ETV Bharat / city

kharif Sowing : राज्यात 100 टक्के खरीप पेरण्या; राज्य शासनाची माहिती - खरीप पेरणी

राज्यात ( kharif sowing in maharashtra ) एकीकडे अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान ( Heavy rains cause heavy losses to farmers ) झाले असताना ७ ऑक्टोबरपर्यंत शंभर टक्के खरीप पेरण्याचा ( Kharif sowing) झाल्याचा दावा राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत केला.

kharif sowing in maharashtra
मंत्रिमंडळ
author img

By

Published : Oct 12, 2022, 10:49 PM IST

मुंबई - राज्यात ( kharif sowing in maharashtra ) एकीकडे अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान ( Heavy rains cause heavy losses to farmers ) झाले असताना ७ ऑक्टोबरपर्यंत शंभर टक्के खरीप पेरण्याचा ( Kharif sowing) झाल्याचा दावा राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत केला.

परतीच्या पावसाचा तडाखा - परतीच्या पावसाने राज्यातील काही भागांना जोरदार तडाखा दिला आहे. अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली. शेत पीकाचेही मोठे नुकसान झाले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. सुमारे ११८०.४ मि.मी. म्हणजेच सरासरीच्या ११५.७ टक्के पाऊस झाला. त्यापैकी १४३.१० लाख हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच १०० टक्के क्षेत्रावर पेरणी झाल्याची माहिती कृषी विभागाने दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

योजनांचा आढावा - प्रधानमंत्री ग्रामसडक, प्रधानमंत्री आवास शहरी योजना, प्रधानमंत्री आवास ग्रामीण योजना, जलजीवन मिशन, प्रधानमंत्री किसान सन्मान, स्वामीत्व- ड्रोनद्धारे गावांचे सर्वेक्षण, मृद आरोग्य पत्रिका (सॉईल हेल्थ कार्ड), किसान क्रेडिट कार्ड, अटल पेन्शन योजना, स्वनिधी योजना त्याचप्रमाणे आयुष्मान भारत जन आरोग्य योजना व राज्य पुरस्कृत महात्मा जोतीराव फुले जनआरोग्य योजना यांचे सादरीकरण केले. दरम्यान, केंद्र शासन पुरस्कृत फ्लॅगशिप योजनांना अधिक गती द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले आहेत.

कोविडचे सरासरी चारशे रुग्ण - राज्यात सध्या कोविडचा पॉझिटीव्हीटी दर २.५५ टक्के इतका आहे. तर सरासरी दररोज ४०० रुग्ण आढळून येत आहेत. सध्या राज्यात २३८७ सक्रीय रुग्ण असून ४ जण व्हेंटिलेटरवर असून ३४ जण ऑक्सीजनवर आहेत. एकूण पहिला, दुसरा आणि प्रिकॉशनरी असे १७ कोटी ७२ लाख ४२ हजार ६१८ डोसेस देण्यात आले आहेत.

खेळाडूंचे अभिनंदन - गुजरात येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने सर्वाधिक पदके जिंकून पदक तालिकेत पहिला क्रमांक मिळविला आहे. महाराष्ट्राला एकूण सर्वाधिक १४० पदके मिळाली आहेत. त्या खालोखाल हरियाणा व कर्नाटक ही राज्ये आहेत. या पदकांमध्ये ४० सुवर्ण पदके महाराष्ट्राला मिळाली आहेत. मंत्रिमंडळ बैठकीत यामुळे खेळाडू व क्रीडा प्रशिक्षकांचे अभिनंदन करण्यात आले. महाराष्ट्रातील खेळाडुंच्या कामगिरीमुळे एकूणच राज्यातील क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन मिळेल आणि देशात महाराष्ट्राचा दबदबा निर्माण होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.