मुंबई- केंद्र सरकारने तयार केलेले तीन नवे कृषी कायदे, सहकार कायदा आणि पीक विमा या मुद्यांवर चर्चा करण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, कृषिमंत्री दादा भुसे आणि सहकार व कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. केंद्राने तयार केलेल्या कृषी कायद्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी असून शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकार पाऊल उचलेल. त्यासंबंधी शरद पवार यांची भेट घेतली असल्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या हितासाठी पावसाळी अधिवेशनात कायदा तयार केला जाणार असल्याचे यावेळी बाळासाहेब थोरात यांच्याकडून सांगण्यात आले. राज्यात एपीएमसी मार्केट पद्धती सुरूच राहणार आहे. नवीन कृषी कायद्यामुळे एपीएमसी मार्केटमध्ये कोणतेही बदल केले जाणार नसल्याचे यावेळी बाळासाहेब थोरात यांच्याकडून सांगण्यात आले.
कृषी कायदे आणि पिक विम्या संदर्भात आघाडी सरकारच्या नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट - कृषी कायद्या बद्दल बातमी
कृषी कायदे आणि पिक विम्या संदर्भात आघाडी सरकारच्या नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट. यावेळी नवीन कृषी कायद्यामुळे एपीएमसी मार्केटमध्ये कोणतेही बदल केले जाणार नसल्याचे यावेळी बाळासाहेब थोरात यांच्याकडून सांगण्यात आले.