ETV Bharat / city

सुजित पाटकर यांच्या विरोधात आरोप करण्यापूर्वी किरीट सोमय्यांनी वस्तुस्थिती पडताळून पाहायला पाहिजे होती, न्यायालयाचे मत - कोविड सेंटर उभारण्यात घोटाळा

सुजित पाटकर यांच्यावर कोरोना परिस्थितीच्यावेळी कोविड सेंटर उभारण्यात घोटाळा केला असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमैया Kirit Somaiya यांनी केला होता. या याचिकेवर सुनावणी दरम्यान न्यायालयाने असे म्हटले आहे की सुजित पाटकर यांच्या विरोधात आरोप करण्यापूर्वी वस्तुस्थिती पडताळून पाहायला पाहिजे होती.

Kirit Somaiya
किरीट सोमय्यांनी वस्तुस्थिती पडताळून पाहायला पाहिजे होती
author img

By

Published : Aug 26, 2022, 8:20 AM IST

Updated : Aug 26, 2022, 9:29 AM IST

मुंबई शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांचे निकटवर्ती सुजित पाटकर यांच्यावर कोरोना परिस्थितीच्यावेळी कोविड सेंटर उभारण्यात घोटाळा केला असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमैया Kirit Somaiya यांनी केला होता. या वक्तव्याविरोधात फर्मने किरीट सोमय्या यांच्या विरोधात मानहानीची याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी दरम्यान न्यायालयाने असे म्हटले आहे की सुजित पाटकर यांच्या विरोधात आरोप करण्यापूर्वी वस्तुस्थिती पडताळून पाहायला पाहिजे होती.

सोमैया यांनी ठेवलेल्या कागदपत्रांच्या आधारे त्यांनी दावा केला की फर्म केवळ कागदावर आहे. त्यामुळे यामध्ये निष्काळजीपणा झाला आहे. केवळ त्याच्यावर अवलंबून असलेल्या कागदपत्रांच्या आधारावर कोणतीही गृहितके असू शकत नाहीत. सुविधेचा समतोल देखील सोमय्या यांच्या बाजूने नाही. त्यांचे कधीही भरून न येणारे नुकसान होणार नाही. याउलट एक जबाबदार व्यक्ती असल्याने सोमैया यांनी कोणत्याही प्रकारचे विधान करण्यापूर्वी वस्तुस्थितीची पूर्ण पडताळणी करायला हवी होती असे न्यायालयाने म्हटले आहे.

कोरोना जम्बो सेंटर प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर आणि इतरांविरुद्ध चौकशीची मागणी करणाऱ्या सोमैयांविरोधात रुग्णालयाने मानहानीचा दावा दाखल केला होता. कोरोना काळात या फर्मने पॅरा मेडिकल कर्मचारी, नर्सिंग कर्मचारी, आरोग्य सेवा व्यावसायिकांसाठी लॉजिस्टिकसह आरोग्य सेवा सुविधा पुरविल्या असे दाव्यात म्हटले आहे. मुंबई महापालिकेच्या कोरोना उपचार केंद्रांसाठी व्यवस्थापन सेवा देण्यासंदर्भात पालिकेने फर्मला कंत्राट दिले. सोमैयांनी या दाव्याला विरोध करत न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले. तर सोमैयांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसची नोंदणीही करण्यात आली नव्हती. फर्मचे काही भागीदार राजकीय नेत्यांशी संबंधित असल्याने जम्बो सेंटरचे कंत्राट त्यांना दिले.

फर्मने कोरोना उपचार केंद्राचे व्यवस्थापन केल्याने त्यांच्याकडे सर्व कामाची माहिती आहे. व्यवस्थापन उत्तम होते हे प्रथमदर्शी दर्शविणारे एकही दस्तऐवज फर्मने सादर केलेला नाही. तसेच सोमैया यांनी केलेल्या आरोपांत तथ्य नाही, हे सिद्ध करणारे दस्तऐवज फर्मने सादर करणे आवश्यक आहे असे दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने म्हटले. सोमय्या यांनी आरटीआयद्वारे मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारे आरोप केले आहेत. ते महापालिकेच्या व्यवस्थापनाशी संबंधित आहे. त्यामुळे सोमय्या यांनी फर्मविरोधात वक्तव्य करण्यापूर्वी वस्तुस्थिती पडताळून पाहायला हवी होती असेही न्यायालयाने म्हटले.

काय आहे प्रकरण किरीट सोमैया काही दिवसांपासून कोरोना काळात दिलेल्या वेगवेगळ्या कंत्राटांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करत होते. संजय राऊत यांचे मित्र सुजित पाटकर यांनी मुंबईतील वेगवेगळ्या जम्बो करोना केंद्रात जून २०२० ते मार्च २०२२ या कालावधीत वैद्यकीय सेवा पुरविण्याकरिता काढलेल्या निविदा मिळविण्यासाठी लाइफलाइन रुग्णालय मॅनेजमेंट सर्व्हिसेस ही कंपनी स्थापन केली. ही कंपनी अस्तित्वात नसून केवळ कंत्राट मिळविण्यासाठी बनावट कागदपत्रांद्वारे तयार करण्यात आली आहे, असा आरोप सोमैया यांनी केला. सुजित पाटकर यांच्यासह लाइफलाइन रुग्णालय मॅनेजमेंटचे भागीदार डॉ हेमंत गुप्ता, सुजित पाटकर, संजय शहा आणि राजू साळुंखे यांनी मिळून 38 कोटी रुपयांचा घोटाळा केला असे सोमैया यांनी तक्रारीत म्हटले आहे. कंपनीकडे वैद्यकीय मनुष्यबळ पुरवण्याचा अनुभव व ज्ञान नसतानाही अनुभव असल्याचे बसवून कंत्राट मिळवल्याचेही सोमैया यांच्या तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर सुजित पाटकर यांच्या फर्मने मुंबई महानगर दंडाधिकारी न्यायालयात सोमैया यांच्या विरोधात मानहानीची याचिका दाखल केली होती.

हेही वाचा विधानपरिषदेत हजर राहण्यापेक्षा उद्धव ठाकरे यांना पक्षाचे काम अत्यंत महत्त्वाचे, अजित पवारांची स्पष्टोक्ती

Last Updated : Aug 26, 2022, 9:29 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.