मुंबई : होय आम्ही 'कश्मिर फाइल्स' पाहायला गेलो होतो, आणि 'डंके की चोट पे' गेलो होतो. अतिशय चांगला चित्रपट आहे आणि सर्वांनी पाहायला पाहिजे, असा हा चित्रपट आहे. त्यामुळे कामकाज सोडून चर्चेच्या वेळी आम्ही चित्रपट पाहायला गेलो यात काही गैर वाटत नाही, असे म्हणत विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाचे कामकाज सोडून चित्रपट पाहण्यास जाण्याच्या स्वतःच्या कृतीचे समर्थन ( Devendra Fadnavis On The Kashmir Files ) केले. चर्चेच्यावेळी विरोधी बाकावर कोणीच नव्हतं, असा मुद्दा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी उपस्थित केला ( Jayant Patil Criticized Opposition ) होता. त्यावर फडणवीस बोलत होते.
कश्मिरी पंडितांच्या घरांसाठी पैसे द्या : पाटील दरम्यान काश्मीर फाईल हा चित्रपट मध्यंतरानंतर फारच बोअर असल्याची टिप्पणी जयंत पाटील यांनी सभागृहात ( Jayant Patil On Kashmir Files Movie ) केली. सत्तर कोटीत तयार केलेला या चित्रपटाने आता दीडशे कोटी रुपये कमावले आहेत. त्यामुळे निर्मात्यांनी वर कमावलेला पैसा काश्मिरी पंडितांच्या घरांसाठी देणगी ( Donations For Kashmiri Pandits Houses ) म्हणून द्यावा, असा सल्लाही पाटील यांनी यावेळी दिला.