ETV Bharat / city

Ambassador Car Farewell : ऐकावे ते नवलच! ढोल-ताशांच्या गजरात रेल्वेच्या शेवटच्या अॅम्बेसिडर कारला निरोप - मध्य रेल्वे अॅम्बेसिडर गाडी

आपण अनेकदा एखाद्या व्यक्तीसाठी निरोप समारंभ भरलेले पहिले असतील. पण, तुम्हाला जर कुणी म्हटलं की गाडीचा निरोप समारंभ आहे तर तुमचा विश्वास बसणार नाही. मात्र, ही खरी घटना आहे. मुंबईतील रेल्वे अधिकाऱ्यांच्या सेवेत असलेल्या एका अॅम्बेसिडर गाडीला ( Central Railway Ambassador Car ) भावपूर्ण असा निरोप देण्यात ( Ambassador Car Farewell Mumbai ) आला. ३५ वर्षे रेल्वेच्या अधिकाऱ्यांची सेवा करणाऱ्या या गाडीच्या निरोप समारंभासह गाडीच्या चालकालाही निरोप देण्यात आला. ढोल-ताशांचा गजर आणि फुलांचा वर्षाव करून गाडीला निरोप देण्यात आला.

ऐकावे ते नवलच! ढोल-ताशांच्या गजरात रेल्वेच्या शेवटच्या अॅम्बेसिडर कारला दिला निरोप

author img

By

Published : Mar 29, 2022, 9:11 PM IST

मुंबई- एकेकाळी अॅम्बेसिडर गाडी सरकारी अधिकाऱ्यांची शान होती. आता आधुनिकतेचा काळात अॅम्बेसिडर गाडी शासकीय कार्यालयातून काळाच्या पडद्याआड गेली आहे. रेल्वेच्या मुंबई विभागातील शेवटची अॅम्बेसिडर गाडी ३५ वर्ष सेवा देऊन आज सेवा निवृत्त झाली आहे. विशेष म्हणजे, अॅम्बेसिडर गाडीबरोबर या गाडीचा चालक सुद्धा निवृत्त झाला. मध्य रेल्वेची शेवटची अम्बेसिडर गाडी म्हणून आज निरोप देण्यात आला. यावेळी फुलांच्या पायघड्या घालण्यात आल्या. तसंच गुलाब पुष्पांचा वर्षाव करून ढोल ताशांच्या गजरात रेल्वे अधिकाऱ्यांनी परंपरेप्रमाणे गाडी ओढत अॅम्बेसिडर गाडीला आणि चालकाला निरोप दिला.

१६ वाणिज्य व्यवस्थापकांनी दिली सेवा - १९६० आणि १९७० च्या दशकात हिंदुस्थान अॅम्बेसिडर या चार चाकी गाडीने अनेकांच्या मनावर राज्य केले होते. अॅम्बेसिडर सर्वात लोकप्रिय गाडीपैकी एक होती. ही चार चाकी गाडी राजकीय नेत्यांपासून ते उद्योगपती, अभिनेते, प्रसिद्ध व्यक्तींनाही आवडायची. अनेक वर्षांपासून या गाडीने अनेकांच्या मनात स्थान मिळवले होते. विशेष म्हणजे रेल्वे अधिकाऱ्यांच्या सेवेत शासकीय कार्यलयात हिंदुस्थान अॅम्बेसिडर चारचाकी गाडी असायची. मात्र, हळूहळू गाडी आता इतिहासात जमा होत आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील शेवटची अॅम्बेसिडर गाडी आज निवृत्त झाली आहे. मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक एमएफए -7651 अॅम्बेसिडर चारचाकी गाडी २२ जानेवारी १९८५ ला रेल्वेचा सेवेत दाखल झाली होती. तेव्हा, या गाडीचे चालक मुतु पांडी आंडी नडार हे होते. तेव्हापासून मध्य रेल्वेच्या वरिष्ठ मंडळ वाणिज्य व्यवस्थापकाच्या सेवेत अँम्बेसिडर गाडी होती. ३५ वर्षांच्या सेवेत आतापर्यत १६ वाणिज्य व्यवस्थापकांनी या गाडीतून प्रवास केला आहे. विशेष म्हणजे या शेवटच्या अॅम्बेसिडर गाडीचे चालक गेली ३५ वर्ष मुतु पांडी आंडी नडार हेच आहेत.

ऐकावे ते नवलच! ढोल-ताशांच्या गजरात रेल्वेच्या शेवटच्या अॅम्बेसिडर कारला दिला निरोप

फुलांचा वर्षाव करून गाडीला निरोप - मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी ईटीव्ही भारताला सांगितले की, मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील अॅम्बेसिडर गाडीचा आजचा शेवटचा दिवस आहे. गेल्या ३५ वर्षापासून अनेक वरिष्ठ मंडळ वाणिज्य व्यवस्थापकाच्या सेवेत ही गाडी होती. ऐतिहासिक आठवण म्हणून आज रेल्वे अधिकाऱ्यांनी या गाडीला फुलांचा वर्षाव करून निरोप दिला आहे. या गाडीचे चालक आणि देखभाल करणारे मुतु पांडी आंडी नडार सुद्धा निवृत्त होत आहे. उद्या या शेवटच्या अॅम्बेसिडर गाडीला स्क्रॅप करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. उद्या मध्य रेल्वेच्या करीरोड डेपोमध्ये शेवटचा अँम्बेसिडर गाडी स्क्रॅपसाठी पाठविण्यात येणार आहे.

अनेक चांगले अनुभव- चालक : गाडीचे चालक मुतु पांडी आंडी नडार यांनी ईटीव्ही भारताला सांगितले की, मध्य रेल्वेच्या शेवटच्या अॅम्बेसिडर गाडीचा चालक म्हणून मी गेली ३५ वर्ष सेवा दिली. या ३५ वर्षांत अॅम्बेसिडर गाडीचे अनेक चांगले अनुभव आहेत. या अॅम्बेसिडर गाडीचा आजपर्यत कधीही अपघात झालेला नाही. कधीही भर रस्त्यात बंद पडली नाही. ही अॅम्बेसिडर गाडी पाहिलांदा १९९२ ते १९९६ पर्यत मध्य रेल्वेचे वरिष्ठ मंडळ वाणिज्य व्यस्थापक अशोक कुमार यांच्या सेवेत होती. त्यानंतर अनेक वाणिज्य व्यस्थापकांना सेवा दिली आहे. आज अॅम्बेसिडर गाडीचा शेवटचा प्रवास मध्य रेल्वेच्या वरिष्ठ मंडळ वाणिज्य व्यस्थापक गौरव झा यांनी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.