मुंबई - मुंबईतील चाळ संस्कृतीचा ( Chawl culture in Mumbai )उदय कसा झाला ही कथा मोठी रंजक आहे. रायगड जिल्ह्यातील बाळकृष्ण भिवाजी तानाजी नाखवा पाटील या कोळ्याने गिरगावात १३ चाळी बांधल्या आणि त्या चाळीनी स्वत:ची ओळख निर्माण केली. तिथले जनजीवन, सणवार, रीतिभाती या चाळींनी मुंबईत रुजविल्या, वाढविल्या. मुंबई कितीही बदलली तरी या काँक्रीटच्या जंगलात अजूनही चाळ संस्कृती टिकून आहे. याविषयी अजूनही कमालीचे कुतूहल आहे.
कोळी बांधवांनी उभी केला चाळ - आगरी कोळ्यांची मुंबई अशी ओळख असणाऱ्या कोळी बांधवांनी मुंबईत पहिल्या चाळीची मुहूर्तमेढ रोवली ( Koli People Built Chawl In Mumbai ). उभारून मुंबईत चाळ संस्कृती उदयाला आणली. टप्प्याटप्प्याने या चाळींचा विकास होऊन येथे टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या आणि मुंबई एक कॉस्मोपॉलिटन शहर म्हणून उभे राहत आहे. तर दुसरीकडे गगनचुंबी इमारतींशी स्पर्धा करत आजही शेकडो चाळींचे अस्तित्व टिकून आहे( Chawls competing with Building ).
शेणाने सारवलेल्या भिंती - गिरगावमधील पहिली चाळ लाकडांचा वापर करून उभी राहिली ( First Chawl Built Using Woods ) . शेणाने सारवलेल्या भिंती, घरासमोर प्रशस्त अंगण होते. ठाकूरद्वारची जितेकर वाडी, नवीवाडी, शांताराम वाडी, खोताची वाडी, आंबेवाडी, कुडाळ देशकरवाडी, परशुराम वाडी, केळेवाडी, गायवाडी, मांगलवाडी, कांदेवाडी, खेतवाडी, गोरेगावकर लेन, परशुराम वाडी, आंग्रेवाडी, झावबावाडी, गावदेवी आदी वाड्या तयार झाल्या. कालांतराने येथे शेकडो चाळी उभ्या राहिल्या. धार्मिक उत्सवाची सुरुवात गिरगावमधून लोकमान्य टिळकांनी केली. विविध उत्सव आजही मोठ्या उत्साहात गिरगाव साजरे केले जातात. शांताराम वाडीच्या पाठीमागे मोठे पटांगण आहे. स्वातंत्र्य पूर्वकाळात पटांगणातच सावरकर, लोकमान्य टिळकांच्या ब्रिटिश जुलमी राजवटी विरोधात सभा होत असायच्या. येथील चाळींवर ब्रिटिशांचे विशेष लक्ष असायचे. येथील चाळी अनेक लढे, आंदोलनाच्या साक्षीदार आहेत.
मराठी माणसांच्या परंपरागत वसाहती - दक्षिण मुंबईत गिरगाव, मध्य मुंबईतील गिरणगाव, दादर, विलेपार्ले, गोरेगाव या मुंबईतील मराठी माणसांच्या परंपरागत वसाहती आहेत. इंग्रजांच्या काळात मुंबईत प्रथम चाळ उभारण्यास सुरुवात झाली. मुंबईत आजही चाळींच्या आगळावेगळा रचना आणि जीवनशैलीनी एक वेगळा ठसा उमटवला आहे. औद्योगिक शहराचे रूप टाकून मुंबई वित्तीय सेवा क्षेत्रीय, मनोरंजन आणि व्यापारी केंद्राचे स्वरूप धारण करताना दिसून येते. लोकसंख्येतही मोठे परिवर्तन होत आहेत. मुंबईत दिवसागणिक परप्रांतीयांचा लोंढा वाढतो आहे. आज बदलत्या परिस्थितीतही मुंबईचे वैशिष्ट्य व प्रतीक असलेल्या चाळींच्या शैलींचा ऱ्हास सुरू झाला आहे.
हेही वाचा - Neelam Gorhe on uday samant attack : खोटे आरोप करून शिवसेनेला बदनाम करू नका - नीलम गोऱ्हे