मुंबई - शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी माहिती व तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहिले आहे. यात त्यांनी युट्यूब चॅनेल व महिलांच्या थेट लिलावाचे प्रसारण करणाऱ्या अॅपवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी आपले माहिती आणि तंत्रज्ञान मंत्र्यांना लिहिलेले पत्र ट्विट केले आहे. पत्रात त्यांनी यु ट्यूब चॅनेल आणि महिलांचा थेट लिलाव प्रसारित करणाऱया अॅपवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. या युट्यूब वाहिनीने विशिष्ट समाजातील महिलांचा थेट लिलाव प्रसारित केला असल्याचे शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांचे म्हणणे आहे. सोशल मीडिया हँडलवरुन घेण्यात आलेले महिलांचे अनेक फोटो या अॅपवर पोस्ट करण्यात आल्याचेही त्या पत्रात म्हणाल्या आहेत.
चतुर्वेदी यांनी पत्रात लिहिले आहे की, 'काही महिन्यांपूर्वी, 'लिबरल डॉज' नावाच्या यूट्यूब वाहिनीने एका विशिष्ट समाजातील महिलांचा थेट लिलाव प्रसारित केला होता. लिलावात सहभागी झालेले लोक त्या महिलांवर बोली लावत होते आणि अश्लील भाष्य करीत होते. 'सुल्ली डील्स' नावाच्या अॅपवर अनेक व्यावसायिक महिलांचे फोटो पोस्ट केले गेले आहेत.
-
जिस तरह से ‘Sulli deals’ के माध्यम से एक धर्म की महिलाओं को target किया जा रहा था वो बेहद ही अफ़सोसजनक और निंदनीय है, इस संदर्भ में IT मंत्री को मेरा पत्र। https://t.co/Z2simpATVM
— Priyanka Chaturvedi🇮🇳 (@priyankac19) July 30, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">जिस तरह से ‘Sulli deals’ के माध्यम से एक धर्म की महिलाओं को target किया जा रहा था वो बेहद ही अफ़सोसजनक और निंदनीय है, इस संदर्भ में IT मंत्री को मेरा पत्र। https://t.co/Z2simpATVM
— Priyanka Chaturvedi🇮🇳 (@priyankac19) July 30, 2021जिस तरह से ‘Sulli deals’ के माध्यम से एक धर्म की महिलाओं को target किया जा रहा था वो बेहद ही अफ़सोसजनक और निंदनीय है, इस संदर्भ में IT मंत्री को मेरा पत्र। https://t.co/Z2simpATVM
— Priyanka Chaturvedi🇮🇳 (@priyankac19) July 30, 2021
खासदार चतुर्वेदी यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, " 'सुली डील'द्वारे ज्या प्रकारे एका धर्माच्या महिलांना लक्ष्य केले जात होते ते अत्यंत खेदजनक व निंदनीय आहे, या संदर्भात आयटी मंत्र्यांना माझे पत्र.''
हेही वाचा - 'ही' तर प्रसार माध्यमांच्या स्वातंत्र्यावर गदा, उच्च न्यायालयाने शिल्पा शेट्टीला सुनावले