मुंबई - पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत स्मार्ट सिटी प्रोजेक्ट अंतर्गत कामांमध्ये भ्रष्टाचार झाला असल्याचे पत्र भाजप नेते किरीट सोमैया यांना संजय राऊत यांनी लिहिले होते. मात्र, या पत्रात आपल्या कामाचे कौतुक केल्याबद्दल किरीट सोमैया यांनी संजय राऊत यांचे आभार मानले आहेत.
-
श्री संजय राऊतनी माझे कौतुक केले आभारी आहे. ते म्हणाले
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) October 25, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
"भ्रष्टाचार, शासकीय पैशांचा अपहार अशी अनेक प्रकरणे आपण सार्वजनिकरीत्या उघड केली आहेत. हे राष्ट्रावर उपकारच झाले. आपण केलेल्या तपासकार्यामुळे महाराष्ट्रातील अनेकांना तुरुंगात जावे लागले
मी काही दिवसात त्यांना उत्तर पाठविणार pic.twitter.com/8XwvKUrulN
">श्री संजय राऊतनी माझे कौतुक केले आभारी आहे. ते म्हणाले
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) October 25, 2021
"भ्रष्टाचार, शासकीय पैशांचा अपहार अशी अनेक प्रकरणे आपण सार्वजनिकरीत्या उघड केली आहेत. हे राष्ट्रावर उपकारच झाले. आपण केलेल्या तपासकार्यामुळे महाराष्ट्रातील अनेकांना तुरुंगात जावे लागले
मी काही दिवसात त्यांना उत्तर पाठविणार pic.twitter.com/8XwvKUrulNश्री संजय राऊतनी माझे कौतुक केले आभारी आहे. ते म्हणाले
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) October 25, 2021
"भ्रष्टाचार, शासकीय पैशांचा अपहार अशी अनेक प्रकरणे आपण सार्वजनिकरीत्या उघड केली आहेत. हे राष्ट्रावर उपकारच झाले. आपण केलेल्या तपासकार्यामुळे महाराष्ट्रातील अनेकांना तुरुंगात जावे लागले
मी काही दिवसात त्यांना उत्तर पाठविणार pic.twitter.com/8XwvKUrulN
महाविकास आघाडी सरकारच्या मंत्री आणि नेत्यांवर भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमैया हे एकामागून एक आरोप करत आहेत. त्यांच्या या आरोपानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत स्मार्ट सिटी प्रोजेक्टमध्ये भ्रष्टाचार झाला असल्याचे सांगत किरीट सोमैया यांनी याकडेही लक्ष द्यावे, असे पत्र सोमैया यांना पाठवले होते. या पत्रानंतर किरीट सोमैया यांनी संजय राऊत यांचे ट्विटरच्या माध्यमातून आभार मानले आहेत.
'संजय राऊत यांनी माझे कौतुक केले आभारी आहे. भ्रष्टाचार, शासकीय पैशांचा अपहार अशी अनेक प्रकरणे आपण सार्वजनिकरीत्या उघड केली आहेत. हे राष्ट्रावर उपकारच झाले. आपण केलेल्या तपासकार्यामुळे महाराष्ट्रातील अनेकांना तुरुंगात जावे लागले, असे म्हणत संजय राऊत यांनी आपल्या कामांचे कौतुक केले आहे. त्यामुळे संजय राऊत यांचे आपण आभारी आहोत,' असे ट्विट किरीट सोमय्या यांनी केले. तसेच या प्रकरणात आपण लवकरच संजय राऊत यांना उत्तर देऊ, असेही त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितले.
काय आहे प्रकरण..?
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत 2018 साली स्मार्ट सिटी प्रोजेक्ट अंतर्गत देण्यात येणाऱ्या कामांमध्ये जवळपास पाचशे ते सातशे कोटी रुपयांचा घोटाळा झालेला आहे. निविदा प्रक्रिया राबवताना काही खास कंपन्यांना नियम व अटींचा फायदा होईल अशा प्रकारचे नियम व अटी निविदा प्रक्रिया राबवताना घालण्यात आल्या. याबाबतची काही कागदपत्र समोर आली असून किरीट सोमैया यांनी या भ्रष्टाचारात लक्ष घालावे, अशा आशयाचे पत्र संजय राऊत यांनी किरीट सोमैया यांना काही दिवसांपूर्वी लिहिले होते.
हेही वाचा - मी आणि माझा नवरा समीर जन्मतः हिंदू, क्रांती रेडकरचे नवाब मलिकांना प्रत्यूत्तर