेसृष्टीतील खरे बादशहा दिलीपकुमार होते. राजकुमार, देवानंद, दिलीपकुमार ही मंडळी नेहमी बाळासाहेबांकडे येत होती. त्यामुळे त्यांच्याशी चांगले ऋणानुबंध होते, अशा आठवणींना उजाळा देत शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिलीपकुमार यांना श्रद्धांजली अर्पण केली. 

10:38 July 07

भारतीय चित्रपट सृष्टीचा इतिहास दिलीपकुमार पूर्व आणि उत्तर असा विभागला जाईल - अमिताभ बच्चन

द‍िलीप कुमार यांच्या निधनावर अमिताभ बच्चन यांनी दु:ख व्यक्त केले. जेव्हा भारतीय चित्रपट सृष्टीचा इतिहास लिहला जाईल त्यावेळी तो दोन भागात विभागला जाईल, एक म्हणजे दिलीपकुमार पूर्व आणि उत्तर अशा शद्बात बच्चन यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

10:13 July 07

दिलीपकुमार यांचा पार्थिव देह हिंदुजा रुग्णालयातून त्यांच्या निवासस्थानाकडे रवाना

पार्थिव देह हिंदुजा रुग्णालयातून त्यांच्या निवासस्थानाकडे रवाना

09:52 July 07

भारतीय चित्रपटसृष्टीला समृद्ध करणारा, रुपेरी नभांगणातला लखलखता तारा निखळला - मुख्यमंत्री ठाकरे

भारतीय चित्रपटसृष्टीला समृद्ध करणारा, रूपेरी नभांगणातला लखलखता तारा निखळला. अजरामर भूमिका साकारणारे दिलीप कुमार यांचे चित्रपटप्रेमी, चाहत्यांच्या हृदयातील स्थानही अजरामर राहील. ज्येष्ठ अभिनेते पद्मविभूषण दिलीप कुमार यांना भावपूर्ण श्रद्धांजली. - मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे

09:49 July 07

हिंदी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते दिलीप कुमार यांच्या निधनाने बॉलिवूडमधील एका अध्यायाची समाप्ती झाली आहे. युसुफ साहेबांची शानदार अभिनय चित्रपट सृष्टीत एका विद्यापीठाप्रमाणे होती. ते आपल्या सर्वाच्या हृदयात जीवंत राहतील, अशा शब्दात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी श्रद्धांजली वाहिली.

09:39 July 07

सांताक्रुझ येथील दफनभूमित आज सायंकाळी ५ वाजता होणार अंत्यसंस्कार

दिलीप कुमार यांच्यावर आज सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास सांताक्रुझ येथील दफन भूमित अंत्यसंत्कार करण्यात येणार असल्याची माहिती  दिलीप कुमारांचे कौटुंबिक सहकारी फैसल फारुकी यांनी दिली. 

09:30 July 07

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी व्यक्त केला शोक

अभिनेते दिलीपकुमार यांच्या निधनावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शोक व्यक्त केला आहे. आपण एका दिग्गज अभिनेत्याला हरपलो असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे. 

09:14 July 07

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाहिली श्रद्धांजली

दिलीपकुमार यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला.  दिलीप कुमार यांना सिनेसृष्टीतील एक अध्याय म्हणून आठवला जाईल. त्यांना अद्वितीय प्रतिभेचा आशीर्वाद मिळाला होता, त्याच्या अभिनयामुळे दर्शक मंत्रमुग्ध होत होते। दिलीपकुमार यांचे निधन आपल्या सांस्कृतिक दुनियेसाठी एक मोठी हानी आहे. त्यांचा परिवार, मित्र, चाहते यांच्या दुखाप्रति संवेदना व्यक्त पंतप्रधान मोदींनी श्रद्धांजली वाहिली आहे.

09:11 July 07

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिलीपकुमार यांना वाहिली श्रद्धांजली

भारतीय सिनेसृष्टीतील दिलीप कुमार यांचे योगदान असाधारण आहे. येणाऱ्या पुढच्या पिढी त्यांच्या योगदानाचे सदैव स्मरण करतील, अशा शब्दात काँग्रेस नेते राहुल गांधी दिलीप कुमार यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. 

09:06 July 07

अनेक पुरस्कारांनी सन्मानित होते दिलीप कुमार

पाकिस्तानचा सर्वोच्च असा पुरस्कारही त्यांना देण्यात आला होता

  • दिलीप कुमार यांना भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च सम्मान दादा साहब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
  • तसेच दिलीप कुमार यांना पाकिस्तानचा सर्वोच्च नागरिक सम्मान निशान-ए-इम्तियाजने देखील सन्मानित करण्यात आले होते
  • दिलीप कुमार 8 वेळा फिल्म फेअर अवॉर्डने सन्मानित
  • पद्मभूषण, पद्मविभूषण पुरस्काराने केले होते सन्मानित

08:58 July 07

सुप्रसिद्ध अभिनेते दिलीप कुमार यांचा ज्वार भाट हा पहिला चित्रपट

सुप्रसिद्ध अभिनेते दिलीपकुमार यांचे नाव मोहम्मद युसूफ खान असे होते. त्यांना चित्रपट सृष्टीतील आपल्या अभिनयाने एक स्वतंत्र अशी ओळख निर्माण केली होती. ज्वार भाटा चित्रपटातून पदार्पण करणाऱ्या दिलीप कुमार यांना चित्रपट सृष्टीत 'ट्रॅजिडी किंग' म्हणून ओळखले जात होते.  पुढे गंगा जमुना, शक्ती, लिडर, दुनिया आदी चित्रपत्रात त्यांनी अभिनय केला होता. 

08:49 July 07

मुंबई - सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते दिलीपकुमार यांचे आज(बुधवारी)सकाळी 7.30 वाजताच्या सुमारास निधन झाले. त्यांनी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात उपचारादरम्यान 98 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास घेतला. दिलीपकुमार यांच्या निधनानंतर राजकारण, चित्रपट सृष्टी, सामाजिक क्षेत्रातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.  गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. या आधीही अनेक वेळा त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र आज सकाळी अखेर त्यांची प्राणज्योत मालवली आहे.

Last Updated : Jul 7, 2021, 5:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.