नवी मुंबई - मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत आज १०० किलोंप्रमाणे मिरच्यांचे दर ५०० ते ८०० रुपयांनी कमी झाले आहेत. तर वाटाण्याचे दरही १००० रुपयांनी कमी झाले आहेत. तोंडलीचे दरही हजार ते आठशे रुपयांनी कमी झाले आहेत. टोमॅटोचे दरही ५०० ते ७०० रुपयांनी कमी झाले आहेत. घेवड्याचे व फरसबीचे दर १००० रुपयांनी वाढले. लिंबाचे दर पाचशे रुपयांनी वाढले आहेत. इतर सर्व भाज्यांचे दर स्थिर असल्याचे दिसून आले.
भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे:
भेंडी नंबर २ प्रति १०० किलो २७०० ते ३००० रुपये
भेंडी नंबर १प्रति १०० किलो ३५०० ते ३८०० रुपये
लिंबू प्रति १०० किलो ५००० ते ६५०० रुपये
फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे
७५०० ते ९००० रुपये
फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे १४०० रुपये ते १६०० रुपये
गाजर प्रति १०० किलो प्रमाणे २६०० रुपये ते ३००० रुपये
गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ४३०० ते ४८००
घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ६००० ते ७००० रुपये
कैरी प्रति १०० किलो प्रमाणे ३७०० रुपये ते ४००० रुपये
काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे १८०० ते २००० रुपये
काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १५०० ते १६०० रुपये
कारली प्रति १०० किलो प्रमाणे ३१०० ते ३४०० रुपये
कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे २९०० ते ३४०० रुपये
कोबी प्रति १०० किलो प्रमाणे १६०० ते १८०० रुपये
कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे २५०० ते ३००० रुपये
ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० ते ४००० रुपये
पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे २६०० ते २८००रुपये
रताळी प्रति १०० किलो प्रमाणे २८०० ते ३२००रुपये
शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ४५०० ते ५००० रुपये
शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे २९०० ते ३४०० रुपये
सुरण प्रति १०० किलो प्रमाणे
२२०० ते २६०० रुपये
टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २३०० ते २६०० रुपये
टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १८०० ते २०००रुपये
तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० ते ४००० रुपये
तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे २८०० ते ३००० रुपये
वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे ९०००ते ११००० रुपये
वालवड प्रति १०० किलो प्रमाणे ४१०० ते ४४००रुपये
वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे २००० ते २४०० रुपये
वांगी गुलाबी प्रति १०० किलो प्रमाणे २००० रुपये ते २४००
वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे १६०० ते १८०० रुपये
मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ३५००ते ४००० रुपये
मिरची लंवगी प्रति १०० किलो प्रमाणे ३००० ते ३२०० रुपये
पालेभाज्या
कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या २००० रुपये ते २६०० रुपये
कंदापात पुणे प्रति १०० जुड्या १४०० रुपये १५०० रुपये
कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या २००० ते ३००० रुपये
कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या १२०० ते १६००
मेथी नाशिक प्रति १०० जुड्या १८०० ते २६०० रुपये
मेथी पुणे प्रति १०० जुड्या १२००ते १६०० रुपये
मुळा प्रति १०० जुड्या १८०० रुपये ते २४०० रुपये
पालक नाशिक प्रति १०० जुड्या ५०० रुपये ते ६०० रुपये
पालक पुणे प्रति १०० जुड्या ६०० रुपये ९०० रुपये
पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या
६०० ते ७०० रुपये
शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १६०० रुपये २००० रुपये
शेपू पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये १४०० रुपये.