ETV Bharat / city

युतीत असताना आमचा श्वास कोंडला होता, आगामी विधानसभेला स्वबळावर सत्तेत येऊ -फडणवीस - भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

भाजप विरोधात तीन पक्षांनी आघाडी केल्यामुळे त्या पक्षांचा अवकाश कमी होऊन श्वास कोंडला गेला आहे. तर, दुसरीकडे भाजपला संपूर्ण राज्यभर मोकळ्या श्वासाने काम करून पक्ष विस्ताराची संधी मिळाली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष स्वबळावर सत्तेवर येईल. असा विश्वास विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. ते शिवसेनेच्या आशा बुचके यांनी आपल्या समर्थकांसह भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला, त्यावेळी बोलत होते.

शिवसेनेच्या नेत्या व पुणे जिल्हा परिषद सदस्य आशा बुचके यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला.

author img

By

Published : Aug 19, 2021, 4:48 PM IST

मुंबई - भारतीय जनता पार्टीच्या विरोधात तीन पक्षांनी आघाडी केल्यामुळे त्या पक्षांचा अवकाश कमी होऊन श्वास कोंडला गेला आहे. तर, दुसरीकडे भाजपला संपूर्ण राज्यभर मोकळ्या श्वासाने काम करून पक्ष विस्ताराची संधी मिळाली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष स्वबळावर सत्तेवर येईल. असा विश्वास विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. ते शिवसेनेच्या नेत्या व पुणे जिल्हा परिषद सदस्य आशा बुचके यांनी आपल्या समर्थकांसह भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला, त्यावेळी बोलत होते. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते.

'भाजपाला पक्षविस्ताराची सुवर्णसंधी'

भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे आपल्याला मोकळा श्वास घेतल्यासारखे वाटते, असे आशा बुचके यांनी प्रवेश केल्यानंतर सांगितले होते. त्याचा धागा पकडून देवेंद्र फडणवीस यांनी वरील टिप्पणी केली. राज्यात तीन पक्षांचे आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर भाजपला पक्षविस्ताराची सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. युतीमध्ये असताना भाजपला पक्ष विस्ताराला संधी मिळत नव्हती. आता तीन पक्ष एकत्र आल्यामुळे त्यातील घटक पक्षांचा श्वास कोंडू लागला आहे. आगामी काळात संपूर्ण महाराष्ट्रात मोकळ्या श्वासाने पक्षाचे काम करू आणि (2024)च्या विधानसभा निवडणुकीत स्वबळावर भाजपला सत्तेवर आणू, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

'...त्यावेळी आमदार झालेले पाहू'

आशाताईंसारख्या कार्यकर्त्या सत्तारूढ पक्षातून भाजपमध्ये येतात ही स्वबळावरील विजयाची नांदी असल्याचेही फडणवीस यावेळी म्हणाले आहेत. आशाताई बुचके यांना शिवसेनेत न्याय मिळाला नाही. पण भाजपमध्ये त्यांचा सन्मान राखला जाईल आणि त्यांना न्याय मिळेल. जेव्हा विधानसभेची निवडणूक होईल त्यावेळी त्यांना आमदार झालेले पाहू, असे यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

हेही वाचा - पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 'त्या' मंदिरातील पुतळा हटवला, बंद मंदिरासमोर राष्ट्रवादीचे आंदोलन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.