पुणे - ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात भाजप नेते किरीट सोमैया पुन्हा आक्रमक झाले असून मुश्रीफ यांच्या विरोधात पुण्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून महाविकास आघाडीतील बडे नेते सोमैया यांच्या रडारवर असून सोमैया यांनी त्यांचे घोटाळे बाहेर काढण्याचा इशारा दिला आहे. हसन मुश्रीफ प्रकरणात गृहमंत्री हे चालाखी करत आहेत. त्यांनी बोगस बँक अकाउंट उघडले आहेत. हसन मुश्रीफ यांच्या बँक अकाउंटमध्ये ज्या कंपन्या बंद आहेत. तेथून कोट्यवधी रुपये आले. हा आयपीसीच्या अंतर्गत गुन्हा आहे. त्याविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण एसीबीकडे हस्तांतरित करण्यात आले आहे.
ही ठाकरे-पवार यांची चालाखी -
ही ठाकरे-पवार यांची चालाकी आहे. मात्र ही चालाखी आत्ता चालणार नाही. जो 1,500 कोटींचे ग्रामविकास मंत्रालयाचे कॉन्ट्रॅक्ट हसन मुश्रीफ यांच्या जावयाला दिले आहे. त्याचीही चौकशी व्हायला पाहिजे. महाविकास आघाडीच्या मंत्र्यांवर आणि नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे भाजप नेते किरीट सोमैया यांनी आत्तापर्यंत आघाडीतील एकूण 11 मंत्री अन् नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. सोमैया यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचेही नाव जाहीर केले आहे. हसन मुश्रीफ यांच्यावर मनी लॉन्ड्रिंग, बेनामी संपत्ती गोळा करणे तसेच इतर अनेक गैरव्यवहार करण्याचे गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. प्रथम दर्शनी 127 कोटींचा घोटाळा केल्याचे स्पष्ट झाले असून हा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचे सोमैया यांनी स्पष्ट केले आहे. आता त्यांनी पुन्हा मुश्रीफांवर ग्रामपंचायत कंत्राटात 1500 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला असून आज पुण्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात याची तक्रार दाखल केली आहे.
हे ही वाचा -'लोकांना वाटतं अजूनही यौवनात मी'...वाचा काय म्हणाले संजय राऊत फडणवीसांना ?
गृहमंत्र्यांची बनवा-बनवी चालणार नाही -
मंत्री हसन मुश्रीफ आणि कुटुंबियांच्या नावावर अनेक कंपन्या असून या कंपन्यांचे कोलकाता येथील शेळी कंपन्यांसोबत व्यवहार झाल्याचे अनेक कागदपत्रे आपल्याकडे आहेत. नाविद मुश्रीफ यांनी 2019 ची निवडणूक लढत असताना या कंपनीशी व्यवहार झाल्याचे कागदपत्रातून दिसून येत आहे. मुश्रीफ आणि कुटुंबीयांनी मनी लॉन्ड्रिंग, बेनामी व्यवहाराच्या आधारे 127 कोटींचा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप किरीट सोमैया यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. आता त्यांनी मुश्रीफांवर आणखी एक आरोप केला आहे. आज पुण्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात जवाब नोंदविला आहे. अजून काही कागदपत्रे त्यांना हवी आहेत. ती पुढील आठवड्यात देण्यात येईल. माझी तक्रार दोन पार्टमध्ये आहे. गृहमंत्री यांची बनवा-बनवी चालणार नाही. ती तक्रार तिथं आहे आणि ही तक्रार इथं आहे. त्यामुळे याबाबत बनवाबनवी करू नये, असं देखील सोमैया यांनी सांगितले.
हे ही वाचा -मावळच्या घटनेला सरकार नाही तर भाजपाच जबाबदार होते - शरद पवार
गुन्हा केला असेल तर कारवाई करा -
राज्यात मुख्यमंत्री हे उद्धव ठाकरे यांचे सरकार शरद पवार चालवत आहेत. गुन्हा कोणी केला असेल तर त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. मी गुन्हा केला असेल तर माझ्यावरही कारवाई करा. पोस्टरबाजी कसली करताय. माझ्यापासून ते साडेबारा कोटी जनतेपर्यंत कोणीही गुन्हा केला असेल तर त्याच्यावर कारवाई करा, असं देखील सोमैया यांनी यावेळी सांगितले.