मुंबई: मुंबईतील मलबार हील (Malabar Hill) परिसरामध्ये 16 वर्षीय अल्पवयीन मुलीची छळ केल्या प्रकरणात (School Girl Harassed) मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पोक्सो न्यायालयाने 25 वर्षीय आरोपीला एक वर्षाची कारावासाची शिक्षा सुनावली आहे. ही घटना फेब्रुवारी महिन्यात घडली होती. मलबारी पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मलबार हिल पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या गुन्ह्यानुसार ही घटना यावर्षी 5 फेब्रुवारी रोजी सायंकाळी घडली. मुंबईतील विशेष पोक्सो न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले की, आरोपीने पीडित अल्पवयीन मुलीचा हात पकडून तिचा पाठलाग केला. या कृत्याला पीडित तरुणीने विरोध केला होता हे तपासा दरम्यान आढळून आलेल्या पुराव्यावरून स्पष्ट होते आहे. दरम्यान पोलिसांनाही घडलेल्या घटनेबद्दल माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने येऊन आरोपीला अटक केली. न्यायालयाने आरोपीला पोक्सो कायदा 2012 अंतर्गत दोषी ठरवले आहे.
आरोपीकडून दयेची याचना: आरोपीने कामाच्या शोधात मुंबईत आल्याचे सांगून मजुरी मागितली होती. हा आपला पहिला गुन्हा असल्याने शिक्षा कमी करण्यात यावी अशी याचना त्याने केली होती. सर्व बाबी लक्षात घेता न्यायालयाने त्याला एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा आणि 5000 रुपये दंड ठोठावला.