मुंबई- निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी चांदीवाल आयोगात दिलेल्या कबुलीने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. याविषयी कायतेतज्ज्ञांचे मत ( Legal Expert on Sachin Wazes recovery confession ) जाणून घेऊ.
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी वसुली प्रकाराचा आरोप लावल्यानंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत दिवसेंदिवस ( Anil Deshmukh in Trouble ) वाढत होत आहे. राज्य सरकारने अनिल देशमुख यांच्या चौकशीकरता चांदीवाल आयोगाची घोषणा केली आहे. या आयोगामार्फत देशमुख यांची चौकशी होत आहे. या प्रकरणातील आरोपी असलेले सचिन वाझे यांनी अनिल देशमुख यांच्याकडून बार मालकांकडून वसुली करण्याचे आदेश देण्यात आले होते, असे प्रतिज्ञापत्र ( Sachin Waze affidavit in Chandiwal commission ) सादर केले. मात्र आयोगाने ते प्रतिज्ञापत्र फेटाळले आहे. असे असले तरी वाझे यांनी अशाप्रकारे कबुली दिल्याने अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
हेही वाचा-Pandharpur crime : पुष्पा चित्रपटाची पुनरावृत्ती; 138 किलो चंदन पोलिसांनी केले जप्त
अनिल देशमुख यांच्या आयोगासमोर सुरू असलेल्या चौकशीदरम्यान आरोप करणारे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे असे म्हटले होते की माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेले आरोप हे ऐकी माहितीवरून केलेले आहे. माझ्याकडे यासंदर्भात कुठलेही पुरावे नाहीत.
हेही वाचा-Brothers killed sister's husband : मनाविरुद्ध लग्न केल्याने भावांनी केली बहिणीच्या नवऱ्याची हत्या
माजी पोलीस अधिकारी म्हणतात...
एखाद्या प्रकरणात आरोपी जर आपली साक्ष बदलत असेल तर त्याला काही अर्थ नसतो. कारण आरोपीने साक्ष बदललेले वक्तव्य आणि त्या प्रकरणामधील असलेले पुरावे हे लक्षात घेऊनच त्यासंदर्भातील न्यायालय निर्णय घेत असते, असे माजी पोलीस अधिकारी धनराज वंजारे यांनी म्हटले आहे. सचिन वाझे यांनी साक्ष बदलली आहे. हे कशाप्रकारे ग्राह्य धरावे, हा सर्वस्वी अधिकार हा आयोगाचा असतो. त्यामुळे प्रकरणाच्या तपासामध्ये काय भूमिका घ्यायची, कोणाला काय संधी द्यायची आणि निर्णय आयोग करत असतो. त्यामुळेच आयोगाने कायद्याच्या कचाट्यात राहूनच वाझे यांचे प्रतिज्ञापत्र फेटाळले आहे, असे कायदेतज्ज्ञ कनिष्क जयंत ( Adv Kanishk Jayant on Chadiwal commission ) यांनी म्हटले आहे.
हेही वाचा-Thane Police : कर्मचाऱ्यानेच साथीदारांसह मारला लुटला पेट्रोल पंपाच्या गल्ल्यावर डल्ला, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
सचिन वाझेंनी काय जबाब दिला होता?
निलंबित आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. या आरोपांच्या चौकशीसाठी चांदीवाल आयोगाची स्थापना करण्यात आली होती. त्यावेळी सचिन वाझेनी अनिल देशुमख यांना उलट तपासणीसाठी क्लीन चीट दिली होती. मात्र, आता सचिन वाझे यांनी आपल्या जबाबात बदल करण्याचा अर्ज केला होता. सचिन वाझेचा हा अर्ज आयोगाने फेटाळून लावला आहे.
अनिल देशमुख यांच्याशी संबंधित लोक पैसे मागायचे?
अनिल देशमुख यांच्या वैयक्तिक कर्मचार्यांनी किंवा त्यांच्याशी संबंधित कोणत्याही व्यक्तीने तुमच्याकडे कधीही पैशांची मागणी केली नाही असे म्हणणे योग्य ठरेल का? असा प्रश्न आयोगाने विचारला होता. त्यावेळी वाझेंनी नाही उत्तर दिले. पंरतु आता त्यांना या जबाबामध्ये बदल करायचा आहे. अनिल देशमुख यांच्याशी संबंधित लोक त्यांच्यावतीने माझ्याकडे पैसे मागायचे. मला अनिल देशमुख आणि त्यांच्या लोकांकडून पैसे घेण्यास सांगितले गेले, असे वाझे यांनी अर्जात नमूद केले आहे.