ETV Bharat / city

पूरग्रस्तांना एनडीआरएफच्या निकषाबाहेर जाऊन मदत करा - अजित पवार

पूरग्रस्त भागाचे तात्काळ पंचनामे करून एनडीआरएफ ( NDRF ) निकषाबाहेर जाऊन तात्काळ मदत करावी, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांच्याकडे केल्याची माहिती विरोधी पक्षनेते अजित पवार ( Leader of Opposition Ajit Pawar ) यांनी दिली.

Ajit Pawar
अजित पवार
author img

By

Published : Jul 18, 2022, 6:36 PM IST

मुंबई - राज्यात मुसळधार पाऊस ( Heavy rain in Maharashtra ) होत असून काही जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण ( Flood situation in some districts ) झाली आहे. शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पूरग्रस्त भागाचे तात्काळ पंचनामे करून एनडीआरएफ ( NDRF ) निकषाबाहेर जाऊन तात्काळ मदत करावी, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांच्याकडे केल्याची माहिती विरोधी पक्षनेते अजित पवार ( Leader of Opposition Ajit Pawar ) यांनी दिली. निधी गोठवणाऱ्या शिंदे सरकारने मतदारांवर अन्याय करू नये, असा सल्ला पवार त्यांनी शिंदे सरकार दिला. विधानभवनात प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.

राज्यात जनजीवन विस्कळीत - राज्यात पावसाने हाहाकार माजला आहे. काही भागात नदी नाल्यांना पूर आला असून पूरस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झाले. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. अतिवृष्टीने नुकसान झाले असून, मदतीची राज्यात गरज गरज आहे. तसेच अतिवृष्टीमुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. वित्तहानी सोबतच जीवीतहानीही मोठ्या प्रमाणात होत आहे. असे असतानाही अद्यापपर्यंत मदत ही पोहचलेली नसल्याचा आरोप पवार यांनी केला आहे. मृतांच्या कुटुंबियांना तातडीने मदत मिळणे गरजेचे आहे. खरीप हंगामातील पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना मदतीच्या अनुशंगाने पीक पंचनामे होणे गरजेचे असताना स्थानिक पातळीवरील यंत्रणा अद्यापही कामाला लागेलेली नाही. नुकसानीच्या तुलनेत मदतकार्य झालेले नाही. पूरग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत करावी, ठाकरे सरकार असताना निकषाबाहेर मदत केली होती. त्यानुसार यावेळी ही मदत करण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार ( Leader of Opposition Ajit Pawar ) यांनी केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट - राज्यात सत्तांतर होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारने ( Maha Vikas Aghadi Govt ) घेतलेल्या निर्णयांना स्थगिती देण्याचा धडाका सुरु केला होता. महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयावर बोट ठेवत त्यांना स्थगिती दिली जात होती. त्यामुळे विकास कामांमध्ये राजकारण न आणता कामांना स्थगिती देऊ नये या मागणीसाठी विरोधकांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वात सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार यावेळी उपस्थित होते. पुणे ते इंदोरला जाणारी बस उलटून दुर्घटना झाली. ही बस मूळची अमळनेर आहे. इंदोर शासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, बसमधील सगळी लोक गेली. जिवंत राहिली असतील असे वाटत नाही. दुर्घटनेतील प्रवाशांचा शोधकार्य सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन, राज्य स्तरावर मदत करावी, अशी मागणी केल्याचे पवार म्हणाले.

आमदारांचे प्रकरण न्याय प्रविष्ट - ऑगस्टमध्ये अधिवेशन जाईल. राष्ट्रपती पदासाठी मतदान सुरू आहे. उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक होईल. त्यात मंत्रिमंडळ विस्तार रखडला आहे. जोपर्यंत निर्णय होत नाही, तोपर्यंत अधिवेशन होणार नाही. त्यामुळे ऑगस्टमध्ये अधिवेशन होण्याची शक्यता आहे. अशातच बंडखोर आमदारांचे प्रकरण न्याय प्रविष्ट आहे. २० तारखेला निकाल आहे. या निकालाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे, असे विरोधी पक्षनेते पवार म्हणाले.

जीएसटी रद्द करा - केंद्र सरकारने पाच टक्के जीएसटी वाढवला आहे. राज्यात विधानसभा अधिवेशन सुरू आहे. त्या त्या राज्य सरकारने या संदर्भात निर्णय घेणे अपेक्षित आहे. व्यापारीवर्गानेही जीएसटी रद्द करण्यासाठी आग्रही आहेत. अधिवेशन सुरू असलेल्या राज्याने जीवनावश्यक वस्तू पाच टक्के जीएसटी रद्द करावा विरोधी पक्ष नेते पवार म्हणाले.

सहकार क्षेत्रातील निवडणुका घ्या - सहकार क्षेत्रातील निवडणुका जाहीर करण्यात आला होता. मात्र शिंदे सरकार सत्तेवर येतात या निवडणुका पुढे ढकलण्यात आले आहे. साखर कारखान्याच्या निवडणुका ही ऑक्टोबर मध्ये घेण्याबाबत सरकार प्रयत्नशील आहे. आम्ही ज्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या, त्या तातडीने घ्यावा अशी मागणी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.