ETV Bharat / city

कोण होते फादर स्टॅन स्वामी, जाणून घ्या

author img

By

Published : Jul 5, 2021, 5:09 PM IST

पुण्यात 31 डिसेंबर 2017 रोजी एल्गार परिषदेत दिलेल्या भाषणा प्रकरणी अटक करण्यात आली होती. एनआयएनने स्टेन यांच्या विरोधात यूएपीए (UAPA) अंतर्गत कारवाई केली होती.

Father Stan Swami
फादर स्टॅन स्वामी

मुंबई- फादर स्टेन स्वामी यांच्या निधनानंतर ट्विटरसह समाज माध्यमात त्यांचे नाव ट्रेन्डवर आले आहे. आदिवासींच्या विविध समस्यांवर आवाज उठविणारे कार्यकर्ते ते भीमा-कोरेगाव प्रकरणातील आरोपी असा फादर स्टेन यांचा जीवनप्रवास राहिला आहे.

कोरेगाव भीमा प्रकरणात आरोप असलेले फादर स्टॅन स्वामी यांचे आज 84 व्या वर्षी मुंबईत निधन झाले. त्यांच्यावर मुंबईमधील वांद्रा रुग्णालयात उपचार सुरू होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे व्हेटिंलेटर असल्याने त्यांच्या जामिनासाठी कुटुंबियांकडून प्रयत्न सुरू होते. मात्र, त्यांचे सोमवारी निधन झाले.

फादर स्टॅन स्वामी
फादर स्टॅन स्वामी

कोण होते फादर स्टॅन स्वामी?

फादर स्टॅन हे झारखंडमधील एक प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते होते. आदिवासींसाठी काम करणारे कार्यकर्ते अशी त्यांची ओळख होती. ते गेल्या अनेक वर्षांपासून वंचित घटकांसाठी कार्य करीत होते. कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी गेल्या वर्षी 9 ऑक्टोबरला त्यांना रांची येथून अटक करण्यात आली होती. कोरेगाव भीमा प्रकरणामध्ये सहभागी झाल्याचा त्यांच्यावर आरोप होता. राष्ट्रीय तपास संस्थेने नामकुम स्टेशन हद्दीत असलेल्या निवासस्थानातून फादर स्टॅन यांना ताब्यात घेतले होते. जवळपास 20 मिनिटे चौकशी केल्यानंतर स्वामी यांना अटक केली होती. यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. ते पार्किन्सन आजाराने ग्रस्त होते. त्यांची श्रवणशक्ती कमी झाली होती. तसेच लंबर स्पॉन्डिलायसिसमुळे ते त्रासलेले होते.

संबधित बातमी वाचा-फादर स्टॅन स्वामी यांचे निधन, २० मिनिटांच्या चौकशीनंतर झाली होती अटक

एल्गार परिषदेनंतर करण्यात आली होती कारवाई-

राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) फादर स्टेन यांना रांचीवरून ऑक्टोबर 2020 मध्ये अटक केली होती. त्यावेळेस त्यांना तळोजा जेलमध्ये ठेवण्यात आले होते. पुण्यात 31 डिसेंबर 2017 रोजी एल्गार परिषदेत दिलेल्या भाषणा प्रकरणी अटक करण्यात आली होती. एनआयएनने स्टेन यांच्या विरोधात यूएपीए (UAPA) अंतर्गत कारवाई केली होती. एल्गार परिषदेच्या या कार्यक्रमानंतर भीमा कोरेगाव येथे प्रचंड हिंसा झाली होती. या हिंसेमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. पुणे पोलिसांनी केलेल्या तपासात यामध्ये माओवादी कनेक्शन असल्याचे म्हटले होते.

हेही वाचा-फादर स्टॅन स्वामींना वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा; एनएचआरसीकडून महाराष्ट्र सरकारला नोटीस

उपचारावरून एनएचआरसीने राज्याच्या मुख्य सचिवांना बजावली होती नोटीस

एनएचआरसीने महाराष्ट्र सरकारच्या मुख्य सचिवांना एक नोटीस बजावली होती. फादर स्टॅन स्वामी यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने शक्य तेवढे प्रयत्न करावेत, असे एनएचआरसीने जारी केलेल्या नोटीसीत म्हटले होते. स्टॅन स्वामी यांच्या मूलभूत मानवी हक्कांचे संरक्षण करावे, असेही एनएचआरसीने नमुद केले आहे. तसेच नवी मुंबईतील तळोजा तुरूंगात असलेल्या स्टॅन स्वामींच्या प्रकृती आणि उपचारासंबंधित अहवालही आयोगाने मागविला होता. कोरोनाच्या संक्रमणादरम्यान स्वामींना वैद्यकीय सुविधा देण्यात आल्या नसल्याची तक्रार 16 मे रोजी एनएचआरसीला प्राप्त झाली होती. तसेच स्वामींना अद्याप कोरोना लस दिली नसल्याचेही तक्रारीत म्हटले होते.

हेही वाचा-कोरेगाव भीमा प्रकरण; आरोपी फादर स्टेन स्वामी यांचा जामीन एनआयए कोर्टाने फेटाळला

'रुग्णालयात जाण्याऐवजी मी तुरूंगातच मरेन'

मागील सुनावणीत नक्षलवाद प्रकरणी अटकेत असलेल्या फादर स्टॅन स्वामी यांनी उपचारासाठी जेजे रुग्णालयात दाखल होण्यासाठी हायकोर्टासमोर नकार दिला होता. 'रुग्णालयात दाखल होण्यापेक्षा मी तुरूंगातच मरेन' फादर स्टॅन स्वामी यांचे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मुंबई उच्च न्यायालयात दाखल जामीन अर्जावर सुनावणी दरम्यान उद्गार काढले होते. पार्किसन्स आजाराने त्रस्त असलेले स्टॅन स्वामी यांनी हायकोर्टात जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होत. मला कोणत्याही रुग्णालयात दाखल व्हायचे नाही, त्यापेक्षा मला जामीन द्या, मी रांचीला जाईन अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली होती.

एनआयए न्यायालयाने जामिनाचा अर्ज फेटाळला होता-

फादर स्टेन स्वामींनी पुराव्यांची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, एनआयएला पुरावे परत मिळवण्यात यश आले आहे, अशी माहिती एनआयएच्या वकिलांनी दिली होती. त्यानंतर एल्गार परिषद आणि शहरी नक्षलवाद प्रकरणी स्वामींचा जामीन एनआयए कोर्टाने 22 मार्च २०२१ रोजी फेटाळला होता. एनआयएने फादर स्टेन स्वामी यांच्या जामिनाला विरोध केला होता.

फादर स्वामींच्या घरावर पुणे पोलिसांनीही टाकला होता छापा-

येथे 31 डिसेंबर 2017 रोजी झालेल्या एल्गार परिषदेसंदर्भात फादर स्टेन स्वामींच्या रांचीतील घरावर छापा टाकण्यात आला आहे. पुणे पोलिसांनी ही कारवाई केली असून त्यांच्या घरातून काही इलेक्ट्रॉनिक साहित्यही जप्त करण्यात आले आहे. शनिवारवाडा येथे 31 डिसेंबर 2017 रोजी एल्गार परिषद पार पडली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी कोरेगाव-भीमा येथे दंगल उसळली होती. यामध्ये एका युवकाचा मृत्यू झाला. तर कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाले होते. याचे पडसाद नंतर संपूर्ण महाराष्ट्रात उमटले होते.

काय आहे भीमा कोरेगाव प्रकरण -

2017 मध्ये पुण्यात भीमा कोरेगावच्या निमित्ताने एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्याच्या दुसऱ्या दिवशी 1 जानेवारी 2018 ला हिंसाचार झाला होता. या प्रकरणाचा तपास करताना देशभरातील अनेक डावे, पुरोगामी कार्यकत्रे आणि विचारवंत नक्षलवाद्यांना मदत करीत असल्याचा दावा पोलिसांनी केला होता. पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध स्वतंत्र गुन्हा दाखल केला. यात आनंद तेलतुंबडे, सुधा भारद्वाज, सुरेंद्र गडलिंग, महेश राऊत, सुधीर ढवळे, अरुण फरेरा, शोमा सेन, व्हर्नन गोन्सालवीस, गौतम नवलखा आणि वरवरा राव यांच्यासह अनेकांवर गुन्हे दाखल केले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.