ETV Bharat / city

Breast cancer treatment : ‘लिग्नोकेन’ इंजेक्शनमुळे स्तनाच्या कर्करोगावर आता फक्त 'तीस' रूपयांत उपचार - breast cancer treatment

जगभरात स्तनाच्या कर्करोगाचे रुग्ण लक्षणीय आहेत. तब्बल अकरा वर्षानंतर स्तनाच्या कर्करोगाच्या पेशी सुन्न होऊन त्यांची वाढ किंवा प्रसार थांबवणाऱ्या इंजेक्शनचा शोध अभ्यास गटाने लावला. हे इंजेक्शन केवळ तीस रुपयांत उपलब्ध होणार ( breast cancer treatment in thirty rupees ) आहे. आजवर सुमारे ८० टक्क्यापर्यंत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे, असा दावा डॉक्टरांकडून केला जातो आहे. मात्र, कर्करोग ग्रस्तांना या इंजेक्शनमुळे मोठा दिलासा मिळणार ( Lignocaine injection cures breast cancer ) आहे.

Breast cancer treatment
स्तनाच्या कर्करोगावर उपचार
author img

By

Published : Sep 13, 2022, 11:13 AM IST

मुंबई - जगभरात स्तनाच्या कर्करोगाचे रुग्ण लक्षणीय आहेत. टाटा रुग्णालयासह ११ कर्करोग केंद्रांनी या आजारांची व्याप्ती रोखण्यासाठी अभ्यास केला. तब्बल अकरा वर्षानंतर स्तनाच्या कर्करोगाच्या पेशी सुन्न होऊन त्यांची वाढ किंवा प्रसार थांबवणाऱ्या इंजेक्शनचा शोध अभ्यास गटाने लावला. हे इंजेक्शन केवळ तीस रुपयांत उपलब्ध होणार ( breast cancer treatment in thirty rupees ) आहे. आजवर सुमारे ८० टक्क्यापर्यंत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे, असा दावा डॉक्टरांकडून केला जातो आहे. मात्र, कर्करोग ग्रस्तांना या इंजेक्शनमुळे मोठा दिलासा मिळणार ( Lignocaine injection cures breast cancer ) आहे.

इंजेक्शनच्या एका डोसची किंमत केवळ ३० ते ४० रुपये ( Lignocaine injection in thirty rupees ) देशात दरवर्षी अडीच हजार महिलांना स्तनाच्या कर्करोगासाठीची शस्त्रक्रिया करावी लागते. टाटा मेमोरियल रुग्णालयाने २०११ मध्ये स्तनाच्या कर्करोग्रस्त रुग्णांच्या उपचारांवर नवीन अभ्यास सुरू केला होता. ‘इफेक्ट ऑफ पेरी-टू मोरल इं फिल्ट्रेशन ऑफ लोकल एनेस्थेटिक प्रायर टू सर्जरी ऑन सर्व्हाइवल इन अर्ली ब्रेस्ट कँसर’ या शीर्षकाखाली झालेल्या अभ्यासात देशातील टाटा रुग्णालयासह ११ कर्करोग केंद्रांचा समावेश होता. तब्बल अकरा वर्षे स्तनाच्या कर्करोगावरील नवीन उपचार पद्धतीचा अभ्यास चालला. या अभ्यासासाठी ३० ते ७० वयोगटातील १६०० महिलांची निवड करण्यात आली होती. दोन गटांमध्ये महिलांची विभागणी करण्यात आली होती. दरम्यान, टाटा मेमोरियल रुग्णालयातील संशोधकांनी स्तनाच्या कर्करोगाच्या पेशी सुन्न होऊन त्यांची वाढ किंवा प्रसार थांबवणाऱ्या इंजेक्शनचा शोध लावला आहे. ८०० महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगावर शस्त्रक्रियेद्वारे उपचार केले. तसेच इतर गटातील ८०० महिलांवर इंजेक्शनद्वारे शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. विशेष म्हणजे यावर दिलेल्या इंजेक्शनच्या एका डोसची किंमत केवळ ३० ते ४० रुपये असल्याची माहिती रुग्णालयामार्फत देण्यात आली. स्तनाच्या कर्करोगावर उपचारासाठी ‘वरदान’ म्हणून या इंजेक्शनकडे पाहिले जात आहे.

इंजेक्शनद्वारे कर्करोगाच्या पेशींचा प्रसार थांबवण्यात यश दोन्ही गटातील महिलांच्या नियमित पाठपुराव्यासोबतच किमो, रेडिएशन आदी उपचारांचे पुढील प्रोटोकॉल केले. फॉलोअपच्या ६ व्या वर्षी इंजेक्शन वापरणाऱ्या रुग्णांच्या आयुष्यात ३० टक्के सुधारणा दिसून येत आहे. शस्त्रक्रियेदरम्यान कर्करोगाच्या पेशी स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी शरीराच्या एका भागातून इतर भागांमध्ये चॅनेलद्वारे प्रवेश करतात. परंतु नवीन संशोधनात संशोधकांना केवळ एका इंजेक्शनद्वारे कर्करोगाच्या पेशींचा प्रसार थांबवण्यात यश आले आहे.

भूल देण्यासाठी डॉक्टर ‘लिग्नोकेन’ इंजेक्शन ( breast cancer treatment ) कर्करोगाने प्रभावित भागांना सुन्न करण्यासाठी भूल दिली जाते. ही भूल देण्यासाठी डॉक्टर ‘लिग्नोकेन’ इंजेक्शन वापरतात. शस्त्रक्रियेपूर्वी ट्यूमर भोवती हे इंजेक्शन दिले जाते. या इंजेक्शनमुळे कर्करोगाच्या पेशी पूर्णपणे सुन्न होतात आणि शरीराच्या इतर भागात पसरत नाहीत, असा दावा मेडिकल ऑन्कोलॉजी प्राध्यापक आणि अॅक्टोरेकचे संचालक डॉ. सुदीप गुप्ता यांनी केला आहे. या इंजेक्शनच्या वापरामुळे बरे होण्याचे प्रमाण पाच टक्क्यांनी वाढले आहे. तसेच स्तनाच्या कर्करोगाचे ८१ टक्के रुग्ण शस्त्रक्रियेनंतर पूर्णपणे बरे होतात. या इंजेक्शननंतर स्तनाच्या कर्करोगाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८६ टक्क्यांपर्यंत वाढल्याचे डॉ. गुप्ता यांचे म्हणणे आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.