ETV Bharat / city

Comedy Award: 'केळेवाली' सोनाली कुलकर्णी लावणार ठुमके - अभिनेत्री सोनाली कुलकर्णी

महाराष्ट्राची अप्सरा म्हणून ओळख असलेली सोनाली कुलकर्णी 'केळेवाली' च्या रुपात कॉमेडी अवॉर्ड (see Comedy Award) मध्ये अवतरणार (Kelewali Sonali Kulkarni will perform Dance) आहे. पांडू हवालदारफेम केळेवाली गाण्यावर ती ठुमके लावताना दिसणार आहे.

Zee Talkies Comedy Award
सोनाली कुलकर्णी
author img

By

Published : Oct 4, 2022, 5:33 PM IST

Updated : Oct 6, 2022, 7:56 PM IST

मुंबई : या वर्षी कॉमेडी अवॉर्ड ला १५ वर्ष पूर्ण होत आहेत. तर गेल्या ७ वर्षांपासून हा कॉमेडी अवॉर्ड (Talkies Comedy Award) सोहळा (Kelewali Sonali Kulkarni will perform Dance) रंगतो आहे. नाटक, सिनेमा या माध्यमातील विनोदी कलाकृतींना गौरवण्यासाठी कॉमेडी अवॉर्ड प्रदान करण्यात येतात. विनोदी कलाकृती, कलाकार यांच्यामध्येही कॉमेडी अवॉर्ड ची उत्सुकता असते. दरवर्षी कॉमेडी अवॉर्डची पर्वणी रसिकांना मिळत असते. यंदाच्या कॉमेडी अवॉर्डच्या मंचावर दादा कोंडके यांच्या सिनेमातील ठसकेबाज गाण्यांवरील डान्सवर कलाकार थिरकणार आहेत.

महाराष्ट्राची अप्सरा म्हणून ओळख असलेली सोनाली कुलकर्णी 'केळेवाली' च्या रुपात कॉमेडी अवॉर्ड मध्ये अवतरणार आहे. पांडू हवालदारफेम केळेवाली गाण्यावर ती ठुमके लावताना दिसणार आहे. सोनाली, दादा कोंडके यांच्या सुपर हिट चित्रपटातील सुपर हिट गाण्यांवर कॉमेडी अवॉर्ड या सोहळ्यात नृत्य सादर करणार आहे. मराठी सिनेमातील अप्सरा फेम सोनाली कुलकर्णी म्हटलं की काहीतरी हटके बघायला मिळणार याची आता तिच्या चाहत्यांना सवयच झाली आहे. छंद लागला म्हणत सोशल मीडियावर तुफान हिट झालेल्या सोनालीच्या डान्सचा, अभिनयाचा, भूमिकेचा प्रत्येक अपडेट जाणून घेण्याचा जणू तिच्या चाहत्यांना छंदच लागला आहे. कॉमेडी अवॉर्ड मध्ये सोनाली आणि दादा कोंड़केंच्या भूमिकेत विनोदवीर भाऊ कदम सुद्धा केळ्याची टोपली डोक्यावर घेऊन ठुमके मारताना दिसणार आहेत.

Last Updated : Oct 6, 2022, 7:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.