मुंबई : राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस सुरू असून कोकणात सर्वाधिक पावसाची नोंद झाली (Heavy Rain In Konkan) आहे. पालघर जिल्ह्यात गेल्या 24 तासात 150 मिलिमीटर पाऊस झाली असून अद्यापही तीन मुख्य नद्या इशारा पातळीपेक्षा कमी वाहतआहेत. बहाडोली येथे अडकलेल्या दहा जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून एनडीआरएफचे पथक तैनात करण्यात आले आहे. त्याबरोबर ठाणे जिल्ह्यात 92 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर जिल्ह्यातील खाडीमध्ये बुडून दोन जण मरण पावले (Two people drowned in the creek) आहेत. ठाणे जिल्ह्यात एनडीआरएफच्या दोन टीम तयार ठेवल्या आहेत. मुंबईतही गेल्या 24 तासात मुसळधार पाऊस झाला असून, कुलाबा येथे 62 मिलिमीटर तर सांताक्रुज येथे 95 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मध्य रेल्वेची वाहतूक काही काळ प्रभावित झाली होती. मात्र अन्य कोणत्याही वाहतुकीवर परिणाम झाला नाही. रायगड जिल्ह्यातही 95 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून अद्याप पूर परिस्थिती नसली तरी कुंडलिका नदी इशारा पातळीवरून वाहत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून रायगड मध्येही एनडीआरएफ ची दोन पथके तैनात करण्यात आली आहेत.
गडचिरोली जिल्ह्यात गंभीर परिस्थिती - पावसाची नोंद झाली असली तरी जिल्ह्यातील वैनगंगा प्राणहिता (Wainganga Pranahita) आणि वर्धा नद्या इशारा पातळीच्या जवळपास वाहत आहेत. ( Wardha rivers close to warning level ) गोदावरी नदी आणि इंद्रावती नदी या धोका पातळीच्या वर वाहत आहेत त्यामुळे अनेक मार्ग खंडित झाले असून, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आले आहेत. तीन हजारांहून अधिक व्यक्तींना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. त्यासाठी 29 निवारा केंद्र उघडण्यात आली आहे. गोदावरी नदीपात्रातील काळेश्वर या ठिकाणी असलेली 1986 या वर्षातील सर्वाधिक पाणी पातळी १०७ मीटर होती तर आज ती 107 मीटर पेक्षा अधिक वर गेली आहे. तर राज्यभरात एन डी आर एफची 14 पथके आणि एस डी आर एफ ची सहा पथके तैनात करण्यात आली आहेत.
पावसाच्या बळींचा आकडा शंभरी पार - राज्यभरात पावसांच्या बळीची संख्या आता 100 पेक्षा अधिक झाली आहे यामध्ये 97 हजार दगावले असून सहा जण बेपत्ता आहेत. तर 68 जण जखमी झाले आहेत. गेल्या 24 तासात नागपूर आणि पालघर जिल्ह्यात प्रत्येकी दोन जण मृत्युमुखी पडले आहेत.
हेही वाचा : Video Mumbai Rain update : मुंबई, ठाण्यात मुसळधार! 6 दिवसांपासून मुंबईत पाऊस
हेही वाचा : Video : मुंबईत मुसळधार पावसामुळे मुंबईकरांचे हाल