ETV Bharat / city

महामारीने आरोग्य यंत्रणेसह प्रशासन ऑक्सिजनवर; जाणून घ्या, प्रमुख शहरांमधील स्थिती

21 एप्रिलच्या आकडेवारीनुसार गेल्या चोवीस तासांत राज्यात 67 हजार 468 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. अशा स्थितीत ऑक्सिजनवर असलेल्या कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढलेले आहे.

oxygen supply
ऑक्सिजन पुरवठा
author img

By

Published : Apr 22, 2021, 7:08 PM IST

Updated : Apr 22, 2021, 10:40 PM IST

मुंबई - कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढत असताना राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांवर उपचार करताना आरोग्य यंत्रणा तणावात काम करत आहे. तर दुसरीकडे प्रशासनाला ऑक्सिजनचा पुरवठा करताना कसरत करावी लागत आहे. नाशिकमधील ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेनंतर विविध महापालिका प्रशासनाकडून सुरक्षेच्या उपाययोजाना करण्यात आल्या आहेत. या स्थितीचाही ईटीव्ही भारतने आढावा घेतला आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. राज्यात 15 दिवसांचे निर्बंध लागू केले असूनही होणारी रुग्णवाढ महाराष्ट्राची चिंता वाढवणारी आहे. 21 एप्रिलच्या आकडेवारीनुसार गेल्या चोवीस तासांत राज्यात 67 हजार 468 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. अशा स्थितीत ऑक्सिजनवर असलेल्या कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढलेले आहे.

हेही वाचा-ऑक्सिजन गळती प्रकरणाचा तपास करण्यासाठी उच्चस्तरीय समिती - आरोग्य मंत्री राजेश टोपे

जिल्ह्यात कोरोनाबाधितांचे रुग्ण वाढत चालले आहेत, तसतशी ऑक्सिजनचीसुद्धा मोठ्या प्रमाणात गरज भासू लागली आहे. जिल्ह्यात तब्बल साडेचार हजारांहून अधिक कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी 1 हजार 116 रुग्ण सध्या ऑक्सिजनवर आहेत. त्यांना 21 एप्रिलला 32.4 मेट्रिक टन ऑक्सिजन वापरण्यात आला. तर 38 मेट्रिक टनाहून अधिक ऑक्सिजनची आज गरज असणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात एकूण रुग्णालय आणि किती रुग्णांना ऑक्सिजनची गरज?

कोल्हापूर जिल्ह्यात एकूण 77 कोव्हिड रुग्णालये आहेत. त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात रुग्णांना ऑक्सिजनची गरज लागत आहे. २१ एप्रिलच्या आकेडवारीनुसार जिल्ह्यात 4 हजार 555 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. त्यापैकी ज्यांना सौम्य लक्षणे आहेत अशी 1 हजार 938 ग्रामीण भागातील रुग्ण घरातून उपचार घेत आहेत. तर कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील 716 रुग्ण घरातून उपचार घेत आहेत. उरलेले 1 हजार 901 रुग्ण जिल्ह्यातील विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. या 1 हजार 901 रुग्णांपैकी 1 हजार 116 रुग्ण ऑक्सिजनवर आहेत अशी प्रशासनाच्या आकडेवारीवरून समोर आले आहे.

हेही वाचा-मुंबईतील ऑक्सिजन प्लांटची सुरक्षा वाढवणार - महापौर किशोरी पेडणेकर

सीपीआर रुग्णालयातल्या ऑक्सिजन टाकीची घेतली जातेय 'अशी' काळजी..

बुधवारी नाशिकच्या डॉ. जाकिर हुसेन हॉस्पिटलमध्ये ऑक्सीजन गळतीमुळे तब्बल चोवीस रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या लिक्विड ऑक्सिजन टाकीच्या देखरेखीसाठी टेक्निशियनची टीम सुद्धा बनवण्यात आली आहे. त्याद्वारे दररोज टाकीची पाहणी केली जाते. जेव्हा टाकीमध्ये ऑक्सिजन भरण्यासाठी टँकर येतो तेव्हा सुद्धा नीट काळजी घेतली जाते. छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात 20 हजार लिटर लिक्विड ऑक्सिजन टाकी बसविल्यानंतर इचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालयात सुद्धा 6 हजार लिटर क्षमतेची ऑक्सीजन टाकी वसवण्यात आली. या टाकीमुळे सुद्धा जवळपास 200 हुन अधिक रुग्णांच्या ऑक्सिजनची सोय झाली आहे. त्याठिकाणीसुद्धा टेक्निशियन नेमण्यात आले आहेत.

हेही वाचा-डबल म्युटंटनंतर आता महाराष्ट्रात ट्रिपल म्युटंट कोरोना -डॉ संजय लोंढे

मुंबई महापालिका प्रशासनाकडून ऑक्सीजन टँक रिफिलिंग संदर्भात विशेष काळजी

मुंबईमधील सर्व रुग्णालयांतील ऑक्सिजन प्लांट सीसीटीव्ही लावून सुरक्षित केले जातील. त्या ठिकाणी कोणालाही जाऊ दिले जाणार नाही, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.

तीन ठिकाणी 200 लिटर ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येणार-

मुंबईत ऑक्सिजनचा तुटवडा असल्याने गेल्या आठवड्यात 6 रुग्णालयांतील 168 रुग्णांना इतर रुग्णालयांत हलवावे लागले होते. यापैकी कुर्ला भाभा, वांद्रे भाभा आणि गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयात प्रत्येकी 200 लिटर ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आले आहेत. त्यामध्ये पाईपलाईन जोडणे बाकी होते, ते काम काल पूर्ण झाले आहे. आता ऑक्सिजनचा टँकर आल्यावर त्या टॅंकमध्ये ऑक्सिजन टाकणे बाकी आहे. त्यानंतर ऑक्सिजन पुरवठा सुरू होईल, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.

नाशिकमधील डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनची गळती होऊन दुर्घटना झालेल्या मुंबई महापालिकेकडून काळजी घेतली जात आहे. अशी घटना मुंबईत कुठे होऊ नये, म्हणून मुंबई महानगरपालिका सज्ज झालेली आहे. यासंदर्भात सायन हॉस्पिटलच्या असिस्टंट इंजिनियर मनीषा जाधव यांनी ऑक्सीजन टँक रिफिलिंग संदर्भात विशेष काळजी पालिका प्रशासनाकडून घेतली जात असल्याचे सांगितले.

अशी घेण्यात येते काळजी-

सायन हॉस्पिटलच्या असिस्टंट इंजिनियर मनीषा जाधव म्हणाल्या, की रिफिलिंग होत असताना पालिका हॉस्पिटलच्या आवारामध्ये गर्दी नसणार याची काळजी घेऊनच ऑक्सीजन रिफिलिंगची प्रक्रिया पूर्ण केली जाते. ऑक्सिजन पुरवण्याचे कंत्राट दिलेल्या कंत्राटदाराचे कामगार आणि हॉस्पिटलमधील कामगार हे दोन्ही ऑक्सिजन टँकच्या येथे जाऊन रिफिलिंग करतात. रिफिलिंग करण्याची एक विशिष्ट प्रक्रिया असते. त्या प्रक्रियेच पालन करत ऑक्सिजन रिफिलिंग हे केले जाते. ही प्रक्रिया जवळपास एक ते दीड तास चालू असते. या प्रक्रियेची काळजी घेतली जाते. त्या ऑक्सीजन प्लांटसमोर सीसीटीव्ही कॅमेरेसुद्धा लावलेले आहेत. त्याचे लाईव्ह फुटेज आम्हाला वेळोवेळी आमच्या मोबाईलमध्ये पाहायला मिळते.

नाशिक जिल्ह्यात 18 मॅट्रिक टन ऑक्सिजनची तूट

सद्यस्थितीत नाशिक जिल्ह्याला 120 मॅट्रिक टन ऑक्सिजनची गरज असून सद्या केवळ 85 मॅट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली. तसेच गेल्या काही दिवसांत ऑक्सिजनची मागणी दुप्पटीने वाढली असल्याचेही त्यांनी म्हटले. जवळपास 18 मॅट्रिक टन ऑक्सिजनची तूट निर्माण झाली आहे. तसेच गेल्या काही दिवसांत दुप्पटीने ऑक्सिजनची मागणी वाढल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले. आज दुपारपर्यंत औरंगाबाद आणि नगरमधून ऑक्सिजनची मदत मिळणार असल्याचेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

नाशिकच्या सिक्स सिगमा, श्री गुरूजी हॉस्पिटल, नारायणी हॉस्पिटल सारख्या बहुतांश हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन तुटवडा निर्माण झाला आहे. हॉस्पिटल प्रशासनाने नातेवाईकांना फोन करून रुग्ण दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यास सांगितल्याने नातेवाइकांची धावपळ सुरू आहे. जिल्ह्यात रुग्ण संख्य प्रमाणे ऑक्सिजन शासनाने उपलब्ध करून द्यावा, ही मागणी आयएम ए पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.

पुण्यातील काही रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठा नसल्याने रुग्ण दाखल करणे थांबले

शहर आणि जिल्ह्यात ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. आरोग्य व्यवस्थेवर ताण येत असून ऑक्सिजन शिवाय रुग्णालये व्यवस्थापन हतबल आहेत.अनके लहान रुग्णांलयांनी नवीन रुग्ण दाखल करून घेणे थांबविले आहे.

पुणे शहर आणि जिल्ह्यातून दररोज ३२१.१० टन एवढी ऑक्सिजनची सध्या मागणी आहे. त्यामुळे ऑक्सिजन उत्पादन करणाऱ्या कंपन्याच्या मर्यादा समोर येत आहेत. शहरातील मोठ्या रुग्णालयात जम्बो कोविड सेंटर मध्ये 36 तास पुरेल इतका बॅकअप ऑक्सिजन स्टॉक असतो. मात्र लहान रुग्णालयांची परिस्थिती बिकट आहे. सद्यस्थितीत शहरातील ४० ते ५० लहान रुग्णालयांनी ऑक्सिजनचा पुरवठा नसल्याने रुग्ण दाखल करून घेणे थांबवले आहे. तर काही रुग्णालयातून ऑक्सिजन अभावी रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात शिफ्ट केले जात आहे. शहरात तसेच ग्रामीण भागात ऑक्सिजनअभावी रुग्ण दगवल्याच्या घटना दोन रुग्णालयात घडली आहे. तर एका रुग्णालयात 1 तर दुसऱ्या रुग्णालयात 3 रुग्ण ऑक्सिजन अभावी दगावले आहेत.

जळगावात ऑक्सिजनच्या 80 जम्बो सिलिंडरचा बॅकअप -

जळगावातील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठा तसेच ऑक्सिजन प्लांटची परिस्थिती काय आहे? याचा 'ईटीव्ही भारत'ने रियालिटी चेक केला. त्यात समाधानकारक चित्र समोर आले. याठिकाणी आणीबाणीच्या काळात खबरदारी म्हणून 80 जम्बो ऑक्सिजन सिलिंडरचा बॅकअप ठेवण्यात आहे. त्यामुळे नाशिकसारखी गळतीची किंवा टँकमध्ये काही तांत्रिक अडचण आली तर बॅकपमध्ये असणाऱ्या सिलिंडरमधून रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा होऊ शकतो.

जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दोन महिन्यांपूर्वी औरंगाबाद येथील सागर गॅस कंपनीच्या माध्यमातून ऑक्सिजन टँक उभारण्यात आला आहे. पूर्वीच्या नेत्र कक्षाच्या समोरील पटांगणात हा टँक उभारला असून, त्याची क्षमता 20 किलोलीटर इतकी आहे.

2 तंत्रज्ञ असतात 24 तास ड्युटीवर-

ऑक्सिजन टँकच्या निगराणीसाठी रुग्णालयात 2 तंत्रज्ञ 24 तास ड्युटीवर असतात. फक्त टँक नव्हे तर ऑक्सिजन पाईपलाईनमध्येही तांत्रिक अडचण उद्भवू शकते, ही शक्यता गृहीत धरून हे तंत्रज्ञ दक्ष असतात. वेळच्या वेळी ऑक्सिजन टँक, पाईपलाईन तसेच सिलिंडर पॅनल याची ते पाहणी करतात. ऑक्सिजन टँकच्या सुरक्षेसाठी सुरक्षारक्षक नेमलेले आहेत.

नागपुरात ऑक्सिजनचा तुटवडा; नवीन स्त्रोत शोधण्याचे प्रयत्न

नागपूरात दररोज कोरोनाची रुग्णसंख्या वाढत चालली आहे. यामुळे ऑक्सिजन तुटवडा निर्माण होत आहे. पण भविष्यातील गरज पाहता बाहेरुन मिळणारा पुरवठा मिळण्यास कमी झाल्यास जिल्ह्यातच ऑक्सिजन तयार करण्यासाठी नवीन स्रोत शोधले जात आहेत. बुट्टीबोरी एमआयडीसी येथील दोन तसेच शहरातील 5 अशा एकूण 7 ठिकाणांहून 140 मेट्रिक टनापर्यंत ऑक्सिजन पुरवठा होत आहे. पण नागपूर जिल्ह्याला 170 ते 180 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज आहे. यामुळे 40 मेट्रिक टन ऑक्सिजन इतर ठिकाणाहून मागविला जात आहे.

ऑक्सिजन शहरात निर्माण व्हावा, यासाठी प्रयत्न-

भविष्यातील गरज पाहता ऑक्सिजन शहरात निर्माण व्हावा असे नियोजन करताना डब्ल्यूसिएल, खापरखेडा, कोराडी येथील औष्णिक केंद्रावरून ऑक्सिजन व्यवस्था केली जात आहे. यासाठी युद्धपातळीवर नियोजन केले जात आहे. ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर मागवले जात आहे.

जिल्ह्यातील 139 कोविड हॉस्पिटल आणि त्यानंतर इतर जीवन वाचवण्यासाठीची गरज लक्षात घेऊन त्यानुसार ऑक्सिजनचा साठा दिला जात आहे. 7 ऑक्सिजन निर्माण कंपनीतून नागपूर जिल्ह्यासह गोंदिया, भंडारा चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावतीसह छिंदवाड्यालाही ऑक्सिजन पुरविला जात आहे.

Last Updated : Apr 22, 2021, 10:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.