ETV Bharat / city

'ऑटोरिक्षाचं स्टिअरिंग उद्धवजींच्या हातात, पण मागे बसलेले ठरवतात कुठे जायचं' - महाविकास आघाडी सरकार बातमी

आज भाजप कार्यकारीणी पदाधिकाऱ्यांची बैठक घेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पहिल्यांदाच बैठक घेत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच महाराष्ट्रातील नेत्यांची मतं जाणून घेतली. या बैठकीनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील भाजपा पक्ष कोरोनाकाळात कशाप्रकारे काम करत आहे याची माहिती राष्ट्रीय अध्यक्षांना दिली.

political news
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Jul 27, 2020, 3:39 PM IST

Updated : Jul 27, 2020, 4:58 PM IST

मुंबई - ऑटोरिक्षाचं स्टिअरिंग माझ्या हातात आहे. त्यानुसार आम्ही सरकार चालवत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज म्हटले की, उद्धव यांच्या हातात स्टिअरिंग आहे. मात्र, मागे बसलेले ठरवतात कुठे जायचं असतं? त्यानुसार तिघेही वेगवेगळ्या दिशेने भूमिका घेत असल्याचे दिसतात. तीन चाकी ऑटोरिक्षामध्ये बसलेल्यांना सवारीनुसार जावं लागतं. सध्या रिक्षाची परिस्थिती काय? त्याची दिशा कुठे आहे? काही कळत नाही, असा चिमटा फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला काढला आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

आज भाजप कार्यकारणी पदाधिकाऱ्यांची भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पहिल्यांदाच बैठक घेत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच महाराष्ट्रातील नेत्यांची मतं जाणून घेतली. या बैठकीनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील भाजप पक्ष कोरोनाकाळात कशाप्रकारे काम करत आहे याची माहिती राष्ट्रीय अध्यक्षांना दिली. तसेच कशाप्रकारे काम करायला हवं याचं मार्गदर्शन पक्षश्रेष्ठींकडून आम्ही घेतले असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, महाविकास आघाडीने सरकार चालवून दाखवावे. आम्हाला हे सरकार पाडायचं नसून, आम्ही विरोधातच आहोत. लोकांचं लक्ष उडवण्यासाठी म्हटलं जातंय की, हे सरकार पाडत आहेत. तुमचं सरकार एकमेकांच्या अंतर्गत विरोधामुळे पडेल. तोपर्यंत आम्ही जनतेची सेवा करू. आमचं जीवन संघर्षाचं आहे. आम्ही तुम्हाला मदत करतो, जिथे चुकतंय ते दाखवणं हे आमचं कर्तव्य असल्याचे फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्री म्हणतात, चाचण्या जास्त होत आहेत. देशामध्ये चाचण्यांच्या बाबतीत महाराष्ट्र 19 व्या क्रमांकावर आहोत. त्यामुळे मुख्यमंत्री यांचा चाचण्यांच्या बाबतीतला दावा चुकीचा आहे. मुंबईत चाचण्यांचे प्रमाण 15 ते 20 हजार झाले तर रुग्ण मृत्यूचे प्रमाण कमी होईल.

पुणे आणि मुंबईमध्ये दुजाभाव केला जातोय -

पुण्याला राज्य सरकार पैसे देत नाहीत. महिला किमान कोरोना सेंटरमध्ये सुरक्षित राहाव्यात त्यासाठी सरकारने काळजी घ्यायला हवी. पीएम केअरचा सर्वाधिक पैसा महाराष्ट्राला मिळाला असल्याची माहिती अधिकाराद्वारे समोर आले आहे. याचा मला अभिमान आहे. पीएम केअरचे पैसे येत नाहीत बोलणाऱ्यांचे आता तोंड बंद का? शेतकऱ्यांना बियाणं दिलं तेही नकली निघालं. यावर सरकार का बोलत नाही? असा प्रश्न फडणवीस यांनी सरकारला विचारला आहे.

Last Updated : Jul 27, 2020, 4:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.