ETV Bharat / city

History of Rebellion of Shiv Sena Leaders : शिवसेनेतील प्रभावी नेत्यांच्या बंडाचा इतिहास

राज्यात शिवसेनेसमोर एकनाथ शिंदे ( Cabinet Minister Eknath Shinde ) यांच्या नावाने उभे राहिलेले बंडाचे वादळ या पूर्वीदेखील शिवसेनेमध्ये अनेक नेत्यांच्या मार्फत आलेले आहे. शिवसेना स्थापन झाल्यानंतर शिवसेनेमध्ये अशा बंडाची ( Influential rebel leaders in the Shiv Sena ) अनेक उदाहरणे देता येतील. उद्धव ठाकरे यांचे चुलत भाऊ आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( MNS president Raj Thackeray ), नारायण राणे ( BJP Union Minister Narayan Rane ), छगन भुजबळ (Minister Chhagan Bhujbal ), गणेश नाईक ( Ganesh Naik ) आणि आता एकनाथ शिंदे यांच्यासारख्या अनेक नेत्यांनी या पूर्वीदेखील शिवसेनेच्या विरोधात बंड केलेला आहे. त्यामुळे शिवसेनेला बंडाचा जुना इतिहास आहे.

Influential rebel leaders in the Shiv Sena
शिवसेनेतील बंड केलेले प्रभावी नेते
author img

By

Published : Jun 21, 2022, 10:26 PM IST

मुंबई : राज्यात शिवसेनेसमोर एकनाथ शिंदे यांच्या नावाने उभे राहिलेले ( Eknath Shinde in front of Shiv Sena ) बंडाचे वादळ या पूर्वीदेखील शिवसेनेमध्ये अनेक नेत्यांच्या मार्फत आलेले आहे. शिवसेना स्थापन झाल्यानंतर शिवसेनेमध्ये अशा बंडाची अनेक उदाहरणे ( ( Influential rebel leaders in the Shiv Sena ) देता येतील. उद्धव ठाकरे यांचे चुलत भाऊ आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे, नारायण राणे, छगन भुजबळ, गणेश नाईक आणि आता एकनाथ शिंदे यांच्यासारख्या अनेक नेत्यांनी या पूर्वीदेखील शिवसेनेच्या विरोधात बंड केलेला आहे. त्यामुळे शिवसेनेला बंडाचा जुना इतिहास आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ : एकनाथ शिंदे यांच्या या बंडाची माहिती जगजाहीर होताच राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली. शिंदेंच्या मनधरणीसाठी पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी जोरदार प्रयत्न केले. पण, मंगळवारी संध्याकाळचे 5 वाजून गेले तरी या बंडावर तोडगा निघाला नाही. अखेर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उरलेल्या आमदारांची बैठक घेत शिंदे यांच्यावर मोठी कारवाई केली आणि त्यांना शिवसेनेच्या गटनेते पदावरून हटवले.

शिवसेना ही आपल्या आक्रमक स्वभावामुळे वाढली अन् रुजली. तसे अनेक नेतेही शिवसेनेने तयार केले. त्यामध्ये छगन भुजबळ यांच्यासारखे बहुजन समाजातील नेतृत्व पुढे आलं. त्यांना शिवसेनेनं ताकदही दिली. पण, आपलं कष्ट अन् कर्तृत्व अधिक असतानाही आपल्याला डावललं जात असल्याची भावना भुजबळांच्यात वाढली. पुढे मनोहर जोशी यांना विरोधी पक्ष नेते पद दिले. तेव्हा ही भावना भुजबळ यांच्या मनात वाढली आणि मंडल आयोगाला सेनेकडून विरोध होताच ओबीसीची बाजू घेत भुजबळ सेनेतून 1991 साली 18 आमदार घेऊन बाहेर पडले. आपला वेगळा गट त्यांनी विधानसभेत तयार केला. मात्र, सेनेतून बाहेर पडल्यानंतर निष्ठावंत अन् कडव्या शिवसैनिकांनी भुजबळांना प्रचंड त्रास दिला. त्यांच्यावर कडव्या शिवसैनिकांनी हल्लेही केले. अगदी मंत्री असताना मिलिंद वैद्य यांनी लखोबाच्या घोषणा देत दगडफेक केली. हेच वैद्य पुढे मुंबईचे महापौर झाले, तर शिवसैनिकांनी भुजबळांच्या सरकारी A10 या बंगल्यावर हल्ला केला होता. त्याचं नेतृत्व विलास अवचट यांनी केलं होतं. पुढं ते एका महामंडळाचे अध्यक्ष झाले होते.

गणेश नाईक : गणेश नाईक हे शिवसेनेतील तगडे नेते होते. युती सरकारमध्ये ते वनमंत्री होते. त्यांनाही बाहेर पडावं लागलं. गणेश नाईक यांना कडव्या शिवसैनिकांच्या रागाला रस्त्यावर सामना करावा लागला नाही, तरी विधान सभा निवडणुकीत परभवाचा सामना करावा लागला होता.

नारायण राणे : नारायण राठे यांनी मोठं बंड केलं. 2005 साली उद्धव ठाकरे यांच्यामुळे आपण सेनेतून बाहेर पडत आहोत, असा आरोप करीत ते बाहेर पडले. त्यांच्यासोबत 11 आमदार होते. राणे समर्थक आणि शिवसैनिक यांच्यात कोकणात खूप काळपर्यंत राडा सुरू होता. राणे समर्थकांनी मुंबईत सामनाचा अंक जाळण्यापर्यंत प्रतिउत्तर दिले होतं.

राज ठाकरे : त्यानंतर सेनेला सर्वात मोठा फटका बसला तो राज ठाकरे यांच्या बाहेर पडल्याने. महाबळेश्वर येथे झालेल्या सेनेच्या बैठकीत राज ठाकरे यांनीच उद्धव ठाकरे यांच्या नावाची घोषणा केली. सेनेत आपलं भविष्य नसल्याचं स्पष्ट होताच, 'माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरले आहे, असा आरोप करीत त्यांनी शिवसेनेला "जय महाराष्ट्र" केला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे शिवसेनेत असताना त्यांना शिवसेनेची सूत्रे हातात न दिल्याने नाराज झाल्यानंतर राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडत नवीन पक्षाची स्थापना केली होती.

बाळासाहेबांच्या काळातील बंड थोपवली : छगन भुजबळ, गणेश नाईक, नारायण राणे यांच्या रूपाने बाळासाहेबांच्या काळांत बंड झाली. पण त्यावेळी स्वतः बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकांच्या हृदयावर राज्य होतं. त्यामुळे ते सरकारचा रिमोट कंट्रोल माझ्या हाती आहे, असे जाहीर सभेत सांगायचे. जेव्हा मनोहर जोशी यांचं प्रस्थ वाढायला लागलं तेव्हा शिवसेना प्रमुख पदाचा राजीनामा देण्याची घोषणा करून बाळासाहेबांनी खळबळ उडवून दिली होती. तेव्हा हा निर्णय मागे घ्यावा यासाठी राज्यभरातून शिवसैनिक मातोश्रीवर दाखल झाले होते. एकूणच बाळासाहेब ठाकरे यांच्या करिष्म्याच्या जोरावर आणि शिवसैनिकांचे ते दैवत असल्यानं अनेक बंड झाली पण शिवसेनेची ताकद कायम राहिली.

शिवसेनेचे ठाण्यातील प्रभावी नेतृत्व एकनाथ शिंदे : आता शिवसेनेत ठाण्यातून एकनाथ शिंदे यांच्या रूपाने बंड झाल्यानं खळबळ उडाली आहे. पण ठाण्याच्या इतिहासात शिवसेनेच्या महापौराला मतदान न केल्याने सेनेचा महपौर पदाचा उमेदवार पराभूत झाला होता. त्याची शिक्षा बंड करणाऱ्या श्रीधर खोपकर यांना सेनेने दिली होती. हे सर्वश्रुत आहे. आनंद दिघे यांचं ठाण्यात एकहाती नेतृव होतं. त्यांच्याच तालमीत तयार झालेले एकनाथ शिंदे या वेळच्या बंडाचं नेतृत्व करीत आहेत. हे बंड कितपत यशस्वी होणार की सेनेच्या नेतृत्वाकडून काही अधिकचं पदरात पाडून घेत हे बंड शमवणार हे लवकरच स्पष्ट होईल.

हेही वाचा : Maharashtra Political Crisis : शिवसैनिक शिवसेना भवनासमोर संतप्त; एकनाथ शिंदेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.