ETV Bharat / city

स्वस्तामध्ये मिळतोय एलपीजी कंपोझिट सिलेंडर, 'अशी' होती ग्राहकांची धूळफेक - etv bharat marathi

गॅस कंपन्यांनी तीन लेअर असलेले कंपोझिट सिलेंडर मार्केटमध्ये आणले आहेत. याचे वजन जुन्या सिलेंडरपेक्षा 7 किलो कमी असेल. म्हणजेच हे सिलेंडर 10 किलो वजनाचे असून त्यात 10 किलो गॅस असणार आहे. याआधी वापरण्यात येणाऱ्या सिलेंडरमध्ये 14 किलो गॅस असतो.

एलपीजी कंपोझिट सिलेंडर
एलपीजी कंपोझिट सिलेंडर
author img

By

Published : Nov 5, 2021, 4:16 PM IST

Updated : Nov 5, 2021, 4:48 PM IST

मुंबई - घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरचे दर मुंबईसह महाराष्ट्रात 900 रुपयांच्या वर आहेत. गॅस सिलेंडर दरवाढीमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांसाठी एक आंनदाची बातमी आहे. दिल्लीसह 28 शहरात एलपीजी कंपोझिट सिलेंडर मिळणार आहेत. या सिलेंडरचे वजन आधीच्या सिलेंडरपेक्षा कमी आहे. त्या सिलिंडरची किंमत 634 रुपये इतकी असणार आहे. मात्र, ही ग्राहकांची निव्वळ धूळफेक असल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.

मुंबईसह महाराष्ट्रात गॅस सिलेंडरचे दर 900 रुपयांच्या वर आहेत. तर दिल्लीमध्ये 14 किलो एलपीजी गॅस सिलेंडरचे 899.50 पैसे इतके आहेत. ऑक्टोबर महिन्यानंतर सिलेंडरच्या किंमती स्थिर असल्या तरी गॅस दरवाढीमुळे देशभरातील ग्राहक त्रस्त आहेत. अशा ग्राहकांना कंपोझिट सिलेंडरमुळे दिलासा मिळणार आहे. 10 किलोचे कंपोझिट सिलेंडर 633.50 रुपयांना तर 5 किलोचे कंपोझिट सिलेंडर 502 रुपयांना मिळणार आहे.

हेही वाचा-आगामी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा भ्रमाचा भोपळाही फुटणार - शिवसेना

काय आहे कंपोझिट सिलेंडर -
देशभरात घरोघरी एलपीजी सिलेंडर वापरले जातात. हे सिलेंडर लोखंडी असतात. या एका खाली सिलेंडरचे वजन 17 किलो असते. यात 14 किलो गॅस भरल्यावर त्याचे वजन सुमारे 31 किलो इतके होते. गॅस कंपन्यांनी तीन लेअर असलेले कंपोझिट सिलेंडर मार्केटमध्ये आणले आहेत. याचे वजन जुन्या सिलेंडरपेक्षा 7 किलो कमी असेल. म्हणजेच हे सिलेंडर 10 किलो वजनाचे असून त्यात 10 किलो गॅस असणार आहे. याआधी वापरण्यात येणाऱ्या सिलेंडरमध्ये 14 किलो गॅस असतो. तर आता नव्या सिलेंडरमध्ये 10 किलो गॅस मिळणार आहे.

हेही वाचा-हृदयद्रावक : भाऊबीजेच्या पूर्वीच बहिण भावावर काळाचा घाला; जात होते मामाच्या गावी

या ठिकाणी मिळणार सिलेंडर -
आधीच्या सिलेंडरपेक्षा वजन व किंमत कमी असलेले कंपोझिट सिलेंडर दिल्ली, बनारस, प्रयागराज, फरीदाबाद, गुरूग्राम, जयपूर, हैदराबाद, जालंधर, जमशेदपूर, पटना, म्हैसूर, लुधियाना, रायपूर, रांची, अहमदाबाद आदी 28 शहरात हे सिलेंडर मिळणार आहेत.

हेही वाचा-भाजपशासित राज्यांकडूनही इंधन दरकपात, जाणून घ्या कोणत्या राज्यात किती दर?

दिल्लीमधील दर -
5 किलो - 483 रुपये
10 किलो - 633.50 रुपये
19 किलो - 1734 रुपये

ही तर ग्राहकांची धूळफेक -
या आधीचा सिलेंडर 900 रुपयांना मिळत आहे. 900 रुपयात 14 किलो गॅस मिळत होता. याचा अर्थ एका किलो गॅसला 65 रुपये लागतात. ग्राहकांना व्हेरायटी हवी होती. ती व्हेरायटी देण्यात आली आहे. हा ग्राहकांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रयत्न आहे. ग्राहकांना दिलासा द्यायचा असेल तर 900 रुपयांना मिळणारा सिलेंडर 600 रुपयांना द्यायची गरज आहे, अशी प्रतिक्रिया पेट्रोलियम तज्ज्ञ केदार चांडक यांनी दिली आहे.

महागाईचा भडका -

सर्वसामान्य कोरोनाच्या महामारीच्या संकटात विविध समस्यांना सामोरे जात असताना महागाईनेही त्रस्त झाला आहे. खाद्यतेल आणि एलपीजी सिलिंडरच्या किमतींनी गेल्या तीन वर्षातील उच्चांक गाठला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री लागली आहे. दैनंदिन जीवनात लागणारे खाद्यतेल आणि एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतींनी उच्चांक गाठला आहे. विविध शहरांमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत वेगवेगळी आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरचा वापर हॉटेल, रेस्टॉरंट, खानावळी इत्यादी ठिकाणी करण्यात येतो.

Last Updated : Nov 5, 2021, 4:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.