मुंबई: नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये कोकणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray गटाला चांगलं यश मिळाल्याचं दिसून आले आहे. या पार्श्वभूमीवर आता कोकणातील राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी Rajan Salvi पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज भेट घेतली आहे. आपल्या सर्व विजय साथीदारांना घेऊन उद्धव ठाकरेंसोबत चर्चा केली आहे. उद्धव ठाकरेंसोबत झालेल्या भेटीबाबत बोलताना राजन साळवे यांनी आमच्या कोकणात दाखवून दिले शिवसेनेशिवाय पर्याय नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
तपास यंत्रणांच्या माध्यमातून दबाव आणला जातो याबाबत माध्यमांशी बोलताना आमदार राजन साळवी म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मुबंई महाराष्ट्रामध्ये काम करत आहोत. केंद्राच्या तपास यंत्रणांच्या माध्यमातून, राज्याच्या तपास यंत्रणांच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेल्या लोकांना त्रास द्यायची काम सध्या सुरू आहेत. ED, CBI अशा केंद्रीय यंत्रणेच्या माध्यमातून आम्हाला त्रास दिला जात आहे. आम्ही या कोणालाही भिक नाही घालत. आम्ही ठामपणे उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहोत.
कोकणातील जनतेने दाखवून दिलं पुढे बोलताना आमदार साळवी म्हणाले की, काल पार पडलेल्या ग्रामपंचायतीच्या निकालात कोकणाने दाखवून दिले आहे, की शिवसेनेशिवाय पर्याय नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने क्रांती केली आहे. लोकांनी आमच्यावर विश्वास दाखवला आहे. कोकणातील कालच्या निर्णयाने लोकांनी दाखवून दिले आहे, की बाळासाहेब ठाकरे व उद्धवसाहेब ठाकरे यांच्यासोबत ही सर्व लोक आहेत.
संजय शिरसाट लवकर बरे व्हावेत कोकणातील रिफायनरी, नितेश राणे व संजय शिरसाट यांच्या तब्येतीबाबत बोलताना राजन साळवी म्हणाले की रिफायनी प्रकल्प व्हावा, अशी स्थानिक लोकांची भूमिका आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. स्थानिक लोकांना रोजगार देखील यातून मिळेल. संजय शिरसाट हे आमच्यासोबत होते. आता ते आमच्यासोबत नाहीत. तरीसुद्धा देवाकडे प्रार्थना करेल त्यांना व्यवस्थित रित्या ते यावे त्यांना चांगले आरोग्य लाभो ही प्रार्थना. निलेश राणे यांचे वलय काय आहे, हे माहित आहे. त्यामुळे मी त्यांच्यावर फार काही बोलणार नाही. अशी प्रतिक्रिया आमदार राजन साळवी यांनी दिली आहे.