ETV Bharat / city

राज्यातील ४० हजार वाहन चालकांचे लायसन्स होणार निलंबित; सर्वाधिक २८ हजार वाहनचालक नागपुरातील !

राज्यातील रस्त्यावर बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्या नागरिकांच्या मुसक्या आवळण्याठी वाहतूक विभाग प्रयत्न करत आहे. जानेवारी २०२१ ते जून २०२१ पर्यत राज्यभरात वाहतूक विभागाकडून वाहतूक नियम मोडणाऱ्या १४ लाख ७५ हजार १०१ वाहन चालकांनावर  कारवाई करण्यात आली. या कारवाईत राज्यभरातील ४० हजार ३०५ वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम वारंवार मोडल्यामुळे त्यांचे लायसन्स निलंबित करण्याचा प्रस्ताव वाहतूक विभागाकडून परिवहन विभागाला पाठवण्यात आला आहे.

Driving license suspended
Driving license suspended
author img

By

Published : Jul 30, 2021, 3:45 PM IST

मुंबई - वाहतुकीचे नियम वारंवार मोडणार्‍या वाहनचालकांना लगाम लावण्यासाठी वाहतूक विभागाने कंबर कसली आहे. गेल्या सहा महिन्यात वाहतूक नियम मोडणाऱ्या १४ लाख ७५ हजार वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या कारवाईत पाच वेळा नियम मोडणाऱ्या राज्यातील ४० हजार ३०५ बेशिस्त वाहन चालकांचे लायसन्स निलंबित करण्यात येणार आहे. याबाबतचा तसा प्रस्ताव वाहतूक विभागाकडून परिवहन विभागाला पाठवण्यात आला आहे.

१४ लाख ७५ वाहनांवर कारवाई -

राज्यातील रस्त्यावर बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्या नागरिकांच्या मुसक्या आवळण्याठी वाहतूक विभाग प्रयत्न करत आहे. मात्र, तरी सुद्धा वाहन चालकांकडून सतत वाहतूक नियम मोडले जात असल्याने वाहतूक विभागाची डोकेदुखी वाढली आहे. जानेवारी २०२१ ते जून २०२१ पर्यत राज्यभरात वाहतूक विभागाकडून वाहतूक नियम मोडणाऱ्या १४ लाख ७५ हजार १०१ वाहन चालकांनावर कारवाई करण्यात आली. या कारवाईत राज्यभरातील ४० हजार ३०५ वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम वारंवार मोडल्यामुळे त्यांचे लायसन्स निलंबित करण्याचा प्रस्ताव वाहतूक विभागाकडून परिवहन विभागाला पाठवण्यात आला आहे. मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहन चालविणे, लाल सिग्नल ओलांडणे, मालवाहू वाहनातून क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक करणे, मालवाहू वाहनातून प्रवासी वाहतूक करणे, वाहन चालविताना मोबाइल फोनचा वापर करणे, दारू पिऊन वाहन चालविणे आदी नियम तोडणाऱ्या वाहनचालकांचे लायसन्स निलंबित करण्यात येणार आहे.

१७ हजार चालकांचे लायसन्स निलंबित -

गेल्या वर्षी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. तसेच विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई सुद्धा करण्यात येत होती. याशिवाय कोरोना नियम मोडणाऱ्या वाहकांना लायसन्स निलंबित करण्याचे आदेश सुद्धा राज्यातील अनेक जिल्हातील स्थानिक प्रशासनाने दिले होते. त्यानुसार गेल्या वर्षी राज्यभरात ६ लाख ४६ हजार ७५९ वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत १७ हजार ९४४ वाहन चालकांचे लायसन्स निलंबित करण्याचा प्रस्ताव वाहतूक विभागाने परिवहन विभागाकडे पाठवला आहे.

२८ हजार नागपूरकरांचा समावेश -

जानेवारी ते जून २०२१ या कालावधीत वाहतूक नियम मोडणाऱ्या १४ लाख ७५ हजार १०१ वाहन चालकांवर वाहतूक विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे. ज्यात ४० हजार ३०५ वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम वारंवार मोडल्यामुळे त्यांचे लायसन्स निलंबित करण्याचा प्रस्ताव वाहतूक विभागाने परिवहन विभागाला पाठवला आहे. या ४० हजार ३०५ वाहन चालकांमध्ये एकट्या नागपुरात २८ हजार ३६ वाहन चालकांचा समावेश आहे. तर या पाठोपाठ मुंबईतील ३ हजार १४९, नाशिक २ हजार १३३ आणि ठाणेतील ५०६ वाहन चालकांचे आता लायसन्स निलंबित होणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.