मुंबई - लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण ( Lata Mangeshkar Corona Positive ) झाली आहे. त्यांना ब्रिच कॅंडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना सौम्य लक्षणे आढळून आली आहेत तरी त्यांची प्रकृती स्थिर आहे. परंतु, खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे.
मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू -
कोरोनाची लागण झाल्यामुळे लता मंगेशकर यांना न्युमोनिया झाला आहे. याला कोविड न्युमोनिया असे म्हटले जाते. दरम्यान, लता मंगेशकर यांना रविवारी रात्री मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, लता मंगेशकर यांना कोविड न्युमोनिया झाला आहे. रविवारी पहाटे त्यांना ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर आयसीयूत उपचार सुरु आहेत. तसेच, मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातील डॉ. प्रतित समदानी आणि त्यांची टीम लता दीदींवर उपचार करत आहेत.
भारतरत्न पुरस्कारसह बहुविविध सन्मानाने सन्मानित -
दरम्यान, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना गानकोकीळा म्हणून ओळखले जातं. आज त्याचे वय 92 वर्ष आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीत हजारो गाणी गायिली आहेत. त्यांना भारतरत्न पुरस्कारसह बहुविविध सन्मानाने सन्मानित करण्यात आले आहे. हिंदी संगीतविश्वात त्यांना 'लता दीदी' म्हणून ओळखले जाते.
-
Legendary singer Lata Mangeshkar admitted to ICU after testing positive for Covid-19. She has mild symptoms: Her niece Rachna confirms to ANI
— ANI (@ANI) January 11, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
(file photo) pic.twitter.com/8DR3P0qbIR
">Legendary singer Lata Mangeshkar admitted to ICU after testing positive for Covid-19. She has mild symptoms: Her niece Rachna confirms to ANI
— ANI (@ANI) January 11, 2022
(file photo) pic.twitter.com/8DR3P0qbIRLegendary singer Lata Mangeshkar admitted to ICU after testing positive for Covid-19. She has mild symptoms: Her niece Rachna confirms to ANI
— ANI (@ANI) January 11, 2022
(file photo) pic.twitter.com/8DR3P0qbIR
हेही वाचा - Corona Update : भारतात कोरोना रुग्णांमधे घट, 1.68 लाख नवीन रुग्णांची नोंद