ETV Bharat / city

सरकारला जाग कधी येणार; किरीट सोमैया यांचा संतप्त सवाल

राज्यातील रुग्णालयांमध्ये सातत्याने लागणाऱ्या आगींवरून भाजपा नेते किरीट सोमैया यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. सरकारला जाग कधी येणार असा संतप्त सवाल सोमैया यांनी विचारला आहे.

किरीट सोमैया
किरीट सोमैया
author img

By

Published : Apr 28, 2021, 7:48 PM IST

मुंबई - मुंबईसह राज्यात कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असताना एकीकडे मात्र रुग्णालयात लागणाऱ्या आगीचे सत्र सुरुच आहे. बुधवारी मध्यरात्री मुंब्राच्या कौस येथील प्राईम क्रिटीकेअर रुग्णालयाला भीषण आग लागली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती समोर येत आहे. राज्यातील रुग्णालयांमध्ये सातत्याने लागणाऱ्या आगींवरून भाजपा नेते किरीट सोमैया यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. सरकारला जाग कधी येणार असा संतप्त सवाल सोमैया यांनी विचारला आहे.

प्राईम रुग्णालयात एकूण १७ रुग्ण उपचार घेत होते. त्यातील ४ जणांचा दुसऱ्या रुग्णालयात नेताना व आगीत होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर जखमींना १ लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. आगीची माहिती मिळताच मुंब्र्याचे आमदार व राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड तसेच ठाणे महापालिकेचे अधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि अग्निशामक दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

या सगळ्या आगीच्या घटनांवरून भाजपाचे नेते किरीट सोमैया यांनी संतप्त प्रतिक्रिया राज्य सरकारच्या विरोधात व्यक्त केलेली आहे. त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, की ठाण्यामध्ये गेल्या तीन दिवसांमध्ये ही तिसरी घटना आहे की ज्यामध्ये रुग्णांचा मृत्यू होत आहे. सरकारने यासंदर्भात गांभीर्याने विचार करत योग्य ती कठोर कारवाई करावी आणि सगळ्या हॉस्पिटलचे फायर ऑडिट अजूनपर्यंत सरकारने केले नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न असून ताबडतोब सरकारने पूर्ण करावी अशी मागणी किरीट सोमैया यांनी केली.

आगीत ४ जणांचा झाला मृत्यू

मुंब्रा शहरातील कौसा परिसरात असलेल्या प्राइम क्रिटिकेयर सेंटर या रुग्णालयाला लागलेल्या आगीमुळे ४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मंगळवारी रात्री रुग्णालयात आग लागली तेव्हा रुग्णालय प्रशासनाने तातडीने रुग्णांना इतरत्र हलवले. मात्र, या सगळ्या धावपळीत उपचारात खंड पडल्याने ICU वॉर्डातील ४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती ठाणे महानगरपालिकेने दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.