ETV Bharat / city

Kirit Somaiya Criticized CM : उद्धव ठाकरे लुच्चा मुख्यमंत्री; किरीट सोमैयांची जीभ पुन्हा घसरली - किरीट सोमैया यांची मुख्यमंत्र्यांवर टीका

परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर त्यांच्यावर टीका करताना भाजप नेते किरीट सोमैया (Kirit Somaiya on CM Uddhav Thackeray) यांची जीभ पुन्हा घसरली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा लुच्चा असा उल्लेख सोमैया यांनी केला.

Kirit Somaiya
भाजप नेते किरीट सोमैया
author img

By

Published : May 27, 2022, 1:52 PM IST

मुंबई - भाजपा नेते किरीट सोमैया (Kirit Somaiya on CM Uddhav Thackeray) यांची पुन्हा एकदा जीभ घसरल्याचे आज दिसून आले. सोमैया यांनी मंत्री अनिल परब यांच्यावर टीका करताना मुख्यमंत्र्यांवरही टीका केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 19 बंगल्यांबाबत थोतांड मांडले आहे. उद्धव ठाकरे यांच्यासारखा खोटारडा आणि लुच्चा मुख्यमंत्री पाहिला नाही, अशा शब्दात सोमैया यांनी टीका केली आहे.

अनिल परब तो मी नव्हेच - परिवहन मंत्री अनिल परब हे नौटंकी करत आहेत. ईडीने छापे मारल्यानंतरही आता तो मी नव्हेच या नाटकातील भूमिका ते करत आहेत. या नाटकातील कलावंत पनशीकर यांच्यानंतर आता परब यांना अभिनयाचे पारितोषिक दिले पाहिजे, अशा शब्दात किरीट सोमैया यांनी परब यांच्यावर टीका केली.

किरीट सोमैया यांचा अनिल परबांवर आरोप - अनिल परब यांनी त्यांच्या रिसॉर्टचे कर भरले आहेत. तसेच 16 हजार चौरस फुटावर बांधकाम केले आहे. तसेच लाईट बिलही त्यांच्या नावाने आहे. त्यामुळे ते सदानंद कदम यांच्या नावाने रिसॉर्ट असल्याचे सांगत असले तरी प्रत्यक्षात तेच मालक आहेत. 25 कोटी रुपये यासाठी कुठून खर्च केले याचा हिशोब ते देऊ शकत नाहीत, म्हणूनच त्यांच्यावर कारवाई झाली आहे. केवळ पर्यावरणाची तक्रार आहे म्हणून कारवाई झाल्याचे ते भासवत असले तरी प्रत्यक्षात चित्र वेगळे आहे, असा आरोपही सोमैया यांनी परब यांच्यावर केला आहे.

हेही वाचा - Kirit Somaiya : 'अनिल परब गजाआड जातील, सोबत आणखी चौघांचा...'; किरीट सोमैयांचा दावा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.