मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अहोरात्र काम करीत ( CM Eknath Shinde is Working Round A Clock ) असतात. पहाटे चार वाजेपर्यंत सलग काम करीत असलेल्या एकनाथ शिंदे यांना दररोज सलाईनचा डोस घ्यावा लागत असल्याचा गौप्यस्फोट मंत्री दीपक केसरकर ( Minister Kesarkar Secret Blast ) यांनी केला आहे.
मुख्यमंत्र्यांना विश्रांतीसाठीसुद्धा वेळ मिळत नाही : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सत्तेत आल्यापासून दररोज पहाटे चार वाजेपर्यंत काम करीत असतात. एकनाथ शिंदे हे जनतेचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांच्या कार्यालयात आणि दालनात नेहमीच प्रचंड गर्दी असते. एवढेच काय पण त्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानीसुद्धा भेटीसाठी लोक रांगा लावून असतात. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना विश्रांतीसाठीसुद्धा वेळ मिळत नाही, असा दावा शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केला आहे.
मुख्यमंत्री घेतात सलाईनचा डोस : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पहाटेपर्यंत जागून काम करीत असल्यामुळे त्यांना अधिक एनर्जीची गरज भासते. विश्रांती मिळत नसल्यामुळे थकलेल्या शरीरात एनर्जी निर्माण करण्यासाठी पहाटे चार वाजता त्यांच्या वर्षा या निवासस्थानी डॉक्टर सलाईन घेऊन तयारीतच असतात. एकनाथ शिंदे यांना दररोज सलाईनचा डोस द्यावा लागत आहे. मात्र, तरीही ते अहोरात्र जनतेसाठी काम करीत असल्याचा दावा केसरकर यांनी केला आहे.
जनतेनेही मुख्यमंत्र्यांची काळजी घ्यावी : एवढा कार्यक्षम मुख्यमंत्री महाराष्ट्राने यापूर्वी पाहिला नाही. जनतेसाठी अहोरात्र काम करणाऱ्या अगदी सलाईनचा डोस घेऊन स्वतःच्या तब्येतीची काळजी न करता शिंदे जनतेसाठी काम करीत आहेत. त्यामुळे जनतेची काळजी करणाऱ्या शिंदे यांची जनतेनेही त्यांची आणि त्यांच्या प्रकृतीची काळजी घेणे गरजेचे आहे असेही हे सरकार यांनी सांगितले.