मुंबई - 14 एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, गुड फ्रायडे आणि हनुमान जयंती असे सण साजरे करत असताना राज्याची कायदा सुव्यवस्थेत खंड पडू नये. कोणतीही अनुचित घटना राज्यात घडू नये. यासाठी राज्यातील आणि मुंबईतील पोलिसांकडून सुरू असलेल्या तयारीचा आढावा घेण्यासाठीची बैठक राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मंत्रालयातील दालनात पार पडली. सर्व सण सुरक्षेच्या वातावरणात पार पडावे, यासाठी पोलिसांकडून सर्वतोपरी तयारी करण्यात आली आहे. तसेच सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्या जातात. अशा प्रकारच्या पोस्टवर देखील पोलिसांची करडी नजर असल्याचे माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली आहे.
'कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे वक्तव्य करू नयेत' : राजकीय नेत्यांनी राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, अशी कोणतीही वक्तव्य करू नयेत. तसेच नागरिकांनीही प्रक्षोभक विधानांना बळी पडू नये. तसेच सर्वांनी एकत्र येत गुण्यागोविंदाने सर्व सण साजरे करावेत, असे आवाहन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले आहे. यासोबतच राज ठाकरे यांच्या होणाऱ्या भाषणावर स्थानिक पोलीस लक्ष ठेवणार असल्याचा देखील गृहमंत्र्यांनी सांगितले आहे.
हेही वाचा - Raj Thackeray Uttar Sabha : राज ठाकरेंच्या उत्तर सभेसाठी आले 'अयोध्येतील हनुमान'