मुंबई - शिवसेनेचे नेते माजी मंत्री रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याची सुपारी घेतली आहे. त्यांनी अशा सुपाऱ्या घेवू नये, अन्यथा आम्हालाही त्यांच्या सुपाऱ्या फोडाव्या लागतील असा इशारा मुंबईच्या माजी महापौर व शिवसेनेच्या प्रवक्त्या किशोरी पेडणेकर यांनी रामदास कदम यांना दिला आहे. ़
शिवसेनेकडून प्रत्युत्तर - शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडोखोरी करत 40 आमदार फोडले आहेत. यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. माजी मंत्री रामदास कदम यांनीही शिंदे यांना पाठिंबा दिला असून त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली आहे. याला शिवसेनेच्या प्रवक्त्या व मुंबईच्या माझी माहापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रत्त्युत्तर दिले आहे.
...तर तुमच्याही सुपाऱ्या फोडू - रामदास कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जातो. असे सांगून दोन वेळा मंत्रिपद मिळवले, असे देवेंद्र फडणवीस बोलल्याचा व्हिडिओ यावेळी पेडणेकर यांनी दाखवला. कदम हे ज्या ठिकाणी गेले आहेत, त्याला आमचा काहीही आक्षेप नाही. त्यांनी तिथे सुखी राहावे. ते ज्या लोकांच्या सोबत आहेत, त्यांनी कदम यांच्यावर टीका केली आहे. याचीच त्यांनी आठवण ठेवावी. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सुपारी घेवून टीका करू नये, असे केल्यास त्यांच्याही आम्ही सुपाऱ्या फोडू असा इशारा मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिला आहे.