ETV Bharat / city

क्रांतीने “शब्बास शेरा” असे कॅप्शन देत समीर वानखेडेचे केले कौतूक; नेटेकऱ्यांनी केलं ट्रोल - Kranti Redkar got trolled

सध्या क्रांती रेडकर तिच्या एका ट्वीटमुळे चर्चेत आली आहे. क्रांतीने ट्विटर अकाऊंटवरुन एक ट्विट शेअर केले आहे. या ट्वीटमध्ये क्रांतीने एक बातमी शेअर केली आहे. या बातमीत मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराष्ट्र इंटरनॅशनल टर्मिनल येथे एनसीबीने 4 कोटी किंमत असलेले हेरॉइन जप्त केले आहे. ही बातमी शेअर करत “शब्बास शेरा” असे कॅप्शन क्रांतीने दिले आहे. मात्र, नेटेकऱ्यांनी तीला ट्रोल केले.

kranti redkar got troll for calling sameer wankhede shera
क्रांतीने “शब्बास शेरा” असे कॅप्शन देत समीर वानखेडेचे केले कौतूक; नेटेकऱ्यांनी केलं ट्रोल
author img

By

Published : Nov 6, 2021, 7:01 AM IST

मुंबई - सध्या समीर वानखेडे हे नाव मीडियामध्ये चर्चेत आहे. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि समीर वानखेडे या दोघांमधील आरोप प्रत्यारोप नेहमीच चर्चेत असतात.
सोबतच चर्चेत असते ती समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकर. सध्या क्रांती रेडकर तिच्या एका ट्वीटमुळे चर्चेत आली आहे.

kranti redkar got troll for calling sameer wankhede shera
क्रांतीचे ट्विट

क्रांतीने ट्विटर अकाऊंटवरुन एक ट्विट शेअर केले आहे. या ट्वीटमध्ये क्रांतीने एक बातमी शेअर केली आहे. या बातमीत मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराष्ट्र इंटरनॅशनल टर्मिनल येथे एनसीबीने 4 कोटी किंमत असलेले हेरॉइन जप्त केले आहे. ही बातमी शेअर करत “शब्बास शेरा” असे कॅप्शन क्रांतीने दिले आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ट्विटनंतर नेटकऱ्यांनी मात्र तिला चांगलेच ट्रोल केले आहे. काय शाब्बास शेरा? हा त्याच्या नोकरीचा भाग आहे. खुर्च्या उबवायला सरकार पगार देत नाही. समजलं का? अशा शब्दांमध्ये नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केलेली आहे.

NCBची मुंबईत मोठी कारवाई; ४ कोटींचे हेरॉइन जप्त -

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो NCB ने गुरुवारी मुंबई विमानतळाजवळील कार्गो कॉम्प्लेक्समधून 4 कोटी किंमतीचे 700 ग्रॅम हेरॉईन जप्त केल्याप्रकरणी गुजरातमधील एका व्यक्तीला अटक केल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो झोनल युनिटला मुंबईच्या उपनगरातील इंटरनॅशनल कुरिअर टर्मिनलवर एका पार्सलमध्ये अंमली पदार्थांची तस्करी होत असल्याची विशिष्ट माहिती मिळाली होती. त्यानुसार सोमवारी कॉम्प्लेक्समधील कॉन्फरन्स हॉलमध्ये झडती घेतली असता नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकार्‍यांना एका पॅकेटमध्ये 700 ग्रॅम पांढरी पावडर आढळून आली. हे हेरॉईन असल्याचा कथित बेकायदेशीर बाजारात अंदाजे 4 कोटी रुपये किंमत आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.