रायगड - अलिबाग मधील कोर्लई गावात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या नावावर 19 बंगले असल्याचा दावा भाजपा नेते किरीट सोमैया यांनी ( Kirit Somaiya Allegation Rashmi Thackeray ) केलेला. ज्या ठिकाणी रश्मी ठाकरे यांचे बंगले आहेत, त्याच गावात आज भाजपा नेते यांनी भेट ( Kirit Somaiya In Korlai ) दिली. त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन ग्रामसेवकांकडून काही माहिती घेतल्याचे कळत आहे.
किरीट सोमैया येणार असल्याने गावात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सोमैया कोर्लई गावात दाखल होताच शिवसैनिक आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घोषणाबाजी झाली. यावेळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, सोमैयांनी ग्रामसेवक यांची भेट घेत त्यांच्याकडून काही माहिती घेतली. त्यानंतर ते रेवदंडा पोलीस ठाण्याकडे रवाना झाले आहेत.
गावाला बदनाम करण्याता डाव
याबाबत बोलताना कोर्लई गावाचे सरपंच प्रशांत मिसाळ म्हणाले की, किरीट सोमैया ग्रामपंचयात कार्यलयात आले, बसले आणि काही न बोलतान पत्र देऊन गेले. आज फक्त त्यांना ड्रामाबाजी करायची होती, ती शिवसैनिकांनी हाणून पाडली आहे. हा फक्त गावाला बदनाम करण्याचा डाव आहे, असेही मिसाळ यांनी सांगितले.