मुंबई - राज्यात कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे राज्यातील निर्बंध सैल करण्यासाठी पाच स्तरावर आखणी करण्यात आली आहे. राज्यातील पॉझिटीव्हीटी रेट किती आहे, यावर ही आखणी करण्यात आली आहे . राज्य सरकारने नव्याने आकडेवारी जाहीर केली असून यात कोल्हापूर जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी रेट सर्वाधिक १५. ८५ एवढा दर्शवण्यात आला आहे . कोल्हापूरपाठोपाठ रत्नागिरी - १४. २ , रायगड १३. ३ आणि पुण्याचा पॉझिटीव्हीटी रेट ११. ११ दर्शवण्यात आला आहे. सर्वात कमी पॉझिटिव्हीटी रेट गोंदिया जिल्ह्याचा ०.८७ टक्के आहे.
राज्य सरकारने निर्बंध उठवण्यासाठी लागू केलेल्या पाच स्तरीय आखणीची दुसरी यादी जाहीर केली आहे . त्यानुसार आजपासून (सोमवार) पॉझिटीव्हीटी रेट कमी असलेल्या अनेक जिल्ह्यात निर्बंध अधिक शिथिल केले जाणार आहेत .
कोणत्या जिल्ह्यात किती पॉझिटिव्हिटी रेट -
- मुंबई शहर आणि उपनगर – ४.४०
- अहमदनगर – २.६३
- अकोला – ५.३७
- अमरावती – ४.३६
- औरंगाबाद – ५.३५
- बीड – ५.२२
- भंडारा – १.२२
- बुलढाणा – २.३७
- चंद्रपूर – ०.८७
- धुळे – १.६
- गडचिरोली – ५.५५
- गोंदिया – ०.८३
- हिंगोली – १.२०
- जळगाव – १.८२
- जालना – १.४४
- लातूर – २.४३
- नागपूर – ३.१३
- नांदेड – १.१९
- नंदुरबार – २.०६
- नाशिक – ७.१२
- उस्मानाबाद – ५.१६
- पालघर – ४.४३
- परभणी – २.३०
- रत्नागिरी – १४.१२
- सांगली – ६.८९
- सातारा – ११.३०
- सिंधुदुर्ग – ११.८९
- सोलापूर – ३.४३
- ठाणे – ५.९२
- वर्धा – २.०५
- वाशिम – २.२५
- यवतमाळ – २.९१
आजपासून निर्बंधात होणार घट -
ज्या जिल्ह्यात पॉझिटीव्हीटी रेट कमी झाला आहे. त्या जिल्ह्यात पाच टप्प्यांची विभागणी करून निर्बंध कमी केले जाणार आहेत. त्यासाठी स्थानिक प्रशासनाला अधिकार दिले असून संबंधित जिल्हाधिकारी आणि महानगर प्रशासन याबाबतचा निर्णय जाहीर करतील पॉझिटीव्हीटी रेट सोबतच जिल्हयात उपलब्ध असलेल्या ऑक्सिजन बेडच्या संख्येवर पाच टप्पे ठरवण्यात आले आहेत . या आठवड्यातील उपलब्ध आकडेवारीनुसार संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना आपला टप्पा ठरवावा लागणार आहे .
पाच स्तरीय आखणी खालीलप्रमाणे -
- पहिला स्तर - पॉझिटीव्हिटी रेट ५ टक्क्यांपेक्षा कमी, तसेच जिल्ह्यात ऑक्सिजन बेड २५ टक्क्यांपेक्षा कमी भरलेले असावेत .
- दुसरा स्तर पॉझिटिव्हिटी रेट ५ टक्यांपेक्षा कमी , ऑक्सिजन बेड २५ ते ४० टक्क्यापेक्षा भरलेले .
- तिसरा स्तर - पॉझिटिव्हिटी रेट ५ ते १० टक्यांपेक्षा कमी , तसेच ऑक्सिजन बेड ४० टक्यांपेक्षा जास्त भरलेले .
- चौथा स्तर - पॉझिटिव्हिटी रेट १० ते २० टक्यांपेक्षा कमी, तसेच ऑक्सिजन बेड ६० टक्यांपेक्षा जास्त भरलेले .
- पाचवा स्तर - पॉझिटिव्हिटी रेट २० टक्यांपेक्षा जास्त , तसेच ऑक्सिजन बेड ७५ टक्यांपेक्षा जास्त भरलेले .
मुंबईचा पॉझिटिव्हिटी -
राज्यात ब्रेक द चैन अंतर्गत लॉकडाऊनमध्ये ७ जूनपासून शिथिलता देण्यात आली आहे. मुंबईचा पॉझिटिव्हिटी रेट ५.२५ वरून ४.४० टक्के झाल्याने या आठवड्यात मुंबईचा समावेश दुसऱ्या स्थरात झाला आहे. यामुळे मुंबईमध्ये दुसऱ्या स्थरातील निर्बंध लागू व्हायला हवे होते. मात्र कोरोनाचा प्रसार अद्याप कमी झाला नसल्याने तिसऱ्या स्थरातील निर्बंध यापुढे आणखी काही दिवस लागू राहतील. यामुळे मुंबईकरांना सध्यातरी दिलासा मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुण्याचा पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्क्यांच्या आत -
पुणे शहरात कोरोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसात झपाट्याने कमी झाली आहे. दुसरी लाट जोमात असताना पुणे शहराचा पॉझिटिव्हीटी रेट हा १५ टक्क्यांच्या वर गेला होता. हा पॉझिटिव्हीटी रेट आता ४.९ टक्के इतका खाली आल्याने पुणेकरवरील टांगती तलवार सध्या तरी हटली आहे.
नाशिकचा पॉझिटिव्हिटी दर उतरला मात्र निर्बंध तिसऱ्या टप्प्यातील कायम -
कोरोना पॉझिटिव्हिटी रेट पाच टक्क्यांपर्यत खाली उतरला असला तरी आँक्सिजन बेडवर उपचार घेणार्यांची संख्या व वाढता मृत्यूदर बघता नाशिक जिल्ह्याला तिसर्या टप्प्यातच ठेवण्यात आले आहे.
नागपूर जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर 0.80 वर, रिकव्हरी रेटही 97.68 -
नागपूर जिल्ह्यात मागील एक महिन्यात पॉझिटिव्हिटी दरात कमालीची घसरण झाली आहे. यामध्ये एप्रिल महिन्यात दुसऱ्या लाटेत उच्चांक गाठलेला हा दर 34 च्या घरात जाऊन पोहचला. मागील महिन्याभरात या दरात घसरण होताना दिसून आली. शनिवारी आलेल्या अहवालात हा दर 0.80 म्हणजे 1 टक्क्यांपेक्षा कमी आहे. याच बरोबर रिकव्हरी रेट वाढून 97.68 वर आल्याने बरे होणाऱ्या रुग्णसंख्या वाढून मृत्युदरत घट झाली आहे.