ETV Bharat / city

'रोज सकाळी आमच्या अब्रुची लक्तरं काढली जातेय'; क्रांती रेडकर यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र - समीर वानखेडेंची पत्नी क्रांती रेडकर

क्रांती रेडकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. क्रांती रेडकर या समीर वानखेडे यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत. माझ्या खाजगी जीवनावर उपद्रव माजवला जात असून मी या विरुद्ध लढत आहे. आमच्या अब्रूची लक्तरं रोज सकाळी काढली जात आहे. तसेच शिवरायांच्या राज्यात स्त्रीचा खेळ सुरू असल्याच्या आशयाचे पत्र क्रांती रेडकर यांनी मुख्यमंत्र्यांनी लिहिले आहे.

क्रांती रेडकर यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

author img

By

Published : Oct 28, 2021, 11:46 AM IST

मुंबई - क्रुझवरील ड्रग्ज पार्टीप्रकरणात आर्यन खानच्या अटकेनंतर एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर होत असलेल्या विविध आरोपांच्या पार्श्वभूमीवर अभिनेत्री क्रांती रेडकरने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे.एक मराठी माणूस म्हणून आज मी तुमच्याकडे न्यायाच्या अपेक्षेने पाहतेय. तुम्ही योग्य तो न्याय करा,' अशी विनंती क्रांतीने या पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

क्रांती रेडकर यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
क्रांती रेडकर यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

क्रांती रेडकरचं पत्र

माननीय उद्धव ठाकरे साहेब, लहानपणापासून मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी लढणारी शिवसेना पाहत लहानाची मोठी झालेली मी एक मराठी मुलगी आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेव ठाकरे ह्यांचा आदर्श घेऊनच मी वाढले. कुणावर अन्याय करू नये आणि आपल्यावर होणारा अन्याय सहन तर मुळीच करू नये हे त्या दोघांनी शिकवलं. तोच धडा गिरवत आज मी एकटीने माझ्या खाजगी जीवनावर हल्ला करणाऱ्या उपद्रवी लोकांविरोधात ठामपणे उभी आहे लढते आहे. सोशल मीडिया त्यावरचे लोक फक्त मजा बघतायत. मी एक कलाकार आहे. राजनीती मला कळत नाही आणि मला त्यात पडायचंसुद्धा नाही. आमचा काहीही संबंध नसताना रोज सकाळी आमच्या अब्रूची लख्तरं चारचौघात उधळली जातात. शिवरायांच्या राज्यात एका स्त्रीच्या गरिमेचा खेळ करून ठेवला आहे. विनोद करून ठेवला आहे.

तुमच्यावर पूर्ण विश्वास -

आज बाळासाहेब असते तर त्यांना हे नक्कीच पटलं नसतं. एका महिलेवर आणि तिच्या परिवारावर होणारे खासगी हल्ले हे राजकारणाचं किती नीच स्वरूप आहे हे नेहमीच त्यांच्या विचारातून आमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. आज ते नाही पण तुम्ही आहात. त्यांची सावली त्यांची प्रतिमा आम्ही तुमच्यात बघतो. तुम्ही आमचे नेतृत्व करत आहात आणि तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. तुम्ही कधीच माझ्यावर व माझ्या कुटुंबावर अन्याय होऊ देणार नाही याची मला खात्री आहे. म्हणून एक मराठी माणूस म्हणून आज मी तुमच्याकडे न्यायाच्या अपेक्षेने पाहतेय. तुम्ही योग्य तो न्याय करा अशी विनंती क्रांतीने पत्राद्वारे केली आहे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक हे समीर वानखेडे यांच्यावर विविध आरोप करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.