मुंबई : दिवाळीच्या पर्वावर राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना मदत जाहीर केली आहे. जे सरकार विरोधामध्ये होतं त्यांनी एसटीच्या कामगार कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा दिला समर्थन दिलं होतं, आता ते सत्तेवर आलेले आहे. मात्र त्यांनी दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचारी आणि कामगारांच्या तोंडाला पाणी पुसल्याचं ( wiping leaves on the mouths of ST employee )कामगारांचं म्हणणं आहे. राज्य सरकारने एसटी महामंडळाला दिलेली मदत तुटपुंजी ( Little help to ST Corporation )असल्याचे, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी सांगितले.
एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक - महाराष्ट्र राज्याच्या एसटी महामंडळाची ऐपत चांगली नसल्याने, चार वर्ष कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली जाईल, असे शासनाने कबूल केले होते. मात्र, स्वतःच्या कबुली दिलेल्या निर्णयापासून सरकार मागे फिरलेले आहे ही बाब गंभीर आहे. तसेच एसटी कर्मचारी आणि कामगारांची ही फसवणूक आहे,असे श्रीरंग बरगे यांनी सांगितले.
एसटी महामंडाळाची 80 टक्के रक्कम बाकी - राज्यामध्ये दर 30 दिवसांनी वेतनासाठी एसटी महामंडळाला 360 कोटी रुपये लागतात. तर मागील तीन महिन्यात केवळ 360 कोटी पैकी शंभर-दोनशे कोटी रुपये एसटी महामंडळाला रक्कम देण्यात आली आहे. मात्र ही रक्कम अपूर्ण आहे. राज्याच्या सन 2022-23 च्या अर्थसंकल्पात 2450 कोटी रुपयांची तरतूद केली असताना, यापैकी केवळ 700 कोटी रुपये एसटी महामंडळाला दिलेले आहेत. म्हणजेच 80 टक्के इतकी रक्कम अद्यापही शासनाकडून एसटी महामंडळाला दिलेली नाही. त्यामुळे ही मदत तुटपुंजी असल्याचा आरोप एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केलेला आहे.
एसटी महामंडाळाची मागणी - सध्या एसटी महामंडळाला दोन हजार कोटी रुपयांची देयक आहे. यामध्ये सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची ग्रॅज्युएटी फंड, रजा रोखीकरणाचे पैसे, टायर ,ऑइल सुटे भाग पुरवणाऱ्या कंपन्यांची उधारी बाकी आहे. वेगवेगळ्या बस स्थानकांचे नूतनीकरण व्हायचे आहे. एवढा सगळा खर्च आणि कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय रकमा देखील देणे बाकी आहे. मात्र शासन याच्यावर निर्णय घेत नाही . पूर्ण मदत न देता तुटपुंजी अपुर्ण मदत देत आहे. ही बाब न्यायालयाचा अवमान करणारी आहे. वाढती महागाई आणि दिवाळीच्या खर्च पाहता एसटी महामंडळाने मागणी केलेली 737.50 कोटी रक्कम शासनाने त्वरित द्यायला हवी, असे श्रीरंग बर्गे यांनी ईटीव्ही भारत सोबत संवाद साधताना सांगितले.