पुणे: कोरेगाव भिमा दंगल प्रकरणी (Koregaon Bhima riot case) न्यायालयीन चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या आयोगाने शरद पवार ((NCP President Sharad Pawar)) यांच्यासह पुणे शहराचे तत्कालील अतिरिक्त आयुक्त रवींद्र सेनगावकर, पुणे जिल्ह्याचे तत्कालीन पोलिस अधीक्षक सुवेझ हक, तत्कालीन अतिरिक्त पोलिस अधीक्षक संदीप पखाले यांच्याही साक्ष नोंदविल्या जाणार आहेत. तसेच कोल्हापूर परिक्षेत्राचे तत्कालीन पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांचे प्रतिज्ञापत्र देखील दाखल करण्यास आयोगाने सांगितले आहे. पुण्याजवळील कोरेगाव भिमा येथे एक जानेवारी 2018 मध्ये दंगल झाली होती. त्याचे पडसाद राज्यातही उमटले होते. त्याच्या चौकशीसाठी तत्कालीन फडणवीस सरकारने हा आयोग नेमला आहे. न्यायमूर्ती पटेल आणि निवृत्त मुख्य सचिव सुमित मलिक हे या आयोगाचे सदस्य आहेत.
Koregaon Bhima riots : कोरेगाव भीमा चौकशी आयोगाचे शरद पवारांसह अधिकाऱ्यांना साक्षीसाठी समन्स - Koregaon Bhima riot case
कोरेगाव भिमा दंगल प्रकरणी (Koregaon Bhima riot case) न्यायालयीन चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या न्यायमूर्ती जे. एन. पटेल आयोगासमोर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांची साक्ष नोंदवली जाणार आहे. येत्या 23 फेब्रुवारी रोजी उपस्थित राहण्यासंदर्भात पवार यांना समन्स पाठविण्यात आले आहे. पवार यांच्या साक्षीसाठी 23 आणि 24 फेब्रुवारी असे दोन दिवस ठेवण्यात आले आहेत.