ETV Bharat / city

Don Tiger Menon : कब्रवादात नाव आलेला डाॅन टायगर शिपायाचा गुंड कसा बनला पाहूया

अंडरवर्ल्ड डॉन टायगर मेमन (Underworld don Tiger Memon) च्या नावाने याकूब मेमनच्या (Yakub Memon) कब्रस्तानातीस ट्रस्टचे माजी सदस्य जलील नवरोन यांना धमकी आल्याचे प्रकरण सध्या चांगलेच चर्चेत (who was named in the controversy) आहे. त्यामुळे टायगर मेमन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे टायगर मेमन वर राष्ट्रीय तपास यंत्रणा असलेल्या एनआयएने 15 लाखाचे बक्षीस नुकतेट जाहीर केले आहे. पाहूया शिपाई मुश्ताक मेमन ते अंडरवर्ल्ड डॉन टायगर मेमन कसा बनला (Lets see how Don Tiger Menon)

Tiger Memon
टायगर मेमन
author img

By

Published : Sep 9, 2022, 7:43 PM IST

मुंबई: अभिनेता सलमान खानचा बहुचर्चित चित्रपट टायगर अभी जिंदा है हा चित्रपट मोठ्या प्रमाणात यशस्वी झाला होता या चित्रपटातील सलमान खानचा डायलॉग प्रसिद्ध झाला होता तो म्हणजे टायगर अभी जिंदा है याच नावाने 1993 च्या बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी आरोपी याकूब मेमन च्या बडा कबरीस्तान येतील ट्रस्टचे माजी सदस्य जलील नवरोन यांना टायगर मेमन च्या नावाने धमकी दिल्यामुळे पुन्हा एकदा टायगर मेमनचे नाव चर्चेत आले आहे. नुकतेच टायगर मेमन वर राष्ट्रीय तपास यंत्रणा असलेल्या एनआयएने 15 लाखाचं बक्षीस जाहीर केले आहे.

याकूब मेमनला फाशी: 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमनला फाशी झाली असली तरी बॉम्बस्फोटांचा मुख्य सूत्रधार टायगर मेमन अजूनही मोकाट फिरत आहे. सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार याकूबने टायगरच्या सूचनेनुसार बॉम्बस्फोटात वापरलेली वाहने खरेदी केली आणि पैशाची व्यवस्था करत होता. या दोघांशिवाय अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याचा धाकटा भाऊ अनीस इब्राहिम हेही बॉम्बस्फोटांचे सूत्रधार मानले जातात. इब्राहिम मुश्ताक अब्दुल रझाक नदीम मेमन चा टायगर मेमन झाला.

12 स्फोट आणि मुंबई थांबली : 12 मार्च 1993 चा मुंबई नेहमीप्रमाणेच घड्याळाच्या काट्यावर धावत होती. पण अचानक एका पाठोपाठ एक 12 स्फोट झाले आणि मुंबई थांबली. हा दिवस मुंबईकर कधीच विसरु शकणार नाही. दहशतवाद्यांनी मुंबईत बॉम्बस्फोट घडवले. या जखमा अजूनही मुंबईकरांच्या मनात ओल्या आहेत. हा दिवस आठवताच मुंबईकरच नाही तर अवघ्या देशवासियांच्या अंगावर काटा येतो. मुंबईतील 1993 च्या बॉम्बस्फोटानं अवघ्या देशाला हादरवले होते. देशातील हा सर्वात मोठा बॉम्बस्फोट होता. या हल्लात 257 जणांचा मृत्यू झाला होता तर सातशेहून अधिकजण या स्फोटात जखमी झाले होते. या भयान हल्ल्याच्या कटू आठवणी आजही मुंबईकरांच्या मनात आहेत. या बॉम्बस्फोटात अनेकांनी आपल्या जवळच्या लोकांना गमावले होते.

डॉन दाऊद इब्राहिम सुत्रधार : मुंबई हादरवणाऱ्या या हल्ल्यांमागचा सुत्रधार होता अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (Underworld don Dawood Ibrahim) या हल्ल्यांमागे दाऊदचा संबंध असल्याचे समोर आले होते. पण याप्रकरणातील सर्व आरोपी फरार झाले. त्यामध्ये एक कुटुंब होते. ते म्हणजे मेमन कुटुंब मुंबईतील 1993 च्या बॉम्बस्फोटाचा मुख्य सूत्रधार टायगर मेमनचे कुटुंब. टायगर मेमन आणि याकूब मेमन दोघे भाऊ. यांचा या बॉम्बस्फोटाच्या कटामागे हात होता. बॉम्बस्फोटानंतर हे दोघे भाऊ आपल्या कुटुंबासह फरार झाले होते.

माहिम परिसरात वास्तव्य : 12 मार्च 1993 च्या बॉम्बस्फोटाआधी मुंबईतील माहिम परिसरातील अल हुसैनी इमारतीत टायगर मेमन हा आई-वडील आणि याकूब या आपल्या लहान भावासोबत राहत होता. मुंबई बॉम्बस्फोटच्या कटानुसार टायगर मेमनने याकूब मेमनसोबत कुटुंबातील सर्व सदस्यांना भारताबाहेर पाठवले. कुटुंबातील सगळेच जण पहिल्यांदा दुबईला त्यानंतर सौदी आणि शेवटी पाकिस्तानात गेले.

शिपाई म्हणून काम केले : 24 नोव्हेंबर 1960 रोजी जन्मलेला इब्राहिम मुश्ताक अब्दुल रझाक नदीम मेमन हे अंडरवर्ल्डच्या जगात टायगर मेमन म्हणून ओळखा जातो. दक्षिण मुंबईतील मोहम्मद अली रोड परिसरातील कडिया बिल्डिंगमधील एका खोलीच्या फ्लॅटमध्ये त्यांचे बालपण आई-वडील आणि पाच लहान भावांसोबत गेले. मुश्ताकचे वडील अब्दुल रझाक हे वेल्डिंगचे काम करायचे. मुंबईच्या स्माईल बेग मोहम्मद स्कूलमधून त्याने दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. घरच्या हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे मुश्ताकने आपले शिक्षण मध्येच सोडून मुंबईच्या मेमन सहकारी बँकेत शिपायाची नोकरी सुरू केली. पण तिथेही तो फार काळ राहू शकला नाही. चहा आणण्यावरून झालेल्या वादानंतर त्याने बँक मॅनेजरला मारहाण केली त्यानंतर त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले.

टायगर असे नाव मिळाले : नोकरी सोडल्यानंतर मुश्ताक तस्कर मोहम्मद मुस्तफा दौसाला भेटला. त्याने त्याला ड्रायव्हर म्हणून कामावर ठेवले. दौसामध्ये काम करत असताना मुश्ताकने दुबईस्थित याकूब भाटी या तस्कराची भेट घेतली आणि त्याला आपले करिअर बनवले. आता मुश्ताकला दुबईतून सोन्याची तस्करी करण्याचे काम मिळाले. याच काळात मुश्ताक पाकिस्तानी तस्कर तौफीक जालियनवालाच्या संपर्कात आला आणि अवघ्या वर्षभरात मुश्ताक मुंबईचा सोन्याचा मोठा तस्कर बनला. आपल्या धाडसासाठी मुंबईभर प्रसिद्ध असलेल्या मुश्ताकला तस्करीच्या दुनियेत टायगर म्हटले जायचे.

बॉम्बस्फोटाचा कट का रचला गेला : टायगर मेमनने सुरू केलेली तिजारत इंटरनॅशनल कंपनी मुंबईत झालेल्या दंगलीत जाळण्यात आली. यामुळे संतापलेल्या टायगरने मुंबईत बॉम्बस्फोटाची योजना आखण्यास सुरुवात केली. हे साध्य करण्यासाठी टायगरने दुबईमध्ये पाकिस्तानी तस्कर तौफीक जालियनवाला, अनीस इब्राहिम, मुस्तफा दौसा, आयएसआयशी संबंधित काही अधिकारी आणि अनेक अरब श्रीमंत उद्योगपतींसोबत बैठक घेतली. गुप्तचर सूत्रांवर विश्वास ठेवला तर टायगरला या भेटीची सूचना दाऊद इब्राहिमकडून मिळाली होती.

हिंदू नेत्यांच्या हत्येचे नियोजन : शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे आणि अनेक हिंदू नेत्यांच्या हत्येचे नियोजन करण्यासाठी बैठकी सुरू झाल्या पण नंतर बॉम्बस्फोटांनी संपूर्ण मुंबई हादरवून टाकण्याच्या कटावर अंतिम शिक्कामोर्तब झाले. मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटापूर्वी टायगरला मुंबईच्या सहार विमानतळावर उभे असलेले विमान ग्रेनेडने उडवायचे होते. टायगरने हल्ला करण्यासाठी एक टीमही तयार केली होती हे त्याच टीममधील सदस्य आणि मुंबई बॉम्बस्फोटातील आणखी एक आरोपी नासिर अब्दुल कादर केवलला पकडल्यानंतर उघड झाले. नसीरच्या म्हणण्यानुसार आयएसआयच्या सूचनेनंतर टायगरने आपले नियोजन बदलले आणि विमानाऐवजी मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी हल्ल्याचे नियोजन केले. या सर्वांशिवाय ऑईल रिफायनरीवरील हल्ल्याचा कट रचण्यासाठी टायगरचे नावही समोर आले होते.

पाकिस्तानकडून पैसा आणि शस्त्रे : मुंबईतील बॉम्बस्फोट मालिकेसाठी पाकिस्तानकडून पैसा आणि शस्त्रे मिळवण्याची जबाबदारी तौफीक जालियनवाला यांच्यावर सोपवण्यात आली होती आणि टायगर मेमनला सीमेवरून मुंबईत आणण्यासाठी अधिक लोकांची व्यवस्था करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. सीबीआयच्या म्हणण्यानुसार टायगर मेमनने बॉम्बस्फोटात वापरलेले हँडग्रेनेड, डिटोनेटर्स आणि स्फोटके बाहेरून मुंबईत आणली होती. या घटनेत सहभागी असलेल्या आरोपींना प्रशिक्षण देण्यात पाकिस्तान आणि त्याची गुप्तचर संस्था आयएसआयने महत्त्वाची भूमिका बजावली होती.

वाहनांमध्ये आरडीएक्स भरून स्फोट : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फेब्रुवारी ते मार्च 1993 दरम्यान टायगर मेमनने अनेक लोकांना शस्त्रे, बॉम्ब आणि रॉकेट लॉन्चर चालवण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी पाकिस्तानात पाठवले होते. यामध्ये फारुख मुहम्मद, शाहनवाज अब्दुल कादीर कुरेशी, झाकीर हुसेन नूर मोहम्मद शेख, अब्दुल खान, अकरम अमानी मलिक यांच्यासह अनेकांची नावे आहेत हे सर्व बॉम्बस्फोटातील आरोपी होते. सीबीआयच्या आरोपपत्रानुसार 1993 मध्ये टायगर मेमनने अनेकांना सधेरी आणि बोरघाट येथे प्रशिक्षणासाठी पाठवले होते. 11 मार्च 1993 रोजी टायगरच्या घरी वेगवेगळ्या ठिकाणी उभ्या असलेल्या वाहनांमध्ये आरडीएक्स भरून स्फोट घडवून आणण्यात आले.

मैत्रिणीकडून सुगावा सापडला : अत्यंत सावधगिरीने स्फोट घडवून आणूनही स्फोटात वापरलेल्या वाहनाच्या तपासात मेमन कुटुंबीयांचे नाव स्फोटात पुढे आले. या वाहनाची नोंदणी टायगरच्या मेहुणी वर होती. याच दुव्याने मेमन कुटुंबीय पोलिसांनी समोर आणले. नोंदणीच्या कागदपत्रांच्या आधारे त्यांची झडती घेतली असता बॉम्बस्फोटाच्या दिवशी सकाळी मेमन कुटुंबीय दुबईला गेल्याचे समोर आले. यानंतर या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांना टायगरची मैत्रीण सोमा लाला हिची माहिती मिळाली. पोलिसांनी सोमाला अटक करून त्याच्याकडून टायगर आणि त्याच्या मित्रांची माहिती गोळा केली. सूत्रांच्या सांगण्यानुसार याकुबला चार्टर्ड अकाउंटंट बनवण्याचा आणि त्याच्या संपूर्ण खर्चही टायगरनेच उचलला होता. हा संपूर्ण कट पार पाडल्यानंतर टायगर देश सोडून पळून गेला.

कुठे आहे टायगर मेमन: गुप्तचर यंत्रणांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार टायगर मेमन सध्या आयएसआयच्या आश्रयाखाली कराचीमध्ये राहत आहे. तो आपला बहुतेक वेळ दुबई आणि पाकिस्तानमध्ये घालवतो आणि तिथले लोक त्याला व्यापारी म्हणून ओळखतात. मात्र टायगर आणि दाऊद इब्राहिम दोघेही एकत्र काम करत आहेत की टायगरने स्वतःची गँग तयार केली आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार टायगर सध्या रिअल इस्टेट आणि मांस निर्यातीच्या व्यवसायात आहे.

इंटरपोलच्या यादीत मोस्ट वॉन्टेड इंटरनॅशनल क्रिमिनल पोलिस ऑर्गनायझेशन आणि सीबीआय या दोन्हींच्या यादीत टायगर मोस्ट वॉन्टेड आहे. सध्या ते डी कंपनीचे महत्त्वाचे सदस्य मानले जात आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने दाऊद इब्राहिमची माहिती देणाऱ्याला 25 लाख रुपये तर छोटा शकीलची माहिती देणाऱ्याला 20 लाख रुपये देण्यात येतील असे जाहिर केले आहे. तसंच हाजी अनिस शेख, जावेद चिकना आणि टायगर मेनन यांच्यावर प्रत्येकी 15 लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.