मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी Prime Minister Narendra Modi यांच्या हस्ते आज INS विक्रांतचे लोकार्पण Launch of INS Vikrant झाले. मोदी सध्या कर्नाटक दौऱ्यावर आहेत. आज सकाळी 9:30 वाजता मोदी कोची येथील कोचीन शिपयार्ड येथे दाखल झाले. त्यांनी नौदलाच्या नवीन चिन्हाचे अनावरण केले. आतापर्यंत केवळ विकसित राष्ट्रांनीच अशा विमानवाहू जहाजांची निर्मिती केली होती. आज भारत यामध्ये सामील झाला आहे. विकसित राष्ट्र होण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल भारताने टाकले आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
देशाला नवीन विश्वास - आज भारत स्वदेशी तंत्रज्ञानात एवढी मोठी विमानवाहू जहाजे aircraft carrier तयार करणाऱ्या देशांमध्ये सामील झाला आहे. आज INS विक्रांतने भारताला नवीन विश्वास दिला आहे. या ऐतिहासिक प्रसंगी, मी भारतीय नौदल Indian Navy, कोचीन शिपयार्डचे Cochin Shipyard सर्व अभियंते, शास्त्रज्ञ कामगारांचे अभार पंतप्रधांनानी मानले आहे. विक्रांत केवळ युद्धनौका नाही, तर ती २१व्या शतकातील भारताच्या मेहनती, प्रतिभा, प्रभाव आणि वचनबद्धतेचा पुरावा असल्याची भावना पंतप्रधांनानी व्यक्त केली.
हेही वाचा - Ajit Pawar on Nirmala Sitharaman निर्मला सीतारामन यांच्या बारामती दौऱ्याबाबत अजित पवारांचे भाष्य
भारताचे मनोबल उंचावले - केरळच्या समुद्रकिनाऱ्यापासून प्रत्येक भारतीय आज एका नव्या भविष्याच्या सूर्योदयाचा साक्षीदार होत आहे. INS विक्रांत INS Vikrant वरील हा सोहळा जागतिक क्षितिजावर भारताचे मनोबल मजबूत करण्याचे आवाहन असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे. पंतप्रधानांसोबतच नौदलाचे सर्व वरिष्ठ अधिकारी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह देखील या विशेष सोहळ्याला उपस्थित आहेत. थोड्याच वेळात पंतप्रधान प्रथम स्वदेशी विमानवाहू जहाज INS विक्रांत देशाला समर्पित करतील.
हेही वाचा - Two FTII Student Suicide : महिनाभरात एफटीआयआयमध्ये दोन विद्यार्थ्यांच्या आत्महत्या