मुंबई - कालच राज्य विधिमंडळ अधिवेशनाचा अर्थसंकल्पीय अधिवेशनाच सूप वाजलं. अधिवेशनामध्ये काल मुख्यमंत्र्यांनी अनिल परब यांच्या नावाचा उल्लेख करत त्यांनाही तुरूंगात टाकल जाणार आहे असं सांगितले होते. त्याच अनुषंगाने आता भाजपा नेते किरीट सोमय्या अनिल परब यांचे दापोली येथील रिसॉर्ट तोडण्यासाठी त्यांच्या निवासस्थानाहून दापोलीला रवाना झाले आहेत. किरीट सोमय्या ठाकरे सरकारविरोधात अधिकच आक्रमक झाले आहेत. त्यांच्यासोबत भाजपा कार्यकर्त्यांचा मोठा ताफा आहे. विशेष म्हणजे, यावेळी त्यांनी एक प्रतिकात्मक हातोडाही सोबत घेतला आहे.
नियम दोन्ही बाजूंना सारखाच - राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या दापोलीतील मुरुडमध्ये रिसॉर्टबाबत सोमय्यांनी आरोप केले होते. याबाबत मुख्यमंत्र्यांनी सुद्धा विधानसभेमध्ये जे काही अनधिकृत आहे ते पाडायलाच पाहिजे. पण हा नियम दोन्ही बाजूंना सारखाच लागायला हवा असा उल्लेख केला होता. किरीट सोमय्या यांनी या अगोदरच २६ मार्च रोजी आपण अनिल परबांचा रिसॉर्ट पाडण्यासाठी जाणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर आज सकाळीच सोमय्या मुंबईतील आपल्या घराहून दापोलीला निघाले आहेत. यावेळी त्यांच्यासोबत कार्यकर्त्यांचा मोठा ताफा आहे. किरीट सोमय्या तब्बल १५० गाड्यांचा ताफा घेऊन दापोलीमध्ये जाणार आहेत.
हातोडा जनतेच्या भावनेचं प्रतिक - मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अनधिकृत बांधकाम असणाऱ्या मंत्र्यांचे हॉटेल तात्काळ पाडावं. आज जर हे रिसॉर्ट पाडलं नाही तर आज ना उद्या अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना तुरुंगात जावं लागेल, अशी प्रतिक्रिया किरीट सोमय्यांनी दिली आहे. हा हातोडा महाराष्ट्राच्या भावनेचं प्रतिक आहे, असंही त्यांनी नमूद केलं आहे.