ETV Bharat / city

KEM Hospital Ragging Case : केईएम रुग्णालयातील अॅट्रॉसिटी, रॅगिंग प्रकरणी कारवाईच्या सूचना - महापौर

मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णालयात (KEM Hospital Ragging Case) आणि वैद्यकीय महाविद्यालयात एका मागासवर्गीय विद्यार्थ्याला जातीवाचक शिवीगाळ, मारहाण करण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणाची दखल घेत महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांनी केईएम रुग्णालयाला भेट दिली. महापौरांनी पीडित मुलगा आणि इतर मुलांना वेगळे ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. पीडित मुलावर प्रशासनाला लक्ष ठेवायला सांगितले असून कायद्यानुसार (Ragging and Atrocities Case in in KEM Hospital) दोषींवर कारवाईच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

KEM Hospital Ragging Case
KEM Hospital Ragging Case
author img

By

Published : Dec 22, 2021, 5:42 PM IST

मुंबई - मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णालयात (KEM Hospital Ragging Case ) आणि वैद्यकीय महाविद्यालयात एका मागासवर्गीय विद्यार्थ्याला जातीवाचक शिवीगाळ, मारहाण करण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी अॅट्रॉसिटी कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी करण्यात आली असून सामाजिक संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. हा प्रकार माहीत होताच आज केईएम रुग्णालयाला भेट देऊन कायद्यानुसार कारवाई करण्याच्या (Ragging and Atrocities Case in in KEM Hospital) सूचना रुग्णालय प्रशासनाला दिल्याची माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया देताना महापौर किशोरी पेडणेकर

कायद्यानुसार कारवाईच्या सूचना - महापौर

मुंबई महापालिकेचे परेल येथे केईएम रुग्णालय (KEM Hospital Ragging Case ) आहे. या रुग्णालयात वैद्यकीय महाविद्यालय आहे. त्यात सुगत पडघन हा मुलगा शिक्षण घेत आहे. या मुलाला सोबत शिकणारे विद्यार्थी जातीवाचक शिव्या देतात. तसेच मारहाण करण्याची धमकी देत आहेत. याबाबत कारवाईची मागणी करण्यासाठी मंगळवारी सामाजिक कार्यकर्त्यानी पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्याची दखल घेत महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांनी केईएम रुग्णालयाला भेट दिली. त्यानंतर महापौरांनी सांगितले की, मी आज केईएम प्रशासन आणि पीडित मुलगा तसेच ज्यांनी हा प्रकार केला त्यांना समोरासमोर उभे केले. पीडीत मुलाच्या वडीलांबरोबर बोलणे झाले. एक आई आणि महापौर म्हणुन सल्ला दिला आहे. पीडित मुलगा आणि इतर मुलांना वेगळे ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. पीडित मुलावर प्रशासनाला लक्ष ठेवायला सांगितले आहे. कायद्यानुसार कारवाई करायला (Ragging and Atrocities Case in in KEM Hospital ) सांगितले असून जे काही आहे, ते समोर येईल असेही महापौर म्हणाल्या.

हे ही वाचा -KEM Hospital Students Ragging : केईएम रुग्णालयातील विद्यार्थ्याला जातीवाचक शिवीगाळ, मारहाण

काय आहे नेमके प्रकरण -

केईएम रुग्णालयातील जी. एस. मेडिकल कॉलेजमध्ये ऑक्युपेशनल थेरेपी या वैद्यकीय शाखेत सुगत पडघन हा विद्यार्थी शिकत आहे. तो कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये राहत आहे. २०१९ पासून त्याला उच्चवर्णीय विद्यार्थ्यांकडून मानसिक व शारीरिक त्रास दिला जात आहे. त्याची रॅगिंग केली जात असून जातीवाचक शिवीगाळ केली जात आहे. यासंदर्भात सुगतने वेळोवेळी हॉस्टेल वार्डन, प्राध्यापक यांना याबाबत तक्रार दिली आहे. त्याने १० एप्रिल २०१९ मध्ये कॉलेजचे डीन, उपअधीक्षक, विभागप्रमुख, वॉर्डन, विद्यार्थी चिटणीस आदींना तक्रार दिली. मात्र त्याची गंभीर दखल घेण्यात आली नाही. तत्कालीन वॉर्डन डॉ. सुनील कुयरे यांनी या विद्यार्थ्याला आणि त्याच्या पालकांना अशी तक्रार दिल्यास तुला कॉलेज आणि हॉस्टेलमधून काढून टाकू, असे सांगितले. त्यानंतरही इतर विद्यार्थी इमारतीवरून फेकून देण्याची धमकी देत असल्याने या त्रासाला कंटाळून सुगत मराठवाड्यात आपल्या गावी गेला.

शैक्षणिक नुकसान होत असल्याने गावावरून पुन्हा मुंबईत आल्यावर सुगत याला शिवीगाळ आणि मारण्याची धमकी दिली जात असल्याने १३ डिसेंबरला पुन्हा डीनला लेखी तक्रार दिली. १५ व १६ डिसेंबरला रॅगिंग चौकशी समिती नेमून चौकशीचा देखावा करण्यात आला. या चौकशी समिती समोर धमक्या देणारे विद्यार्थी अमेघ पाटील आणि योगेश शिंगणे यांना बोलावलेही नाही. रॅगिंग झाली हे पीडित विद्यार्थी सिद्ध करू शकला नाही, असा निष्कर्ष काढण्यात आल्याचा अहवाल तयार करण्यात आला. दोषी विद्यार्थी तसेच वॉर्डन यांना पाठीशी घालण्यात आले. या प्रकरणी राज्याच्या एसटी, एसी आयोगाकडेही तक्रार करण्यात आली आहे. सुगतला न्याय देण्यात रुग्णालयाचे डीन, इतर डॉक्टर अधिकारी कमी पडले आहेत. यामुळे त्यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा मोरे यांनी सामाजिक संघटनांच्या वतीने दिला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.