मुंबई : अंधेरी पूर्व मतदार संघातील पोटनिवडणुकीसाठी धनुष्यबाण हे चिन्ह आपल्यालाच मिळावे, यासाठी उद्धव ठाकरे व शिंदे या दोन्ही गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या दाव्या प्रतिदाव्यांची पडताळणी करून या पोटनिवडणुकीसाठी शिवसेना हे नाव तसेच धनुष्यबाण निवडणूक चिन्ह ही गोठण्याचा अंतरिम निकाल निवडणूक आयोगाने दिला (Kirit Somaiyya criticize over Shiv Sena symbol Kirit Somaiyya criticize over Shiv Sena symbol) आहे. या निकालाने उद्धव ठाकरे यांना मोठा हादरा बसला आहे. त्यातच आता राजकीय प्रतिक्रिया सुरू झाल्या आहेत. भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी या निर्णयाचे स्वागत करत, उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली (Kirit Somiayya criticize Uddhav Thackeray) आहे.
काय म्हणाले सोमय्या ? उद्धव ठाकरे साहेबांनी आधी हिंदुत्व घालवलं. मग सरकार, त्यानंतर निशाणी ही गमावली व नावही गमावलं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, उद्धव ठाकरे साहेबांनी जनतेच्या मनातील विश्वासही गमावला, असल्याचं वक्तव्य किरीट सोमैय्या यांनी केलं (Kirit Somaiyya criticize) आहे.
सोमवार दुपारपर्यंत मुदत - शिवसेना हे नाव आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण, या दोन्हीवर दोन्ही गटाने दावे केल्यानंतर काल सायंकाळी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक आयोगातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. चार तासांपेक्षा अधिक वेळ चाललेल्या बैठकीअंती शिवसेना हे नाव आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण हे दोन्ही गोष्टींचा निर्णय १२ पानी आदेशाद्वारे जाहीर करण्यात आला. दोन्ही गटाने त्यांच्या राजकीय पक्षांची नवीन नावे तसेच निवडणूक आयोगाने अधिसूचित केलेल्या निवडणूक चिन्हांच्या यादीतून प्रत्येकी तीन निवडणूक चिन्हे प्राध्यान्य क्रमासह सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत सादर करायची आहेत.