मुंबई - ज्या मतदारांनी आम्हाला त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी विधानसभेत निवडून दिले त्या मतदारांचे प्रश्न आम्हाला निलंबित ( Suspended MLA )असल्याने हिवाळी अधिवेशनात मांडता येणार नाहीत. मतदारांवर अन्याय होऊ नये म्हणून आमच्यावर करण्यात आलेल्या निलंबनाच्या कारवाईच्या एक वर्षांच्या कालावधीचा ( Suspended MLA Letter ) फेर विचार करण्यात यावा, अशी विनंती करणारी पत्र भाजपच्या 12 आमदारांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ ( Deputy Speaker of the Assembly ) यांना पाठविली आहेत.
पावसाळी अधिवेशनात झाले होते निलंबन
विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात भाजपाच्या 12 आमदारांना एक वर्षासाठी निलंबित ( Suspended MLA ) करण्यात आले होते. भाजप आमदार तथा विधानसभा मुख्य प्रतोद आशिष शेलार आणि 11 आमदार यांनी या निलंबना विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने दाखल करुन घेतली असून 11 जानेवारीला पुढील सुनावणी होणार आहे. त्यावेळी न्यायालयाने सरकार आणि विधिमंडळाला आपली बाजू मांडण्यास सांगितले आहे.
विधानसभा अध्यक्षांना अधिकार
दरम्यान, ही याचिका दाखल करुन घेताना न्यायालयाने या आमदारांचा आपल्या निलंबनाचा कालावधी कमी ( Suspension Period ) करण्यासाठी विधानसभा अध्यक्षांना विनंती करण्याचा अधिकार अबाधित ठेवला आहे. त्यानुसार आमदार आशिष शेलार यांच्यासह 12 आमदारांनी प्रत्येकांनी स्वतंत्रपणे पत्र लिहून विधानसभा उपाध्यक्षांना विनंती केली आहे.
हे ही वाचा - बारा आमदारांचे निलंबन महाविकास आघाडीच्या पथ्यावर