ETV Bharat / city

मुंबईत कोरोनाचे 3 हजार 56 नवे रुग्ण; 69 रुग्णांचा मृत्यू - Mumbai corona news

मुंबईत आज 3 हजार 56 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 6 लाख 68 हजार 355 वर पोहचला आहे. तर 69 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 13 हजार 616 वर पोहचला आहे. 3 हजार 838 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 6 लाख 02 हजार 383 वर पोहचली आहे. मुंबईत सध्या 50 हजार 606 सक्रिय रुग्ण आहेत.

File photo
File photo
author img

By

Published : May 6, 2021, 9:59 PM IST

मुंबई - मुंबईत गेले काही दिवस कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढली होती. रोज 7 ते 11 हजाराच्यावर रुग्ण आढळून येत होते. त्यात गेल्या काही दिवसात घट झाली होती. काल (बुधवार) त्यात वाढ होऊन 3 हजार 879 नवे रुग्ण आढळून आले होते. आज (गुरुवार) त्यात किंचित घट होऊन 3056 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 69 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज 3868 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

रुग्ण दुपटीचा कालावधी 130 दिवस -

मुंबईत आज 3 हजार 56 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 6 लाख 68 हजार 355 वर पोहचला आहे. तर 69 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 13 हजार 616 वर पोहचला आहे. 3 हजार 838 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 6 लाख 02 हजार 383 वर पोहचली आहे. मुंबईत सध्या 50 हजार 606 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 90 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 130 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 96 चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेंनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर 645 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आज 30 हजार 942 तर आतापर्यंत एकूण 56 लाख 09 हजार 178 चाचण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

हे विभाग हॉटस्पॉट -

मुंबईत अंधेरी, कांदिवली, गोरेगाव, वांद्रे, मालाड, जोगेश्वरी, मुलुंड, चेंबूर, घाटकोपर आदी विभाग कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहे. या विभागात सर्वाधिक कोरोना सक्रिय रुग्ण आहेत. यामुळे या विभागात कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी महापालिकेने सुरू केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.