ETV Bharat / city

शुभवर्तमान..  पती-पत्नीचा रक्तगट भिन्न असूनही किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया यशस्वी

author img

By

Published : Nov 17, 2020, 7:34 PM IST

Updated : Nov 17, 2020, 7:49 PM IST

एखाद्याची किडनी निकामी झाल्यास त्याला त्याच गटाची आणि जवळच्या नातेवाईकांची किडनी द्यावी लागते. याच वेळी शस्त्रक्रिया यशस्वी होत असते. मात्र मुंबई महापालिकेच्या नायर रुग्णालयात पती आणि पत्नीचा वेगळा रक्तगट असूनही किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया यशस्वी पार पाडण्यात आली आहे.

kidney transplant in nair hospital
नायर रुग्णालयात भिन्न रक्तगटातील किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया यशस्वी

मुंबई - एखाद्याची किडनी निकामी झाल्यास त्याला त्याच गटाची आणि जवळच्या नातेवाईकांची किडनी द्यावी लागते. याच वेळी शस्त्रक्रिया यशस्वी होत असते. मात्र मुंबई महापालिकेच्या नायर रुग्णालयात पती आणि पत्नीचा वेगळा रक्तगट असूनही किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया यशस्वी पार पाडण्यात आली आहे. ही शस्त्रक्रिया होऊन आता ८ महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लोटला आहे. त्यामुळे ही शस्त्रक्रिया यशस्वी ठरली असल्याचे नायर रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले आहे. महापालिकेच्या नायर रुग्णालयाने पती-पत्नीच्या प्रेमाला एक वेगळा आयाम दिला आहे.

प्रत्यारोपित करण्यात अडचणी

मुंबईत राहणाऱ्या आणि 'ओ' पॉझिटिव्ह रक्तगट असणाऱ्या एक चाळीस वर्षांच्या व्यक्तीला 'मूत्रपिंड' अर्थात 'किडनी' निकामी झाल्यानंतर किडनी ट्रान्सप्लांट करण्याची गरज होती. किडनी ट्रान्सप्लांट विषयक नियमांनुसार जवळच्या नातेवाईकांपैकी ज्यांचा रक्तगट समान आहे, अशा एका व्यक्तीची किडनी ट्रान्सप्लांट करणे शक्य असते. संबंधित व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकांमध्ये आई, वडील, भाऊ, बहिण आणि बायको यांचा समावेश होता. यापैकी आई, वडिल आणि भावाचा रक्तगट समान होता. तरी आईच्या किडनीची कमी असणारी कार्यक्षमता, वडिलांचे वय आणि भावाच्या वैयक्तिक कारणामुळे त्यांची ‘किडनी ट्रान्सप्लांट’ करणे शक्य नव्हते. तर रक्तगट 'बी पॉझिटिव्ह' असणाऱ्या रुग्णाच्या पत्नीला तिची एक किडनी पतीला देण्याची इच्छा होती. मात्र, रक्तगट समान नसल्याने पत्नीची किडनी पतीला प्रत्यारोपित करण्यात अडचणी होत्या.

पहिलीच शस्त्रक्रिया

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या बा.य.ल. नायर रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांनी याबाबत वैद्यक शास्त्रातील प्रगत पद्धतींनुसार आणि भिन्न रक्त गटातील व्यक्तींच्या ‘किडनी ट्रान्सप्लांट’ विषयक वैद्यकीय उपचार क्रमानुसार संबंधित बाबी अमलात आणल्या. त्यानंतर २ मार्च २०२० रोजी सलग ४ तास 'किडनी' प्रत्यारोपण शस्त्रक्रिया नायर रुग्णालयातच पार पडली. या शस्त्रक्रियेदरम्यान पत्नीची एक किडनी काढून पतीला प्रत्यारोपित करण्यात आली. विसंगत रक्तगट असूनही 'किडनी ट्रान्सप्लांट' करण्याची ही बृहन्मुंबई महापालिका रुग्णालयांतील पहिलीच शस्त्रक्रिया होती.

शस्त्रक्रिया यशस्वी

रक्तगट विसंगत असूनही ‘किडनी ट्रान्सप्लांट’ करण्याच्या अशा प्रकारच्या शस्त्रक्रियांमध्ये शस्त्रक्रिया झाल्यानंतर सुरुवातीचे ६ महिने अत्यंत काळजी घ्यावी लागते. ही शस्त्रक्रिया होऊन आता ८ महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लोटला आहे. त्यामुळेच ही शस्त्रक्रिया यशस्वी ठरली असल्याचे आता म्हणता येईल, असे नायर रुग्णालयातील संबंधित डॉक्टरांनी सांगितले आहे. या शस्त्रक्रियेमुळे पती-पत्नीच्या प्रेमाला एक नवा आयाम मिळण्यासोबतच जवळच्या नात्यात रक्तगट विसंगत असूनही 'किडनी ट्रान्सप्लांट' करणे आता शक्य असल्याने अनेक गरजूंना आशेचा एक नवा किरण दिसला आहे.

'यांनी' केली यशस्वी शस्त्रक्रिया

विसंगत रक्तगटांमधील 'किडनी ट्रान्सप्लांट' शस्त्रक्रिया यशस्वीपणे केल्याबद्दल महापालिकेच्या वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालयांचे संचालक डॉक्टर रमेश भारमल यांनी नायर रुग्णालयातील संबंधित सर्व डॉक्टरांचे आणि शस्त्रक्रिया करणाऱ्या चमूचे अभिनंदन करत सदर चमूला शुभेच्छा दिल्या आहेत. ही शस्त्रक्रिया करणाऱ्या चमूमध्ये मूत्रपिंड रोग उपचार विभागाच्या (Nephrology Dept.) प्रमुख प्रा. डॉ. कल्पना एस मेहता, मूत्रपिंड शल्यचिकित्सा विभागाचे (Urology Dept.) प्रमुख प्रा. डॉ. एच. आर. पाठक, भूलशास्त्र विभागातील (Anesthesiology Dept.) प्रा. डॉ. लिपीका बलिअरसिंग इत्यादी तज्ज्ञ डॉक्टरांचा प्रामुख्याने समावेश होता.

Last Updated : Nov 17, 2020, 7:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.