ETV Bharat / city

BMC Will Take Action Water Meters : नादुरुस्त पाण्याच्या मीटरबाबत मुंबईकरांवर होणार कायदेशीर कारवाई - मुंबई पाणी मीटर बसवणार

महापालिकेकडून पाणीपुरवठा केला जातो. (Legal action for faulty water meters) मुंबईकरांना किती पाणीपुरवठा केला यासाठी पालिकेने मीटर बसवले आहेत. खासगी सोसायटीमधील बसवलेले पाण्याचे मिटर दर ५ वर्षांनी बदलावे लागणार आहेत. मिटर सुस्थितीत असल्यास त्यासाठी दरवर्षी प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे.

मुंबईकरांना महापालिका
मुंबईकरांना महापालिका
author img

By

Published : Feb 9, 2022, 7:38 AM IST

मुंबई - मुंबईकरांना महापालिकेकडून पाणीपुरवठा केला जातो. नागरिकांना किती पाणीपुरवठा केला यासाठी पालिकेने मीटर बसवले आहेत. खासगी सोसायटीमधील बसवलेले पाण्याचे मिटर दर ५ वर्षांनी बदलावे लागणार आहेत. (Legal action against Mumbaikars for faulty water meters) मिटर सुस्थितीत असल्यास त्यासाठी दरवर्षी प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे. मीटर नादुरुस्त झाल्यास तो एक महिन्यात दुरुस्त करावा लागणार आहे, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. (Municipal Corporation to faulty water meters) तसेच मिटर १० वर्षात चोरीला गेल्यास अथवा नादुरुस्त झाल्यास संबंधित ग्राहकांना मिटरची किंमत दरवर्षी १० टक्क्याने कमी करून असलेली रक्कम भरावी लागणार आहे.

पाण्याच्या मीटरबाबत नियमात बदल -

मुंबई महापालिकेने (२००९ ते २०१६)या कालावधीत शहर, पश्चिम व पूर्व उपनगर या ठिकाणी तीन वेगवेगळ्या कंत्राटदारांमार्फत ९५ हजार पाण्याचे स्वयंचलित मिटर बसवले आहेत. या मिटरमध्ये काही बिघाड झाल्यास पालिकेकडून त्याची दुरुस्ती केल्यास त्याचे शुल्क संबंधितांना भरावे लागते. (Legal action for faulty water meters) या मिटरच्या संपूर्ण सुरक्षिततेची जबाबदारीही त्या ग्राहकांची असते. यापूर्वी पाण्याचे मिटर १ ते १० वर्षात केव्हाही चोरीला गेल्यास अथवा ते निकामी झाल्यास, नादुरुस्त झाल्यास संबंधितांना मिटरची संपूर्ण रक्कम भरावी लागत असे.

त्याचा भुर्दंड नागरिकांना बसत असे. ग्राहक व पालिका अधिकारी यांच्यात मिटरची किंमत वसूल करण्यावरून वादविवाद होत असत. त्यामुळे काही नगरसेवकांनी याप्रकरणी पालिकेने गांभीर्याने लक्ष घालून समाधानकारक तोडगा काढण्याची विनंती केली होती. त्यावरून पालिकेने पुरवठा केलेले पाण्याचे मिटर जर एक ते दहा वर्षात चोरीला गेल्यास अथवा नादुरुस्त झाल्यास संबंधित ग्राहकाने मिटरची रक्कम व भंगार किंमत अशी रक्कम भरण्याबाबत नवीन नियम तयार केले असून त्याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या आगामी बैठकीत मंजूरीसाठी आणला आहे.

नियमात असे केले आहेत बदल -

पालिकेचा मिटर चोरीला गेल्यास अथवा नादुरुस्त झाल्यास संबंधित ग्राहकाने तो मिटर जर पहिल्या वर्षी चोरीला गेल्यास मिटरची संपूर्ण रक्कम व त्या मिटरचे भंगार मूल्य अंदाजे किमान २८० ते ६४३ रुपये इतके भरावे लागणार आहे. मिटर दुसऱ्या वर्षात चोरीला गेल्यास मिटरच्या एकूण किमतीच्या १० टक्के रक्कम कमी करून व भंगार मूल्य भरावे लागणार आहे. जर मिटर पाचव्या वर्षात चोरीला गेल्यास सदर मिटरच्या एकूण किमतीच्या ४० टक्के रक्कम आणि मिटरचे भंगार मूल्य भरावे लागणार आहे. जर मिटरची १० वर्षाची मुदत संपल्यावर तो मिटर चोरीला गेल्यास संबंधित ग्राहकाला मिटरची संपूर्ण किंमत न भरता फक्त मिटरचे भंगार मूल्यच भरावे लागणार आहे.

...तर कायदेशीर कडक कारवाई -

पाण्याच्या स्वयंचलित मिटरची किंमत कंपनी ठरवते. सर्वसाधारणपणे १५ मिलीमीटर मीटरची किंमत ११,२५० रुपये, २० मिलीमीटर मिटरची किंमत १३,३०० रुपये, २५ मिलीमीटर मिटरची किंमत २३,४८३ रुपये, ४० मिलीमीटर मिटरची किंमत ३४,७७१ रुपये, ५० मिलीमीटर मिटरची किंमत ५४,५३३ रुपये, ८० मिलीमीटर मिटरची किंमत ६९,८९५ रुपये, १०० मिलीमीटर मिटरची किंमत ९२,१८२ रुपये किंमत आहे. तसेच, नादुरुस्त व चोरीला मिटर गेल्यानंतर संबंधितांनी नवीन मिटर बसवून ते कार्यान्वित न केल्यास संबंधितांवर करण्यात येणार आहे. खासगी मिटर धारकांनी मिटर नादुरुस्त झाल्यास एका महिन्यात ते मिटर कार्यान्वित करावे लागणार आहेत.

हेही वाचा - ईडी'च्या कारवाईवरून शिवसेना खासदार संजय राऊतांचे उपराष्ट्रपतींना पत्र, म्हणाले...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.