PM Modi US Tour : वॉशिंग्टनमध्ये पोहोचले, लोकांचे स्वागत, क्वाड कॉन्फरन्सला हजेरी लावणार
मुंबई - पंतप्रधान मोदी तीन दिवस वॉशिंग्टनमध्ये राहणार आहेत. पीएम मोदी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेला संबोधित करतील आणि क्वाड देशांच्या नेत्यांसोबत बैठक घेतील. याशिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. त्यानंतर ते न्यूयॉर्कला रवाना होतील जेथे ते संयुक्त राष्ट्र महासभेच्या 76 व्या अधिवेशनाला उपस्थित राहतील.
Election of Congress President : काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण होणार?, 24 सप्टेंबरपासून नामांकन प्रक्रिया सुरू
काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण होणार? यासाठी तुम्हाला किमान 30 सप्टेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल. 24 सप्टेंबरपासून नामांकन प्रक्रिया सुरू होणार असून 30 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. 23 सप्टेंबर रोजी एक दिवस भारत जोडो यात्रा थांबवून राहुल गांधी दिल्लीत येतील. त्यानंतर ते 24 सप्टेंबरपासून यात्रा पुन्हा सुरू करतील.
Dussehra Melava : दसरा मेळाव्याबाबत शिवसेनेच्या याचिकेवर आज सुनावणी
आज मुंबई उच्च न्यायालयात दसरा मेळ्याव्याप्रकरणी सुणावनी होणार आहे. शिवसेना विरूद्ध शिंदे गट असा वाद रंगला असतांना मुंबई महापालिकेने दोघांनी सुरक्षेच्या कारणावरून मेळाव्याची परवानगी नाकारली आहे. शिवसेनेने दाखल केलेल्या याचिकेवर कोर्ट काय निर्णन देणार याकडे सर्व राज्याचे लक्ष लागले आहे.
NIA Raid On PFI : केंद्रीय एजन्सींच्या कारवाईचा तीव्र निषेध ( NIA Raid On PFI ) व्यक्त करत पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) ने केरळमध्ये सकाळपासून संप पुकारला आहे. एनआयएच्या नेतृत्वाखालील विविध एजन्सींनी PFI ची कार्यालये, नेत्यांची घरासह इतर ठीकाणी टाकलेल्या छाप्यांचा निषेध करण्यासाठी पीएफआय कार्यकर्त्यांनी निदर्शने करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील दहशतवादी कारवायांना कथितपणे निधी पुरवल्याप्रकरणी हे छापे टाकण्यात आले होते.
आज आष्टी रेल्वे धावणार - मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दाखवणार हिरवा झेंडा
बीड नगर, आष्टी मार्गावर आज पहिल्यांदाच रेल्वे धावणार आहे. रेल्वेचा शुभारंभ ( Inauguration of Beed Nagar Ashti, Railway ) केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करणार आहेत.
Amit Shah Bihar Visit : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज 2 दिवसांच्या ( Amit Shah Bihar Visit ) बिहारच्या दौऱ्यावर आहेत. आज सकाळी 10 ते 10.30 च्या दरम्यान ते पूर्णियातील चुनापूर विमानतळावर उतरतील. तेथून थेट पूर्णियातील इंदिरा गांधी स्टेडियमवर पोहोचतील. सकाळी साडेअकरा वाजल्यापासून त्यांची जनभावना रॅली आहे. येथे जाहीर सभेला संबोधित केल्यानंतर ते पुन्हा सिठे पूर्णिया येथील चुनापूर विमानतळावर जातील. तेथून ते हेलिकॉप्टरने किशनगंज येथे पोहोचतील. दुपारी चार वाजता ते किशनगंज येथील माता गुजरी विद्यापीठात बिहार भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. बिहार भाजप कोअर ग्रुपची ही बैठक सायंकाळी ५ वाजल्यापासून सुरू होणार आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या बारामती दौऱ्याचा दुसरा दिवस
Nirmala sitaraman : अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala sitaraman) बारामती (Baramati) दौऱ्यावर आहेत. निर्मला सीतारमण या पदाधिकऱ्यांची बैठक घेणार आहेत.